फेडेरल बँक होर्मिस मेमोरियल फाउंडेशन शिष्यवृत्ती

◆ अर्ज करण्याची अंतिम दिनांक : ३१ डिसेंबर २०२१

◆ शिष्यवृत्तीची रक्कम : रुपये १ लाखापर्यंत प्रतिवर्ष शिष्यवृत्ती

◆ शिष्यवृत्तीचा तपशील :
निवड झालेल्या विद्यार्थ्यांना कॉलेजची १००% शिकवणी फी आणि फी स्ट्रक्चरनुसार देय इतर शुल्काची रक्कम अदा केली जाईल.
कॉलेजचे फी स्ट्रक्चर १ लाखापेक्षा जास्त असेल तर फक्त १ लाख रुपयांपर्यंतच शिष्यवृत्ती मिळेल.
या शिष्यवृत्ती अंतर्गत विद्यार्थ्यांना एक कम्प्युटर किंवा लॅपटॉप घेण्याकरिता
जास्तीत जास्त ४०,००० रुपये दिले जातील परंतु एकूण शिष्यवृत्ती रक्कम प्रती वर्षी १ लाख रुपयांच्या पेक्षा जास्त मिळणार नाही

◆ पात्रता :
१) महाराष्ट्र, केरळ, गुजरात, आणि तामिळनाडू या राज्यातील विद्यार्थी या शिष्यवृत्तीस पात्र असतील.
२) या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ३ लाखांपेक्षा जास्त नसावे.
३)शहीद सशस्त्र सैन्य दलाच्या कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी वार्षिक उत्पन्नाची अट (निकष) लागू होणार नाही.
४) नुकतेच पुढील कोर्सेसच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेतलेले विद्यार्थी या शिष्यवृत्तीस पात्र असतील:- एमबीबीएस, बीएससी नर्सिंग, इंजिनिअरिंग, एमबीए, बीएससी ऍग्रीकल्चर सायन्स, बीएससी कोऑपरेशन आणि बॅंकिंग

◆ आवश्यक कागदपत्र :
१) प्रवेश पत्राची प्रत (ऍडमिशन लेटर)
२) कॉलेजच्या बोनफाईड प्रमाणपत्राची प्रत
३) कॉलेजच्या फी स्ट्रक्चरची प्रत
४) बारावीच्या मार्कशीटची प्रत
५) सीजीपीए आणि ग्रेडचे टक्केवारीत रूपांतर करण्यासाठी संबंधित विद्यापीठाच्या निर्णयाची प्रत
(एमबीए अर्जदारांसाठी अनिवार्य)
६) कौटुंबिक उत्पन्नाच्या दाखल्याची प्रत
७) जन्म प्रमाणपत्राची प्रत.
८) ओळखीचा पुरावा आणि पत्त्याच्या पुराव्याची प्रत
९) वैद्यकीय प्रमाणपत्रांची प्रत (शारीरिकदृष्ट्या अपंग विद्यार्थ्यांसाठी )
१०) सशस्त्र सैन्य दलाचे कर्मचारी देशाची सेवा करताना शहीद झाले असल्यास त्यांच्या मुलांना या शिष्यवृत्तीचा लाभ घेता यावा यासाठी त्यासंबंधित पुरावा.
११) डोमासाईल सर्टिफिकेट

◆ संपर्क :
ईमेल आयडी: csr@federalbank.co.in

◆ वेबसाईट : www.federalbank.co.in

◆ नोटिफिकेशन डाऊनलोड करण्याकरिता लिंक :-https://drive.google.com/file/d/1PRBchj6smVeO5XUIrFnJ7xKmvcv-7mKF/view?usp=drivesdk

◆ अर्ज करण्यासाठी लिंक : https://forms.office.com/r/vxgxhDRMWi

◆ अर्ज करण्याची प्रक्रिया:-
1) खालील लिंकद्वारे शिष्यवृत्ती अर्ज करा https://forms.office.com/r/vxgxhDRMWi
2) ऑनलाइन सबमिट केलेल्या अर्जाची प्रिंटआउट घ्या.
3) बँकेकडून मेलद्वारे सूचना मिळाल्यावर, आवश्यक कागदपत्र वर नमूद केल्याप्रमाणे अर्जाच्या प्रिंट आऊटसह जवळच्या फेडरल बँकेच्या शाखेला भेट द्या.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *