महिंद्रा फायनान्स सक्षम शिष्यवृत्ती

◆ शिष्यवृत्तीची रक्कम / फायदे:-
इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी – ५००० रुपये
इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी – ८००० रुपये
इयत्ता अकरावी – बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी – १०,००० रुपये
पदवीच्या कोणत्याही वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी – १५००० रुपये
पोस्ट ग्रॅज्युएशनच्या कोणत्याही वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी – २०००० रुपये

◆ शिष्यवृत्ती बद्दल:-
महिंद्रा फायनान्सने CSR उपक्रमांतर्गत सक्षम शिष्यवृत्ती सुरू केली आहे. ड्रायव्हर असणाऱ्या पालकांची इयत्ता पहिली ते पदव्युत्तर अभ्यासक्रमात शिकणारी मुले या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात.

◆ कोण अर्ज करू शकतो:-
इयत्ता पहिली ते पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी


◆ पात्रता निकष:-
१) महाराष्ट्र, गुजरात, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमधील सध्या इयत्ता पहिली ते पदव्युत्तर शिक्षण घेत असलेले विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.
२) मागील वर्षीची परीक्षा किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण झालेले विद्यार्थीच या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.
3) ज्यांचे कौटुंबिक उत्पन्न ₹ 3 लाख पेक्षा कमी किंवा बरोबर आहे तेच विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.
4) ज्यांच्या पालकांपैकी एक ड्रायव्हर आहे (LMV किंवा LCV) आणि वैध ड्रायव्हिंग लायसन्स आहे असे विद्यार्थीच शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत.

◆ टीप –
फार्मसी, इंजिनीअरिंग , डिप्लोमा, एमबीबीएस, LAW इत्यादी कोणत्याही व्यावसायिक अभ्यासक्रमात शिकणारे विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत.

◆ आवश्यक कागदपत्रे:-
१) विद्यार्थ्यांचा फोटो
२) बोनाफाईड प्रमाणपत्र
2023-2024 फी पावती, 2023-2024 आय कार्ड, 2023-2024 प्रवेश पत्र, शाळा किंवा कॉलेज लेटरहेडवरील बोनाफाईड प्रमाणपत्र
३) पालक/पालकांचा ड्रायव्हिंग लायसन्स
४) बँक पासबुक किंवा रद्द केलेला चेक
५) उत्पन्नाचा पुरावा
फॉर्म 16A, सरकारी प्राधिकरणाकडून दिलेला उत्पन्नाचा दाखला , पालक नोकरी करत असल्यास कंपनीकडून उत्पन्नाचे प्रमाणपत्र लेटर हेडवर , पगार स्लिप, प्रतिज्ञापत्र
६) विद्यार्थ्याचे आधार कार्ड

◆ अधिक माहितीसाठी लिंक:-
https://synergieinsights.in/saksham/

◆ बोनाफाईड प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी :-
https://synergieinsights.in/saksham/download.php?filename=Bonafide-Certificate-Format.docx

◆ ऑनलाईन अर्जासाठी लिंक:-
https://synergieinsights.in/saksham/home/Application

◆ संपर्क तपशील:-
मोबाईल – 8447733263
saksham@synergie.in