◆ शिष्यवृत्ती रक्कम:– ₹ ७५,०००
◆ अर्ज करण्याची अंतिम तारीख:– ३० जून २०२१
◆ शिष्यवृत्ती बद्दल:-
सकाळ इंडिया फाउंडेशनच्या वतीने भारतीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी बिनव्याजी कर्जाऊ शिष्यवृत्ती म्हणून ७५ हजार रुपयांची एक याप्रमाणे सुमारे पंचावन्न शिष्यवृत्त्या देण्यात येतात. भारतात पीएच.डी. करण्यासाठी किंवा परदेशी पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना २०१९-२० या वर्षापासून प्रत्येकी ७५ हजार रुपयांचे बिनव्याजी कर्जाऊ शिष्यवृत्ती दिली जाते.
◆ पात्रता निकष आणि अटी व शर्ती: –
१) सकाळ इंडिया फाउंडेशन शैक्षणिक व्याजमुक्त कर्ज शिष्यवृत्ती रू. ७५,००० / – कोणत्याही विद्यापीठाच्या भारतीय पदवीधरांना जे परदेशात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाकरिता किंवा भारतात पीएच.डी. अभ्यास करण्यासाठी अर्ज केला आहे अशा विद्यार्थ्यांना दिली जाते. याव्यतिरिक्त दर वर्षी १०,००० / – रुपयांची सकाळ पेपर्स ट्रस्ट शिष्यवृत्ती भारत किंवा परदेशातील एखाद्या संस्थेत पत्रकारितेत पदव्युत्तर अभ्यास करणाऱ्या पात्र विद्यार्थ्यास देण्यात येईल.
२) बिनव्याजी कर्ज शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरण्यासाठी अर्जदाराने एका वर्षाच्या कालावधीपेक्षा कमी नसलेल्या शैक्षणिक अभ्यासासाठी भारतीय / परदेशातील विद्यापीठात प्रवेश मिळवावा. तसेच, शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याच्या तारखेपासून दोन वर्षापूर्वीच्या वैधानिक विद्यापीठ / राष्ट्रीय संस्था / भारतात समकक्ष असलेल्या संस्थेत पीएचडी करण्यासाठी संशोधन करण्यासाठी अर्जदारास वैध नोंदणी असणे आवश्यक आहे.
३) या बिनव्याजी कर्ज शिष्यवृत्ती ची परतफेड शिष्यवृत्ती मिळाल्यापासून दोन वर्ष कालावधीच्या आत मध्ये करावी त्यापेक्षा अधिक काळ लावल्यास 12% वार्षिक व्याज द्यावे लागेल.
४) ज्या विद्यार्थ्यांनी अगोदरच परदेशी विद्यापीठे किंवा महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे आणि काही काळ शिक्षण घेतले आहे असे विद्यार्थी या शिष्यवृत्तीकरिता पात्र नाहीत.
◆ ऑनलाइन अर्ज करण्याकरिता लिंक:-
https://www.sakalindiafoundation.com/login.php
◆ संपर्क तपशील:-
१) सकाळ इंडिया फाउंडेशन
प्लॉट नंबर २७, नरवीर तानाजीवाडी, पीएमपी डेपोजवळ, साखर संकुल जवळ, शिवाजीनगर, पुणे ४११००५.
२) संपर्क क्रं.: (०२०) २५६०२१०० (Ext १७४), ६६२६२१७४
◆ ईमेल: sakalindiafoundation@esakal.com, Contactus@sakalindiafoundation.org
◆ वेबसाईट:- www.sakalindiafoundation.com