जवाहरलाल नेहरू मेमोरिअल फंड फेलोशिप

◆ शिष्यवृत्ती बद्दल:-
जवाहरलाल नेहरू फेलोशिप विनामूल्यबउच्च शिक्षण आणि बौद्धिक विकासाला प्रोत्साहन, समर्थन आणि संरक्षणासाठी समर्पित आहेत. अपवादात्मक प्रतिभावान व्यक्तींना दोन वर्षांच्या कालावधीत त्यांच्या स्वतंत्र्यसर्जनशील कार्यामध्ये संधी देण्याचा प्रयत्न करते.

◆ अंतिम तारीख:- कोणतीही/ठराविक अंतिम तारीख नाही.

फायदे:-
१) प्रत्येक फेलोशिप दोन वर्षांसाठी आहे आणि यात मासिक भत्ता १,००,०००/ – (एक लाख) आहे.
२) याव्यतिरिक्त सचिवात्मक सहाय्य, प्रवास आणि इतर आपत्कालीन परिस्थितीवरील खर्चाची वार्षिक रक्कम रू ७५,०००/- दिली जाईल.

◆ फेलोशिपची रचना:-
१) दोन वर्षासाठी फेलोशिप
२) सर्व क्षेत्रातील विद्वान मंडळींसाठी ही शिष्यवृत्ती खुली आहे.
३) फेलोशिप भारतीय नागरिकांसाठी खुली आहे आणि फेलोना भारतातील आपल्या आवडीच्या ठिकाणी काम करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे.

◆ पत्रात निकष:-
१) एकमात्र निकष हा आहे की विद्यार्थ्यांना उत्कृष्ट कामासाठी योग्य क्षमता आणि त्यांच्या निवडलेल्या क्षेत्रात नवीन शक्यतांचा शोध घेऊन सर्जनशील प्रकल्प सुरू करण्याची वास्तविक इच्छा असणे आवश्यक आहे.

◆ अर्ज कसा कराल:-
१) अर्जदार आपले तपशील शीर्षकासह, सचिव, जवाहरलाल नेहरू मेमोरियल फंड, टीन मुर्ती हाऊस, नवी दिल्ली ११०-०११ वर पाठवू शकतात.
२) अर्जासाठी छापील फॉर्म नाही. खालील तपशिलासह अर्ज साध्या कागदावर पाठवला जाऊ शकतो:
१. बायोडाटा, मूळ कार्याच्या तपशीलासह
२. विशेषज्ञतेच्या क्षेत्रात अनुभव.
३. प्रकल्प हाती घेण्याचा प्रस्ताव ( सारांश एक हजार शब्दांपेक्षा अधिक नसावा)
४. एक फोटो
३) राज्य सेवेत किंवा केंद्रात सरकारी सेवेत असणाऱ्यांनी योग्य माध्यमातून अर्ज पाठवावेत.

◆ वेबसाईट लिंक :- http://www.jnmf.in/fabout.html

◆ संपर्क:-
१) पत्ता: प्रशासकीय सचिव
जवाहरलाल नेहरू मेमोरिअल फाऊंडेशन फंड, तीन मूर्ती हाऊस, नवी दिल्ली ११०-०११.
२) फोन: +91-11-23013641, +91-11-23017173, +91-11-23018087
३) फॅक्स: +91-11-23011102
४) ई-मेल: jnmf1964@gmail.com

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *