सिमेन्स शिष्यवृत्ती

◆ शिष्यवृत्ती बद्दल:-
सिमेन्स कंपनीने “सिमेन्स शिष्यवृत्ती” कार्यक्रमाची ९ वी आवृत्ती सुरू केली आहे. दुहेरी शिक्षणाच्या जर्मन मॉडेलवर आधारित, हा शिष्यवृत्ती कार्यक्रम विद्यार्थ्यांना उद्योग-सज्ज अभियंता बनण्यास आणि अभियांत्रिकी, R&D किंवा उत्पादन क्षेत्रात शाश्वत करिअर सुरू करण्यास सक्षम करतो. या शिष्यवृत्ती कार्यक्रमांतर्गत, सिमेन्स पात्र गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करते. याशिवाय, इंटर्नशिप, मेकॅट्रॉनिक्स, सॉफ्ट स्किल्स ट्रेनिंग, प्रोजेक्ट्स आणि सीमेन्स द्वारे प्रदान करण्यात येणारे मार्गदर्शन देखील या उज्ज्वल मनांना उद्योगाच्या गतिशीलतेशी परिचित करतील, ज्यामुळे त्यांचा सर्वांगीण विकास होईल. शिष्यवृत्ती कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी पदवीच्या चार वर्षांमध्ये उपलब्ध आहे आणि ५०% शिष्यवृत्ती मुलींसाठी राखीव आहे. २०२१ पर्यंत, भारतातील २६ राज्यांमधील ९३ सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालयातील ९३५ विद्यार्थी सीमेन्स शिष्यवृत्ती कार्यक्रमाचा भाग बनले आहेत.

◆ शिष्यवृत्तीचे फायदे:
1) ट्युशन (शिकवणी) फी आणि पुस्तके, स्टेशनरी, वसतिगृह, अतिरिक्त वर्ग इत्यादीसाठी काही रक्कम दिली जाईल.
2) सीमेन्स आणि इतर बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये इंटर्नशिपसह सर्वांगीण विकास कार्यक्रम.

◆ ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- १० जानेवारी २०२१

◆ पात्रता :-
१) शासकीय अभियांत्रिकी कॉलेजमधील प्रथम वर्षांचे पुढील शाखेतील विद्यार्थी शिष्यवृत्तीकरिता अर्ज करण्यास पात्र आहेत :

  • मॅकेनिकल/प्रोडक्शन
  • इलेक्ट्रिकल
  • इलेक्ट्रॉनिक्स
  • इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेश
  • कम्प्युटर सायन्स/इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी
  • इन्स्ट्रुमेंटेशन
    २) वयोमर्यादा : २० वर्षांपर्यंत
    ३) दहावीत किमान ६०% व बारावीत किमान ५०% गुणांसह पीसीबी गृप मध्ये किमान ६०% गुण प्राप्त केलेले विद्यार्थीच शिष्यवृत्तीसाठी पात्र असतील
    ४) कुटुंबाचे वार्षिक आर्थिक उत्पन्न २ लाखांपेक्षा जास्त नसावे.

◆ संपर्क
ईमेल आयडी –
corporate.citizenship.in@siemens.com

◆ ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंक :
https://www.ssp-india.co.in/scholarship/apply

◆ शिष्यवृत्ती विषयक अधिक माहितीकरिता :-
https://new.siemens.com/in/en/company/sustainability/corporate-citizenship/siemens-scholarship-program.html

◆ नोटिफिकेशन डाऊनलोड करण्याकरिता :-
https://drive.google.com/file/d/1Mq2rTMzbnITptjTIPsNpeZeG3KBcwIiC/view?usp=drivesdk

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *