WEnyan शिष्यवृत्ती

◆ अंतिम तारीख :- 31 जुलै 2022

◆ शिष्यवृत्तीची रक्कम/फायदे: –  

– अंतिम वर्ष B.Sc./ B.Tech./ B.Pharm -10,000 ₹/ प्रतिमहिना शिष्यवृत्ती

– अंतिम वर्ष M.Sc./ M.Tech./ M.Pharm –  15,000 ₹/ प्रतिमहिना शिष्यवृत्ती

– पदवी किंवा पदव्युत्तर पदवी पुर्ण केलेल्या विदयाथींनी ( B.Sc./ B.Tech./ B.Pharm./ M.Sc./ M.Tech./ M.Pharm ) प्रोटोटाइप डेव्हलपमेंटसाठी  ₹/6.5 लाख (प्रारंभिक टप्प्यातील उद्योजक) + INR 15,000 प्रति महिना 6 महिन्यांसाठी

– या क्षेत्रातील अनुभवी महिलांसोबत संवादसत्र

– रसायनशास्त्र क्षेत्रातील नेतृत्व करणाऱ्या महिलांकडुन मार्गदर्शन मिळवण्याची संधी.

– भारतातील विज्ञान आधारित स्टार्टअपना भेट देण्याची संधी

– सदर क्षेत्रातील उदयोग व संशोधन प्रयोगशाळांना भेट देण्याची संधी

– रसायनशास्त्र  विषयातील उदयोग , शैक्षणिक, नव- उदयोग क्षेत्रातील  महिला तज्ञांकडून

त्यांच्या कामगिरीबदद्ल अनुभव ऐकण्याची संधी

-पुणे नॉलेज क्लस्टरच्या वूमन इन केमिस्ट्री & सस्टेनेबिलिटी या  व्याख्यानमालेच्या माध्यमातून रसायनशास्त्रातील नवीन संधींबद्दल माहिती मिळवण्याची संधी.  

◆ शिष्यवृत्ती बद्दल:-

WEnyan हा रसायनशास्त्र आणि संबंधित क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांसाठी शिष्यवृत्ती आणि मार्गदर्शन कार्यक्रम आहे. हया ‍कार्यक्रमासाठी BASF केमिकल्स इंडिया प्रा. लिमिटेड;कडुन आर्थिक  साहाय्य पुरवले जाते.  प्रधान वैज्ञानिक सल्लागार (GoI) कार्यालयाद्वारे मदत आणि पुणे नॉलेज क्लस्टरद्वारे सदर उपक्रम राबिवण्यात येतो.

WEnyan शिष्यवृत्ती कार्यक्रमाचा उद्देश महाराष्ट्रातील कमी उत्पन्न गटातील पात्र महिला उमेदवारांना निधी सहाय्य, मार्गदर्शन आणि उद्योजक कौशल्य विकास प्रदान करणे आहे.

ही शिष्यवृत्ती रसायनशास्त्र किंवा उपयोजित नैसर्गिक विज्ञान,स्पेशॅलिटी केमिकल्स, अॅग्रो-केमिकल्स, नवीन वस्तू व  शाश्वत विकास  यासारख्या संबंधित क्षेत्रातील मुलींसाठी खुली आहे.

◆ पात्र अभ्यासक्रम:-

अभ्यासक्रम स्तर: पदवी आणि पदव्युत्तर पदवी

अभ्यासक्रमाचे नाव : B.Sc./ B.Tech./ B.Pharm./ M.Sc./ M.Tech./ M.Pharm

◆ पात्रता निकष:-

खालील पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या विद्यार्थिनी शिष्यवृत्ती अर्जासाठी पात्र आहेत

1. महाराष्ट्रातील उपेक्षित समाजातील/कमी उत्पन्न गटातील मुली.

2. पदवीचे शिक्षण घेत असलेल्या किंवा पूर्ण केलेल्या मुली (B.Sc./B.Pharm./B.Tech./B.E. आणि समकक्ष पदवीचे अंतिम वर्ष) किंवा पदव्युत्तर पदवी (अंतिम वर्ष M.Sc./M. Pharm./M.Tech./ M.E आणि समकक्ष पदवी)

3. पदवी किंवा पदव्युत्तर पदवी मिळविल्यानंतर एका वर्षाच्या आत उद्योजिका होऊ इच्छिणाऱ्या मुली

◆ आवश्यक कागदपत्रे:-

1) संशोधन प्रकल्प किंवा उद्योजकता प्रकल्प प्रस्ताव

2) H.Sc. (12वी इयत्ता) मार्कशीट

3) शेवटच्या परीक्षेची मार्कशीट

4) उत्पन्न गट पुरावा (नॉन-क्रिमी लेयर प्रमाणपत्र किंवा उत्पन्न प्रमाणपत्र)

◆ अधिक माहितीसाठी लिंक:-

WEnyan Scholarship Program

 ◆ ऑनलाईन अर्जासाठी लिंक:-

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeB3myUNRIpuPiMvW-c_iQvIJ5MazlxFOpWmPwsy7DqCh3Frg/viewform

◆ संपर्क तपशील:-

पत्ता- तिसरा मजला, प्लेसमेंट सेल, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, गणेशखिंड रोड, गणेशखिंड, पुणे, महाराष्ट्र 411007

ईमेल- wenyan@pkc.org.incontact@pkc.org.in,

संपर्क व्यक्ती- Dr. Shilpa Jain, Program Manager, email- shilpa.jain@pkc.org.in

Dr. Anupma Harshal, Project Manager, email- anupmas@pkc.org.in

संपर्क क्रमांक – 7823892474 (10 am to 5 pm)

Phone: 020 2612 6296