★टाटा ट्रस्ट शिष्यवृत्ती★

ज्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची आहे अशा विद्यार्थ्यांकरिता ही शिष्यवृत्ती आहे.
परीक्षेत मिळालेल्या गुणांची काही अट नाही.
इयत्ता आठवीपासून पुढे पदव्युत्तर शिक्षण घेणारा कोणीही विद्यार्थी या शिष्यवृत्ती करीता अर्ज करू शकतात ( इंजिनिअरिंग वगळता)
शाळेची किंवा कॉलेजची फी भरलेला पुरावा सादर करणे बंधनकारक आहे

◆अर्ज करण्याची अंतिम तारीख:-
३१ जानेवारी २०२२

◆पात्रता:-
१.ही शिष्यवृत्ती फक्त मुंबई, नवी मुंबई, मुंबई उपनगरे, ठाणे या परिसरात असणाऱ्या शाळा किंवा कॉलेज मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता आहे.

२.ज्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ मध्ये प्रवेश घेतला आहे आणि शाळेची किंवा कॉलेजची फी भरली आहे.

३.कमीत कमी मागील वर्षीच्या इयत्तेत पास व्हायला हवे (ज्या विद्यार्थ्यांना KT आहे असे विद्यार्थी स्कॉलरशिप करिता पात्र नाहीत).

४.एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन विद्यार्थी या शिष्यवृत्ती करिता अर्ज करू शकतात.

◆अर्ज करण्याकरिता कागदपत्रे:-
१)कुटुंबाची आर्थिक आणि विद्यार्थ्यांची शैक्षणिक परिस्थिती नमूद केलेला स्वतःचा लेखी अर्ज
२)मागील वर्षीचे गुणपत्रक (२०२०-२०२१)
३)या वर्षीची फी भरलेली पावती( २०२१-२०२२)
४) कुटुंबाचा उत्पन्नाचा पुरावा

◆अर्ज करण्याची पद्धत:-
वर नमुद केलेली कागदपत्रे आपल्या स्वलिखित अर्जासह igpedu@tatatrust.org या ईमेल आयडी वर मेल करावीत.

◆ संपर्क तपशील:-
पत्ता-
बॉम्बे हाऊस, 24, होमी मोदी स्ट्रीट,
मुंबई 400001, भारत
फोन- 02266658282 /0226665 8013
Emial:- talktous@tatatrusts.org
igpedu@tatatrusts.org

◆ अधिक माहितीसाठी लिंक – https://www.tatatrusts.org/our-work/individual-grants-programme/education-grants

10 thoughts on “★टाटा ट्रस्ट शिष्यवृत्ती★”

    1. Very nice & Very good for students like from poor family can apply for same & this good thing comes from Tata group only not any other like Ambani,Adani they are making money not a charity

Comments are closed.