जर्मन चान्सलर फेलोशिप

◆ फेलोशिप बद्दल:
फेलोशिप प्रोग्राम फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनीच्या फेडरल चॅन्सेलरच्या अधिपत्याखाली येतो. प्रत्येक वर्षी एका देशातील कमाल दहा याप्रमाणे ६० फेलोना जर्मन चान्सलर फेलोशिप दिली जाईल.

◆ अंतिम तारीख:
प्रत्येक वर्षातील १५ मार्च ते १५ ऑक्टोबर

◆ फायदे:
१) प्रशिक्षण आणि करियर पातळीनुसार फेलोशिपच्या माध्यमातून महिन्याला २,१७० युरो, २,४७० युरो किंवा २,७७० युरो दिले जातील.
२) फेलोशिपपूर्वी भाषिक कोर्स.
३) जर्मनीत वास्तव्यादरम्यान वयक्तिक साहाय्य
४) अधिकची आर्थिक मदत. जसे, प्रवास खर्च, वैयक्तिक आरोग्य विमा
५) जर्मन भाषेचा कोर्स.
६) संयुक्त कार्यक्रमात आपल्या वर्षाच्या गटातील इतर मित्रांसह व्यावसायिक आणि वैयक्तिक सांस्कृतिक सांस्कृतिक देवाणघेवाण करता येईल. तसेच जर्मन संस्कृती आणि समाजाबद्दल अधिक माहिती.
७) जर्मनीत दोन आठवड्यांची शैक्षणिक सहल. त्याचप्रमाणे जेथे आपण इतर फेलोसोबत जोडले जाऊ आणि जर्मन व्यवसाय आणि संस्थेच्या प्रतिनिधींना भेटता येईल असे विविध कार्यक्रम
८) आपल्या होस्ट संस्थेस संशोधन खर्चासाठी ५०० युरो मासिक भत्ता म्हणून मिळेल.

◆ पात्रता निकष:
१) ब्राझील, चीन, भारत, रशिया, साऊथ आफ्रिका किंवा अमेरिका या देशांचे नागरिकत्व धारण केलेले असावे.
२) राजकारण, व्यवसाय, मीडिया, प्रशासन, समाज किंवा संस्कृती यासारख्या क्षेत्रात काम आणि सुरुवाती टप्यातील नेतृत्त्वाचा अनुभव.
३) पदवी धारण केलेली असावी (कमाल १२ वर्षांपूर्वी)
४) आपल्या निवडलेल्या होस्ट सोबत जर्मनीमध्ये स्वतंत्रपणे प्रकल्प विकसित करणे आवश्यक.
५) इंग्रजी आणि/अथवा जर्मनीचे उत्तम ज्ञान असावे.

◆ अर्ज करण्याची प्रक्रिया:-
१) प्रेरणा पत्र: आपण इथवर कसे आलात, आपल्याकडे कोणता नेतृत्वाचा अनुभव आहे आणि आपल्या करिअरची उद्दीष्टे कोणती आहेत हे आम्हाला सांगा
२) प्रकल्प योजनाः आपण तयार केलेल्या प्रकल्पाची रूपरेषा तयार करा आणि अर्ज करण्यापूर्वी आपल्या इच्छित होस्टशी सहमती घ्या. आपला प्रकल्प सामाजिकदृष्टीने का महत्त्वाचा आहे आणि याच्या माध्यमातून आपल्या देशाचे आणि जर्मनीचे संबंध कसे दृढ होतील?
३) आपल्या होस्ट कडून कारारासाहित एक्सटेनसिव्ही स्टेटमेंट
४) दोन वेगवेगळ्या व्यक्तींकडून दोन शिफारस पत्र (१२ महिन्याहुन जुने नको) ज्यात तुमच्या व्यावसायिक, वैयक्तिक आणि / किंवा शैक्षणिक पार्श्वभूमी नमूद केलेली असेल.

◆ अर्ज करण्यासाठी लिंक
https://www.humboldt-foundation.de/en/apply/sponsorship-programmes/german-chancellor-fellowship

◆ संपर्क:-

 1. पत्ता:
  मुख्य कार्यालय
  बॉन मधील हमबोल्ट फाऊंडेशन,
  जीन पॉल मार्ग १२, ५३१७३ बॉन, जर्मनी
  +४९ २२८ ८३३-०
  +४९ २२८ ८३३-१९९
  info[at]avh.de

बर्लिन मधील कार्यालय
बर्लिन मधील हमबोल्ट फाऊंडेशन,
विसनशाफ्ट फोरम,
मार्कग्राफेन मार्ग ३७, १०११७ बर्लिन, जर्मनी
+४९ २२८ ८३३-०
+४९ ३० २०४ ५५५-३९
berlin[at]avh.de

 1. वेबसाईट: www.humboldt-foundation.de

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *