◆अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 नोव्हेंबर 2025
◆ शिष्यवृत्तीची रक्कम:
• इयत्ता 9 वी ते 12 वी – ₹15,000 पर्यंत
• पदवी अभ्यासक्रम – ₹75,000 पर्यंत
• पदव्युत्तर अभ्यासक्रम – ₹2,50,000 पर्यंत
• वैद्यकीय अभ्यासक्रम – ₹4,50,000 पर्यंत
• IIT मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी – ₹2,00,000 पर्यंत
• IIM मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी – ₹5,00,000 पर्यंत
• परदेशातील शिक्षणासाठी – ₹20,00,000 पर्यंत
◆ शिष्यवृत्तीचा तपशील:
SBI फाउंडेशन द्वारे राबवण्यात आलेली SBI Platinum Jubilee Asha Scholarship 2025-26 ही भारतातील सर्वात मोठ्या शिष्यवृत्ती योजनांपैकी एक आहे. या शिष्यवृत्तीचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल पण गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना शिक्षण चालू ठेवण्यासाठी मदत करणे हा आहे.
ही शिष्यवृत्ती इयत्ता 9 वी ते 12 वी आणि Top 300 NIRF संस्थांमध्ये पदवी / पदव्युत्तर / वैद्यकीय अभ्यासक्रम, तसेच IIT, IIM आणि परदेशी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिली जाते.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ₹20 लाखांपर्यंत शिष्यवृत्तीची रक्कम मिळू शकते.
◆ पात्रता निकष:
इयत्ता 9 वी ते 12 वी मध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी:
• मागील वर्षी 75% गुण किंवा त्याहून अधिक गुण मिळवलेले विद्यार्थी शिष्यवृत्ती अर्ज करण्यास पात्र आहे(SC/ST साठी गुणांची 10% सवलत दिली जाईल)
• वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ₹3,00,000 पेक्षा कमी असावे
पदवी अभ्यासक्रमात शिक्षण घेणारे विद्यार्थी:
• Top 300 NIRF यादीतील संस्थांमध्ये शिक्षण घेत असलेले आणि पदवी अभ्यासक्रमात शिक्षण घेणारे विद्यार्थी या शिष्यवृत्ती करता अर्ज करण्यास पात्र आहेत.
• मागील वर्षी 75% गुण / 7 CGPA मिळवले असणे आवश्यक आहे
• उत्पन्न: ₹6,00,000 पेक्षा कमी
पदव्युत्तर अभ्यासक्रमात शिक्षण घेणारे विद्यार्थी:
• Top 300 NIRF यादीतील संस्थांमध्ये शिक्षण घेत असलेले विद्यार्थी या शिष्यवृत्ती करता अर्ज करण्यास पात्र आहेत
• मागील वर्षी 75% गुण / 7 CGPA मिळवणे आवश्यक आहे.
• उत्पन्न: ₹6,00,000 पेक्षा कमी
वैद्यकीय अभ्यासक्रमात शिक्षण घेणारे विद्यार्थी:
• Top 300 NIRF यादीतील वैद्यकीय संस्थांमध्ये शिकणारे विद्यार्थी
• मागील वर्षी 75% गुण / 7 CGPA गुण मिळवणे आवश्यक आहे
• उत्पन्न: ₹6,00,000 पेक्षा कमी
IIT मधील विद्यार्थी:
• कोणत्याही IIT मध्ये पदवी शिक्षण घेत असलेले विद्यार्थी
• मागील वर्षी 75% गुण (SC/ST साठी 10% सवलत)
• उत्पन्न: ₹6,00,000 पेक्षा कमी
IIM मधील विद्यार्थी:
• IIM मध्ये MBA / PGDM अभ्यासक्रम करत असलेले
• मागील वर्षी 75% गुण / 7 CGPA
• उत्पन्न: ₹6,00,000 पेक्षा कमी
परदेशी शिक्षण घेत असलेले विद्यार्थी:
• QS/THE जागतिक क्रमवारीतील टॉप 200 संस्थांमध्ये पदव्युत्तर किंवा त्यापुढील शिक्षण घेणारे विद्यार्थी या शिष्यवृत्ती करता पात्र आहेत
• मागील वर्षी 75% गुण / 7 CGPA
• उत्पन्न: ₹6,00,000 पेक्षा कमी
◆ टीप:
• SC/ST विद्यार्थ्यांसाठी 10% गुण सवलत दिली जाईल
• 50% शिष्यवृत्ती महिला विद्यार्थिनींसाठी राखीव आहेत.
• 50% शिष्यवृत्ती SC/ST विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत.
◆ आवश्यक कागदपत्रे:
1. मागील वर्षाचे गुणपत्रक
2. आधार कार्ड
3. चालू वर्षाचे शैक्षणिक शुल्क पावती
4. बँक खाते तपशील (विद्यार्थी किंवा पालकाचे)
5. उत्पन्नाचा पुरावा (Form 16A/ उत्पन्न प्रमाणपत्र/ पगार पावती इ.)
6. चालू वर्षाचे प्रवेशाचे प्रमाणपत्र (ID कार्ड/ प्रवेश पत्र/ बोनाफाईड प्रमाणपत्र)
7. विद्यार्थ्यांचा फोटो
8. जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
◆ ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंक: https://www.buddy4study.com/application/SBIFS19/instruction
◆ संपर्क तपशील:
फोन: 011-430-92248 (Ext- 303)

