नॅशनल ओव्हरसीज शिष्यवृत्ती

◆ शेवटची तारीख:- ३१ जुलै २०२२

◆ शिष्यवृत्ती बद्दल:-

नॅशनल ओव्हरसीज स्कॉलरशिपच्या माध्यमातून  एसटी कॅटेगिरीमधील  विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी अर्थसहाय्य दिले जाते.  ही शिष्यवृत्ती आदिवासी कार्य मंत्रालयाची केंद्रीय क्षेत्र योजना आहे आणि दरवर्षी 20 नवीन ST कॅटेगिरीमधील विद्यार्थ्यांना परदेशात पदव्युत्तर पदवी, पीएचडी, पोस्ट-डॉक्टरेट अभ्यासक्रम करण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते.

◆ शिष्यवृत्तीची रक्कम / फायदे:-

1) रीसर्च / टीचिंग असिस्टंटशिप  –

अमेरिकेतील शिक्षणाकरिता वार्षिक 2400 यूएस डॉलर्स पर्यंत असिस्टंटशिप तसेच

युनायटेड किंगडममधील शिक्षणाकरिता  1560 पाउंड  प्रतिवर्ष. इतर देशांतील  शिक्षणाकरिता 2400 यूएस डॉलर प्रतिवर्ष इतकी रक्कम दिली जाईल. 

2) शिष्यवृत्तीसाठी  निवडलेल्या उमेदवारांना  TOEFL/GRE/GMAT परीक्षा कोचिंग घेण्यासाठी मदत केली  जाईल.

3) वार्षिक देखभाल भत्ता

अमेरिकेतील शिक्षणाकरिता वार्षिक  देखभाल भत्ता यूएस डॉलर 15,400 ($ पंधरा हजार चारशे फक्त) असेल आणि युनायटेड किंगडममधील शिक्षणाकरिता   9,900 पाउंड (फक्त नऊ हजार नऊशे) त्याचबरोबर  इतर देशांतील शिक्षणाकरिता  यूएस डॉलर 15,400  इतकी रक्कम  दिली जाईल. .

4) वार्षिक आकस्मिकता आणि उपकरणे भत्ता

पुस्तके/आवश्यक उपकरणे/अभ्यास दौरा/टायपिंग आणि थीसिसचे बायडिंग  इत्यादींसाठी वार्षिक आकस्मिकता आणि उपकरणे भत्ता अमेरिकेतील शिक्षणाकरिता $1532 (केवळ यूएस डॉलर्स एक हजार पाचशे बत्तीस) असेल आणि युनायटेड किंगडममधील शिक्षणाकरिता £ 1116 असेल (एक हजार एकशे सोळा पाऊंड ) इतर देशांमधील, शिक्षणाकरिता 1532 यूएस डॉलर भत्ता दिला जाईल..

6) व्हिसा शुल्क- भारतीय रुपयांमध्ये  व्हिसा शुल्क दिले जाईल.

7) आकस्मिक प्रवास खर्च – यूएस डॉलर 18.70 पर्यंत  आकस्मिक प्रवास खर्च दिला जाईल.

८) फी :- अभ्यासक्रमाची  जी काही शैक्षणिक फी असेल ती संपूर्ण फी दिली जाईल.

9) वैद्यकीय विमा प्रीमियमची जी काही रक्कम असेल ती रक्कम दिली जाईल.

10) परदेशात जाण्याकरिता आणि  परत  येण्याकरिताचा  विमान प्रवासाचा  इकॉनॉमी क्लासचा खर्च दिला जाईल.

11) मुलाखतीकरिता  उपस्थित राहण्यासाठी देशांतर्गत  होणारा  प्रवास खर्च दिला जाईल.

◆ पात्र अभ्यासक्रम आणि अभ्यासाचे क्षेत्र :-

पुढे नमूद केलेल्या क्षेत्रात पोस्ट-डॉक्टरेट संशोधन किंवा पीएचडी किंवा पदव्युत्तर पदवीसाठी प्रवेश घेणारे विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत

इंजिनीरिंग

मॅनेजमेंट

इकोनॉमिक्स  / फायनान्स

प्युर सायन्स

अप्लाइड सायन्स

ऍग्रीकल्चरल

मेडिसीन

ह्युमॅनिटी

सोशल सायन्स

◆ शिष्यवृत्तीचा कालावधी:-

1) पोस्ट-डॉक्टरेट संशोधन-दीड वर्षे

2) Ph.D साठी- 4 वर्ष

३) पदव्युत्तर पदवीसाठी – अभ्यासक्रमाच्या कालावधीनुसार १/२/३ वर्षे (एक/दोन/तीन वर्षे).

◆ पात्रता निकष:-

1) पोस्ट-डॉक्टरेट  शिष्यवृत्तीसाठी: संबंधित पदव्युत्तर पदवी आणि पीएच.डी.मध्ये किमान 55% गुण किंवा समतुल्य ग्रेड प्राप्त करणारा उमेदवार शिष्यवृत्ती अर्जासाठी पात्र आहे.

2) पीएचडी शिष्यवृत्तीसाठी: संबंधित पदव्युत्तर पदवीमध्ये किमान 55% गुण किंवा समतुल्य ग्रेड प्राप्त करणारा उमेदवार शिष्यवृत्ती अर्जासाठी पात्र आहे.

3) पदव्युत्तर पदवी शिष्यवृत्तीसाठी: संबंधित बॅचलर पदवीमध्ये किमान 55% गुण किंवा समतुल्य ग्रेड प्राप्त करणारा उमेदवार शिष्यवृत्ती अर्जासाठी पात्र आहे.

4) फक्त ST श्रेणी किंवा विशेषतः असुरक्षित आदिवासी गटातील विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत.

◆ टीप:-

– शिष्यवृत्तीचा लाभ कुटुंबातील फक्त  एका विदयार्थ्याला  मिळू शकतो.

– उमेदवाराचे वय 1 जुलै 2022 रोजी 35 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

– सर्व स्रोतांमधून उमेदवाराचे एकूण कौटुंबिक उत्पन्न रु. ६,00,000/- ( सहा लाख ) पेक्षा जास्त नसावे.

– शिष्यवृत्तीसाठी अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल,

– शिष्यवृत्तीसाठी निवडलेल्या  विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती करीता  निवड झालेल्या तारखेपासून  दोन वर्षांच्या आत   परदेशातील मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेत    प्रवेश मिळवने आवश्यक आहे. अन्यथा  शिष्यवृत्ती आपोआप रद्द  होईल.

◆ आवश्यक कागदपत्रे:-

1) पासपोर्ट आकाराचा फोटो

2) 10वी बोर्ड प्रमाणपत्र

3) ST कॅटेगिरी  प्रमाणपत्र

4) उत्पन्नाचा दाखला

5) (ITR/फॉर्म16), लागू असल्यास: मूल्यांकन वर्ष 2022-23

6) मार्कशीट

पोस्ट-डॉक्टरल शिष्यवृत्तीसाठी: पदव्युत्तर पदवी [एकत्रित ग्रेड शीटसह सर्व वर्षे/सेमिस्टर मार्कशीट] आणि पीएच.डी प्रदान केलेले प्रमाणपत्र.

पीएचडी शिष्यवृत्तीसाठी: पदव्युत्तर पदवी [एकत्रित ग्रेड शीटसह सर्व वर्षे/सेमिस्टर मार्कशीट]

पदव्युत्तर पदवी शिष्यवृत्तीसाठी: पदवी [एकत्रित ग्रेड शीटसह सर्व वर्षे/सेमिस्टर मार्कशीट]

7) PVTG (विशेषतः असुरक्षित आदिवासी गट) प्रमाणपत्र – लागू असल्यास

◆ अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाइन

◆ निवड प्रक्रिया:-

– ऑनलाइन अर्ज

– वैयक्तिक मुलाखत

◆ शिष्यवृत्ती नोटीफिकेशन डाउनलोड करण्यासाठी लिंक:-

https://drive.google.com/drive/folders/148YN1cQrtdKIGtdFCPKGY4RjLJ6BJqq1?usp=sharing

◆ ऑनलाईन अर्जासाठी लिंक:-

https://overseas.tribal.gov.in/AboutUs.aspx

◆ संपर्क तपशील:-

संपर्क व्यक्ती: श्री. मनोज कुमार सिंग (उपसचिव-शिष्यवृत्ती विभाग)

फोन: ०११-२३३४०२७०

पत्ता: गेट क्रमांक ३, तळमजला, जीवन तारा बिल्डिंग, अशोका रोड, पटेल चौक, नवी दिल्ली -११००१

टेकनिकल तक्रारींकरिता  संपर्क-

तक्रार करण्याकरिता : https://tribal.nic.in/Grievance

संपर्क क्रमांक : ०११-२३३४५७७०

ईमेल: fellowship-tribal@nic.in