शिष्यवृत्तीबद्दल :
लीला पूनावाला फाउंडेशनकडून गुणवंत आणि आर्थिकदृष्ट्या गरजू विद्यार्थिनींना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती तसेच स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग दिले जाते.
२०२६-२७ या शैक्षणिक वर्षात उच्च शिक्षणाच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेतलेल्या भारतीय विद्यार्थिनींना या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येतो.
पुणे, अमरावती, वर्धा, हैदराबाद आणि बेंगळुरू या ठराविक जिल्ह्यांतील विद्यार्थिनींना या उपक्रमातून बी.ई./बी.टेक, नर्सिंग, बी.एस्सी., बी.फार्मसी, पोस्ट ग्रॅज्युएशन आणि इतर पात्र कोर्ससाठी आर्थिक मदत दिली जाते.
या शिष्यवृत्तीचा मुख्य उद्देश आर्थिक परिस्थिती कमकुवत असलेल्या गुणवंत विद्यार्थिनींना त्यांचे उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी मदत करणे हा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
कोर्स आणि जिल्ह्यानुसार अर्ज करण्याची शेवटची तारीख वेगवेगळी आहे.
पात्र कोर्स :
- बी.ई. / बी.टेक
- डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग (डिप्लोमानंतर)
- बी.एस्सी. नर्सिंग
- बी.एस्सी. (सायन्स)
- पोस्ट ग्रॅज्युएशन:
- कॉम्प्युटर सायन्स
- कॉम्प्युटर ॲप्लिकेशन
- डेटा सायन्स
- एम.एस्सी. न्यूट्रिशन अँड हेल्थ सायन्सेस
- नर्सिंग
- मास्टर ऑफ हेल्थकेअर ॲडमिनिस्ट्रेशन
- एम.टेक
- एम.ई.
- बी.फार्मसी
- जी.एन.एम.
शिष्यवृत्तीचे फायदे :
- पुण्यातील इंजिनिअरिंग (बी.ई./बी.टेक) आणि डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग विद्यार्थिनींना दरवर्षी ₹५०,००० पर्यंत शिष्यवृत्ती.
- अमरावती आणि वर्धा येथील इंजिनिअरिंग (बी.ई./बी.टेक) आणि डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग विद्यार्थिनींना दरवर्षी ₹४५,००० पर्यंत शिष्यवृत्ती.
- हैदराबाद येथील इंजिनिअरिंग (बी.ई./बी.टेक) आणि डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग विद्यार्थिनींना दरवर्षी ₹६०,००० पर्यंत शिष्यवृत्ती.
- बेंगळुरू येथील इंजिनिअरिंग (बी.ई./बी.टेक) विद्यार्थिनींना दरवर्षी ₹७०,००० पर्यंत शिष्यवृत्ती.
- पुणे, अमरावती आणि वर्धा येथील बी.एस्सी. नर्सिंग विद्यार्थिनींना दरवर्षी ₹८०,००० पर्यंत शिष्यवृत्ती.
- पुण्यातील बी.एस्सी. (सायन्स) विद्यार्थिनींना दरवर्षी ₹४०,००० पर्यंत शिष्यवृत्ती.
- पुण्यातील पोस्ट ग्रॅज्युएशन विद्यार्थिनींना दरवर्षी ₹६०,००० पर्यंत शिष्यवृत्ती.
- पुण्यातील बी.फार्मसी विद्यार्थिनींना दरवर्षी ₹५०,००० पर्यंत शिष्यवृत्ती.
- पुण्यातील जी.एन.एम. विद्यार्थिनींना दरवर्षी ₹४०,००० पर्यंत शिष्यवृत्ती.
- स्किल बिल्डिंग ट्रेनिंग प्रोग्राम्स.
पात्रता :
- ही शिष्यवृत्ती फक्त भारतीय विद्यार्थिनींसाठी आहे.
- २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात ठराविक जिल्ह्यातील आणि पात्र कोर्समध्ये पहिल्या वर्षाला प्रवेश घेतलेला असणे आवश्यक आहे.
- विद्यार्थिनीच्या कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न ₹३,५०,००० पेक्षा जास्त नसावे.
- सरकारी फी रिइम्बर्समेंट जसे की महा-डीबीटी, तेलंगणा ई-पास किंवा एसएनक्यू कोटा यांचा लाभ घेतल्यानंतरही विद्यार्थिनीला भरावी लागणारी एकूण शैक्षणिक फी ₹२०,००० पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
- कॅशन मनी किंवा डिपॉझिटची रक्कम यामध्ये धरली जाणार नाही.
बी.ई. / बी.टेकसाठी
- दहावी आणि बारावीमध्ये किमान ७०% गुण असणे आवश्यक.
- जून २०२६ मध्ये वय २० वर्षांपेक्षा कमी असावे.
डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगसाठी
- दहावी आणि डिप्लोमामध्ये किमान ७०% गुण असणे आवश्यक.
- जून २०२६ मध्ये वय २१ वर्षांपेक्षा कमी असावे.
बी.एस्सी. नर्सिंगसाठी
- दहावी आणि बारावीमध्ये किमान ६०% गुण असणे आवश्यक.
- जून २०२६ मध्ये वय २० वर्षांपेक्षा कमी असावे.
बी.एस्सी. सायन्ससाठी
- दहावी आणि बारावीमध्ये किमान ७०% गुण असणे आवश्यक.
- जून २०२६ मध्ये वय २० वर्षांपेक्षा कमी असावे.
पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी
- ग्रॅज्युएशनमध्ये किमान ७०% गुण असणे आवश्यक.
- जून २०२६ मध्ये वय ३० वर्षांपेक्षा कमी असावे.
बी.फार्मसीसाठी
- दहावी आणि बारावीमध्ये किमान ७०% गुण असणे आवश्यक.
- जून २०२६ मध्ये वय २० वर्षांपेक्षा कमी असावे.
जी.एन.एम.साठी
- दहावी आणि बारावीमध्ये किमान ७०% गुण असणे आवश्यक.
- जून २०२६ मध्ये वय २० वर्षांपेक्षा कमी असावे.
आवश्यक कागदपत्रे :
- कुटुंबातील सर्व सदस्यांच्या उत्पन्नाचा पुरावा:
- आय.टी.आर. / फॉर्म-१६ / फॉर्म-२६ए.एस.
- नोकरीचा पुरावा आणि मागील ३ महिन्यांच्या पगाराच्या स्लिप
- तहसीलदारांनी दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र
- पेन्शन पेमेंटचा पुरावा आणि मागील ३ महिन्यांचे बँक स्टेटमेंट
- लागू असल्यास ७/१२ उतारा / जमीन पासबुक
- ४ पानांच्या ॲप्लिकेशन फॉर्मची झेरॉक्स
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्डची झेरॉक्स (पुढील आणि मागील बाजू)
- दहावी, बारावी, डिप्लोमा आणि/किंवा डिग्रीच्या मार्कशीटची झेरॉक्स
- शेवटच्या शैक्षणिक वर्षाचे लिव्हिंग सर्टिफिकेट
- प्रवेश परीक्षेचा निकाल
(एम.एच.-सी.ई.टी. / के.सी.ई.टी. / कॉमेड-के / ई.ए.पी.सी.ई.टी. / ई.सी.ई.टी. / नीट / जे.ई.ई. / ए.आय.ई.ई.ई. — लागू असल्यास) - कॅप अलॉटमेंट लेटर / कॉलेजने दिलेले ॲडमिशन लेटर
- कॉलेजची फी स्ट्रक्चर
- कॉलेजने दिलेल्या सर्व फी रिसीट
- हॉस्टेल फी रिसीट
- मेस फी रिसीट
अर्ज करण्याची पद्धत : हायब्रिड ( ऑनलाइन + ऑफलाइन )
ऑनलाइन अर्ज : https://lpfscholarship.com/LPFOnlineAPP/login
कॉन्टॅक्ट डिटेल्स :
पत्ता:
लीला पूनावाला फाउंडेशन, फिली व्हिला, १०१/१०२, सर्व्हे नं. २३, बालेवाडी, डी-मार्टजवळ, बाणेर, पुणे – ४११ ०४५
फोन: +९१ ८६६९९९८९८१, ८९५६६९७२१३
ई-मेल: lpfpunescholarship@lilapoonawallafoundation.com
Official Source: https://lpfscholarship.com/LPFOnlineAPP/login

