◆ शिष्यवृत्तीबद्दल:-
एसीसी विद्यासारथी हा एसीसी ट्रस्टचा एक प्रमुख शिष्यवृत्ती कार्यक्रम आहे. ही शिष्यवृत्ती विविध एसीसी प्लांट नजीक राहणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. ज्यांना महागड्या शैक्षणिक खर्चामुळे शिक्षण घेता येत नाही, अशा विद्यार्थ्यांना एसीसी विद्यासारथी शिष्यवृत्ती त्यांच्या आर्थिक अडचणींचा सामना करण्यासाठी आणि शैक्षणिक उत्कृष्टता आणि करिअरच्या संधींचा पाठपुरावा करण्यासाठी प्रोत्साहित करेल. ही शिष्यवृत्ती एसीसी कर्मचारी आणि त्यांच्या मुलांसाठी लागू होणार नाही.
◆ अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक – ०७ नोव्हेंबर २०२१
◆ अभ्यासक्रम, पात्रता, आणि शिष्यवृत्ती रक्कम :-
१) जीएनएम नर्सिंग – इयत्ता बारावीत किमान ५० टक्के गुण – शिष्यवृत्ती रक्कम -₹१५०००
२) बी.ई/बीटेक विद्यार्थी – इयत्ता बारावीत किमान ५० टक्के गुण – शिष्यवृत्ती रक्कम – ₹३०,०००
३) आयटीआय विद्यार्थी – इयत्ता बारावीत किमान ३५ टक्के गुण – शिष्यवृत्ती रक्कम – ₹१०,०००
४) डिप्लोमा विद्यार्थी – इयत्ता बारावीत किमान ५० टक्के गुण – शिष्यवृत्ती रक्कम – ₹१५,०००
५) पदवीच्या विद्यार्थ्यांसाठी – अभ्यासक्रम – बीए, बीएससी, बीएससी (आयटी), बीएससी (सेरीकल्चर), बीएससी ऍग्रीकल्चर, बीएससी (होनर्स), बीसीए, बीबीए, बीएड – इयत्ता बारावीत किमान ५० टक्के गुण – शिष्यवृत्ती रक्कम – ₹५०००
६) ए. एन. एम नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी – इयत्ता बारावीत किमान ५० टक्के गुण – शिष्यवृत्ती रक्कम – ₹१०,०००
७) मेडिकल विद्यार्थी :- इयत्ता बारावीत किमान ५० टक्के गुण – शिष्यवृत्ती रक्कम – ₹३०,०००
अभ्यासक्रम – एम.बी.बी.एस, बी.एच.एम.एस, बी.यू. एम.एस, बी.ए.एम.एस
८) पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी – ( तांत्रिक नसलेले) पदवी किमान ५० टक्के गुणांनी उत्तीर्ण – शिष्यवृत्ती रक्कम – ₹१००००
अभ्यासक्रम – एम.ए, एम.एस.सी, एम. कॉम, मास्टर ऑफ सोशल वर्क
९) पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी – (तांत्रिक)
पदवी किमान ५० टक्के गुणांनी उत्तीर्ण – शिष्यवृत्ती रक्कम – ₹३००००
अभ्यासक्रम – एमबीए, एमटेक, एमसीए
१०) बीएससी नर्सिंग –
इयत्ता बारावीत किमान ५० टक्के गुण – शिष्यवृत्ती रक्कम – ₹२००००
◆ अर्ज करण्याकरिता आवश्यक कागदपत्रे :-
१) डोमेसाईल प्रमाणपत्र
२) ओळखपत्र
३) पत्त्याचा पुरावा
४) दहावी व बारावीचे गुणपत्रक
५) शेवटच्या वर्षाचे गुणपत्रक (चौथ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी)
६) विद्यार्थ्याचे बँक पासबुक
७) प्रवेश पूर्ण झाल्याचे पत्र
८) नवीन शैक्षणिक वर्षातील कॉलेज (शुल्काची) फीची पावती/ फी स्ट्रक्चर
९) चालू आर्थिक वर्षातील उत्पन्नाचे प्रमाणपत्र
१०) पॅनकार्ड / मतदान ओळखपत्र/ पासपोर्ट
◆ संपर्क तपशील:-
पत्ता- टाइम्स टॉवर, पहिला मजला, कमला मिल कंपाऊंड, लोअर परेल, मुंबई ४०००१३
टेलिफोन: (०२२) ४०९०४४८४
फॅक्स: (०२२) २४९१५२१७
ई-मेल: vidyasaarathi@nsdl.co.in
◆ ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंक – https://www.vidyasaarathi.co.in/Vidyasaarathi/scholarship