● अर्ज करण्याची अंतिम तारीख: – ३० जून २०२१
● शिष्यवृत्तीची रक्कम: –
१) मेंटेनन्स अलॉन्स ट्युशन फी सहित – १८,०००रुपये प्रत्येक महिना
२) पुस्तके खरेदी, स्टेशनरी त्याच बरोबर अभ्यास दौरा या खर्चाकरिता . – वार्षिक १५,००० रुपये
● शिष्यवृत्ती कालावधी: – २ वर्षे
● महत्वाचे
ही शिष्यवृत्ती फक्त भारतात पीएच.डी. अभ्यासक्रम करण्याकरिता भारतातील त्याच बरोबर इतर आशियाई देशातील विद्यार्थ्यांकरता आहे.
● शिष्यवृत्ती करिता पात्र अभ्यासक्रम :-
ज्या उमेदवारांनी खालीलपैकी कोणत्याही एका क्षेत्रात पीएच.डी. अभ्यासक्रमात प्रवेश घेतला असेल तर असे उमेदवार शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात.
भारतीय इतिहास आणि सभ्यता
समाजशास्त्र
धर्म आणि संस्कृती तुलनात्मक अभ्यास
अर्थशास्त्र
भूगोल
तत्वज्ञान
पर्यावरणशास्त्र आणि पर्यावरण
● पात्रता निकष:-
शिष्यवृत्तीसाठी अर्ज करतांना उमेदवाराने पुढे नमूद केलेल्या पात्रता अटी पूर्ण करायला हव्यात.
१) पदवी आणि पदव्युत्तर स्तरामध्ये किमान 60% गुणांसह प्रथम श्रेणीमध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली असावी.
२) भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठ / महाविद्यालयात पीएच.डी. साठी नोंदणी केली आहे किंवा प्रवेश घेतला आहे असे उमेदवार शिष्यवृत्ती अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.. ज्यांनी पीएच.डी. प्रवेश नोंदणीसाठी अर्ज केला आहे आणि शिष्यवृत्ती अर्ज सादर करताना अद्यापही ज्यांचा पीएच.डी. प्रवेश कन्फर्म झालेला नाही असे उमेदवार शिष्यवृत्ती करिता अर्ज करण्यास पात्र नाहीत.
३) अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ३५ वर्षांपेक्षा जास्त नसावे,
४) पूर्णवेळ पीएच.डी. करिता प्रवेश घेतला असावा.
● आवश्यक कागदपत्र: –
(१) अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो फॉर्मवर चिकटवावा.
(२) शिष्यवृत्ती अर्जात नमूद केल्याप्रमाणे सिनॉपसिस रिपोर्ट
३) डॉक्टरल मॉनिटरिंग कमिटीचा अहवाल किंवा पर्यवेक्षकाचा अहवाल /
शिफारस पत्र.
४) पोस्टल ऑर्डर / १०० रुपयांचा डिमांड ड्राफ्ट.
५) पीएच.डी. नोंदणी प्रमाणपत्र
● अर्ज कसा करावा:
www.jnmf.in या वेबसाइटवरून अर्ज डाउनलोड करा. जवाहरलाल नेहरू मेमोरियल फंड, किशोर मुर्ती हाऊस, नवी दिल्ली यांच्या नावाने बनवलेला १०० रुपयांचा डिमांड ड्राफ्ट किंवा पोस्टल मनीऑर्डर आणि सर्व आवश्यक कागदपत्रे अर्जासह , जवाहरलाल नेहरू स्मारक यांना पोस्टद्वारे कार्यालयाच्या पत्तावर पाठवणे.
● संपर्क माहिती: –
प्रशासकीय सचिव
जवाहरलाल नेहरू मेमोरियल फंड
किशोर मुर्ती हाऊस
नवी दिल्ली -११० ०११
फोन: + 91-11-23013641 +91-11-23017173 + 91-11-23018087
फॅक्स: ०११२३०१११०२
ईमेल: jnmf1964@gmail.com
वेबसाइट: – www.jnmf.in