नवी मुंबई महानगरपालिका शिष्यवृत्ती

◆ अंतिम तारीख:- 31/08/2021, सायं. ६ वाजून १५ मिनिटे

◆ पात्र विद्यार्थी:-
१) विधवा/घटस्फोटित महिलांची मुले.
२) आर्थिक व दुर्बल घटकातील इयत्ता १ ली ते ३ रीत महाविद्यालयीन शिक्षण घेणारे मागासवर्गीय विद्यार्थी.
३) नवी मुंबई क्षेत्रातील दगडखाण/बांधकाम/रेती/नाका कामगारांच्या मुले.
४) नवी मुंबई क्षेत्रातील स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबातील इयत्ता १ ली ते महाविद्यालयीन शिक्षण घेणारे विद्यार्थी.
५) नवी मुंबई क्षेत्रातील मनपा आस्थापनेवरील सफाई कामगार व कंत्राटी पध्दतीवर असलेल्या कामगारांची मुले.

◆ अर्ज करण्याची पद्धत:-
१) पात्र विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती योजनांकरीता विहितः नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह सर्व विभाग कार्यालये/नमुमपा संचलित सर्व ग्रंथालय/समाज विकास विभाग, बेलापूर भवन, 1 ला मजला, से, 11, सी.बी.डी., बेलापूर येथे जमा करणे.
किंवा
२) नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय भूखंड क्रं.1, किल्ले गांवठाण जवळ, पामबीच जंक्शन, सेक्टर १५ए. सी.बी.डी., बेलापूर, नवी मुंबई ४००६१४. या ठिकाणी शासकीय व सार्वजनिक सुट्टया वगळून कार्यालयीन वेळेत जमा करावेत.

◆ आवश्यक कागदपत्रे:-
१) उत्पन्न रु. ८,००,०००/- च्या आत असलेबाबतचा मा तहसिलदार, ठाणे यांचेकडील उत्पन्नाचा दाखला.
२) वास्तव्य पुरावा- मालमत्ता धारक असल्यास चालू वर्षाचा मालमत्ता कर भरल्याची पावती / निवडणूक ओळखपत्र मतदार यादीतील नांव/पाणी पट्टी/वीज बिल / आधार कार्ड/ 3 वर्षाचा भाडे करारनामा / पासपोर्ट / रेशनकार्ड / विवाह नोंदणी’ दाखला/राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक / सलग 3 वर्ष मुंबई महानगरपालिका हद्दीतील शाळेत शिकत असल्याचा पुरावा म्हणून सादर करावा लागेल. (उपरोक्त पैकी कोणताही एक पुरावा)
३) विदयार्थ्याची मागील वर्षाची गुणपत्रिका- कोव्हिड कालावधीमुळे मागील वर्षाची परीक्षा झाली असल्यास मागील वर्षाचे गुणपत्रक / परीक्षा झाली नसल्यास त्यापूर्वी लगतची परीक्षा झालेल्या वर्षाचे गुणपत्रक जोडणे अनिवार्य राहील.
४) मागासवर्गीय असल्यास सक्षम प्राधिका-यांकडील जातीचा दाखला आवश्यक .
५) विधवा महिलेच्या पतीच्या मृत्यूच्या दाखल्याची प्रमाणित प्रत (विधवा महिलेच्या मुलांकरीता)
६) घटस्फोटित महिला असल्यास न्यायालयाच्या आदेशाची प्रमाणित प्रत/ घटस्फोटित महिलांनी मा. न्यायालयात दावा दाखल केलेला असल्यास त्याबाबतची छायांकित प्रत अर्जासोबत जोडणे अनिवार्य राहील, (घटस्फोटीतमहिलेच्या मुलांकरीता)
७) कुटुंबातील जमिन नवी मुंबई प्रकल्पासाठी सिडको/एम. आय. डी. सी. यांनी संपादीत केली असेल तर त्याबाबतचा / सातबारा प्रत/अवॉर्डची नक्कल अर्जासोबत सादर करावी, (प्रकल्पग्रस्तांच्या मुलांकरीता)
८) नवी मुंबई महानगरपालिका आस्थापनेवर कंत्राटी कामगार म्हणून काम करत असलेबाबत स्वच्छता अधिकारी स्वच्छता / निरिक्षक विभाग प्रमुख संबंधित ठेकेदार यांचे प्रमाणपत्र (सफाई कामगारांच्या मुलांकरीता)
९) अर्जदाराचा पालक नोंदणीकृत मालक/ स्वयंसेवी संस्थेचा दगडखाण/बांधकाम/रेती/ नाका कामगार असलेबाबतचा पुरावा (दगडखाण/बाधाम /रेती/नाका कामगार यांच मुलांकरीता)
१०) अर्जामध्ये नमूद केलेल्या खात्याचे बँक पासबुक / धनादेश यापैकी एकाची छायांकित प्रत.
११) पाल्य व पालकाचे आधार कार्ड छायांकित प्रत.

◆ अटी / शर्ती:-
१) विद्यार्थ्याला मागील वर्षाच्या वार्षिक परिक्षेत किमान ६५% गुण किंवा ‘अ’ श्रेणी मध्ये उत्तीर्ण असावी. (आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील लाभाथ्यांकरीता)
२) विद्यार्थ्याला मागील वर्षाच्या परीक्षेत किमान ६०% गुण किंवा ब श्रेणी मध्ये उत्तीर्ण असावी. (मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरिता )
३) अर्जासोबत अलीकडील काळात काढलेले पालक व पाल्याचा पासपोर्ट साईज आकाराचा फोटो लावणे आवश्यक राहील.
४) लाभार्थी कुटूंबाने या समान कारणांसाठी इतर कोणत्याही शासकीय / अशासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
६) जोडण्यात आलेली सर्व छायांकित कागदपत्रे स्वसाक्षांकित असावीत.
७) दाखल केलेल्या अर्जाच्या अनुषंगाने शिष्यवृत्ती मंजूर करणे अथवा नाकारण्याचा अंतिम अधिकार मा. आयुक्त यांना राहील.

अर्जाची प्रत मिळवण्यासाठी लिंक:-
(सदर लिंक वर जाऊन आपण अर्जाची प्रत (प्रिंट) मिळवू शकता. सदर अर्ज आपणास शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी पाठवणे आवश्यक आहे.)

4 thoughts on “नवी मुंबई महानगरपालिका शिष्यवृत्ती”

  1. माझ्या मुलीची 2020-2021 शिषवृत्तीचे पैसै मिळाले नाहीत तर किती दिवसांनी मिळतील.

    1. Kindly Contact NMMC

      समाज विकास विभाग, बेलापूर भवन, 1 ला मजला, से 11, सी.बी.डी., बेलापूर

    1. Dear Karan,

      Thank you for visiting maxima website, Unfortunately Only students currently studying are eligible for navi mumbai muncipal corporation scholarship.

      Thanks & Regards,
      Team Maxima

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *