रोटरी क्लब शिष्यवृत्ती

◆ शिष्यवृत्तीची रक्कम / फायदे:-
शैक्षणिक आर्थिक सहाय्य

◆ शेवटची तारीख:- ३१ ऑगस्ट २०२२

◆ शिष्यवृत्ती बद्दल:-
रोटरी क्लब ऑफ मुलुंड तर्फे , रोटरी क्लब DISCON व्होकेशनल लर्निंग स्कॉलरशिप प्रोग्राम अंतर्गत पात्र आणि गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते.

◆ पात्र अभ्यासक्रम:-
अभ्यासक्रमाचे नाव:

कोणताही अंडर ग्रॅज्युएशन कोर्सेस किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्सेस किंवा 10 वी किंवा 12 वी नंतरचे कोर्स जे विद्यार्थ्यांसाठी रोजगाराची संधी निर्माण करतात अशा कोर्सला प्रवेश घेतलेले किंवा सध्या अभ्यासक्रमाच्या कोणत्याही वर्षात शिक्षण घेणारे विदयार्थी शिष्यवृत्ती अर्ज करण्यास पात्र आहेत.
( I.T.I, अभियांत्रिकी पदवी किंवा डिप्लोमा, औषध, फार्मसी, पर्यटन, मास मीडिया, Bsc IT, MBA सारखे कोर्सेस )
**पात्र अभ्यासक्रमांबाबत तुमच्याकडे काही प्रश्न असल्यास कृपया संपर्क तपशील विभागात नमूद केलेल्या रोटरी क्लबच्या फोन नंबरवर संपर्क साधा किंवा Maxima च्या कोणत्याही सोशल मीडिया खात्यावर संपर्क साधा.

◆ पात्रता निकष:-
1) विद्यार्थ्यांसाठी रोजगाराची संधी निर्माण करणाऱ्या कोणत्याही अभ्यासक्रमात कोणत्याही वर्षांत शिक्षण घेणारे विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत.

◆ आवश्यक कागदपत्रे:-

  1. पासपोर्ट आकाराचा फोटो.
  2. आधार कार्ड.
  3. 10वी मार्कशीट.
  4. तुमच्या सध्याच्या घराचे वीज बिल.
  5. तुमच्या वडिलांची सॅलरी स्लिप किंवा बिझनेसमन असल्यास आयटी रिटर्न.
    (तहसीलदार उत्पन्नाचा दाखला मान्य नाही).
  6. 11वी/डिप्लोमा प्रथम वर्षाची मार्कशीट (लागू असल्यास).
  7. 12वी/डिप्लोमा द्वितीय वर्षाची मार्कशीट (लागू असल्यास).
  8. डिप्लोमा तिसऱ्या वर्षाचे / पदवी प्रथम वर्षाचे मार्कशीट (लागू असल्यास)
  9. पदवी 2रे, 3रे आणि 4थ्या वर्षाचे मार्कशीट (लागू असल्यास).

◆ शिष्यवृत्ती प्रक्रिया:-
1) ऑनलाइन अर्ज
2) वैयक्तिक मुलाखत

◆ अधिक माहितीसाठी लिंक:-
https://sites.google.com/site/mulundrotaryvls/apply-for-vls

◆ ऑनलाईन अर्जासाठी लिंक:-
https://docs.google.com/forms/d/1vqhndjLQm0ykvviNPpSdTyWC6ed-tZtiQGrWq_BLYcg/viewform?edit_requested=true

◆ टीप:-

  • ही शिष्यवृत्ती परदेशी शिक्षणासाठी दिली जात नाही.
  • ज्या अभ्यासक्रमांचे वार्षिक शुल्क शुल्क रु.3 लाखापेक्षा जास्त आहे अशा अभयसक्रमाकरिता शिष्यवृत्ती दिली जात नाही.
  • ही शिष्यवृत्ती व्याजमुक्त कर्जाच्या स्वरूपात आहे, जेणेकरून विद्यार्थी नोकरीत रुजू झाल्यानंतर कर्ज शिष्यवृत्तीची रक्कम हप्त्यांमध्ये परत करणे अपेक्षित आहे.
  • ही शिष्यवृत्ती शालेय शिक्षणासाठी दिली जात नाही.
  • संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात. परंतु शिष्यवृत्तीसाठी मुलुंड आणि आसपास राहणाऱ्या किंवा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल.
  • शिष्यवृत्तीसाठी किमान गुणांचे कोणतेही निकष नाहीत.
  • तसेच शिष्यवृत्तीसाठी कोणतेही कमाल कौटुंबिक उत्पन्नाचे निकष नाहीत.

◆ शिष्यवृत्तीबद्दल माहितीसाठी रोटरी क्लब ऑफ मुलुंड युट्युब चॅनलला भेट द्या:-
https://www.youtube.com/channel/UC7VuDAtiQUMYpcbDS3k3BVQ

◆ संपर्क तपशील:-
पत्ता- रोटरी क्लब ऑफ मुलुंड, 5060, भांडुप इंड. इस्टेट, पन्नालाल कंपाऊंड, एलबीएस रोड, भांडुप पश्चिम, मुंबई 400078
दूरध्वनी: 02249724760, 02240159411, 02240159509, 02240154859
Email: vlsrotarymulund@gmail.com,
What’sApp:97690-79853, 83560 12866
संपर्क व्यक्ती- सुधीर जोशी: 83560 12866, राजेश गुप्ता: 80970 20280, राजेश अग्रवाल: 98200 65990, निर्मल गणात्रा: 9819719495