सिडनी स्कॉलर्स इंडिया शिष्यवृत्ती

◆ अर्ज करण्याची अंतिम तारीख:- ४ जुलै २०२१

◆ शिष्यवृत्ती बद्दल:-
सिडनी विद्यापीठ आणि भारत यांच्यात गुंतवणूकीतील संशोधन, उद्योग भागीदारांशी सहकार्य आणि विद्यार्थ्यांकरिता त्यांची संपूर्ण क्षमता साध्य करण्यासाठी शिक्षणाविषयीची वचनबद्धता वाढविणे हा या कार्यक्रमाचा मानस आहे.

◆शिष्यवृत्तीची रक्कम – ४०,००० डॉलर्सपर्यंत

◆पात्रता निकष:-
१) भारताचे नागरिक आणि सध्या भारतीय रहिवासी असणे आवश्यक.
२) सिडनी विद्यापीठाकडून पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या पदवीसाठी प्रवेशाची एक विनाशर्त ऑफर प्राप्त होणे गरजेचे आहे.

◆ टीपः ऑस्ट्रेलियाचे स्थायी रहिवासी किंवा त्यांनी यापूर्वी सिडनी विद्यापीठ इंडिया शिष्यवृत्तीचा लाभ घेतला आहे असे विद्यार्थी पात्र नाहीत

◆ शिष्यवृत्तीचे फायदे:-
एकूण 28 शिष्यवृत्त्या प्रतिवर्षी देण्यात येतील, सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे –
१) चार वर्षांपर्यंतच्या कोणत्याही पदवीसाठी वर्षाकाठी ३ × ४०,००० डॉलर्स
२) १० x २०,००० डॉलर्स पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी प्रथम वर्षाची शिष्यवृत्ती.
३) १५ x १०,००० डॉलर्स पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी प्रथम वर्षाची शिष्यवृत्ती

◆ अर्ज करण्याची लिंक:- https://sydneyuniversity.forstack.com/forms/ssisp

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *