महात्मा ज्योतिबा फुले संशोधन फेलोशिप

◆ फेलोशिप बद्दल:-
या योजने अंतर्गत भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठ / महाविद्यालय / संस्था यामध्ये कोणत्याही विषयात पूर्णवेळ व नियमितरित्या पीएचडी करणाऱ्या महाराष्ट्रातील इतर मागासवर्ग प्रवर्गीय (ओ.बी.सी.), विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील नॉन क्रीमिलेयर मधील उमेदवारांना अर्थ सहाय्य देण्यात येणार आहे.

अर्जदार:– पीएचडी करणारे विद्यार्थी

◆ फेलोशिप रक्कम:– ३१,००० प्रती महिना

◆ अर्ज करण्याची अंतिम तारीख:– १५ जुलै २०२१

◆ फेलोशिप फायदे:-
१. ३१,००० प्रती महिना रक्कम
२. आकस्मित खर्च (१२००० सामाजिक शास्त्रे /वाणिज्य /व्यवस्थापन व इतर शाखांसाठी & १२००० विज्ञान/ अभियांत्रिकी /तंत्रज्ञान/ कृषी तंत्रज्ञान शाखांसाठी)
३. सहाय्यक भत्ता दिव्यांग व्यक्ती करिता दोन हजार रुपये प्रति महिना.

◆ निवड प्रक्रिया:
१. उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे सादर करावे.
२. उमेदवारांच्या कागदपत्रांच्या छाननी अंती मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी महाज्योतीच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल.
३. उमेदवारांची विषय तज्ञांमार्फत मुलाखत घेण्यात येईल, अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना व्यक्तीशः तसेच महाज्योतीच्या संकेतस्थळावरून नावे जाहीर करण्यात येईल.

◆ पात्रता निकष:
१. उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा तसेच इतर मागास प्रवर्गीय (ओ.बी.सी.), विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा.
२. उमेदवार उत्पन्नाच्या नॉन क्रिमीलेअर गटातील असावा.
३. उमेदवारने पदव्युत्तर पदवी परीक्षा ही मान्यताप्राप्त विद्यापीठ / महाविद्यालय / संस्थामार्फत उत्तीर्ण केलेली असावी.
४. उमेदवाराने पीएचडी पदवी अभ्यासक्रम करण्याकरिता भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठ / महाविद्यालय/ संस्था येथे नोंदणी केलेली असावी. नोंदणी नसलेली व्यक्ती योजनेच्या लाभाकरिता अर्ज करण्यास पात्र राहणार नाही.
५. उमेदवारास पीएचडी पदवी धारण करण्याकरिता यापूर्वी विद्यापीठ अनुदान आयोग / इतर सहाय्य करणाऱ्या संस्था / महाविद्यालय / संस्था / शासन यांचेकडून अर्थसहाय्य अथवा अधिछात्रवृत्ती मिळत असल्यास असे उमेदवार या योजनेच्या लाभाकरिता पात्र राहणार नाही. (माहिती लपूवन चुकीचा लाभ घेतल्याचे आढळल्यास योग्य त्या कार्यवाहीस पात्र ठरतील)
६. ज्या उमेदवारांना सारथी कडून आर्थिक सहाय्य मंजुर झाले आहे ते विद्यार्थी या योजनेस पात्र ठरणार नाहीत.
७. उमेदवार पीएचडी करीत असलेल्या कालावधीत कोणत्याही स्वरूपाचा पूर्णवेळ अथवा अर्धवेळ रोजगार स्वयंरोजगार करीत असल्यास किंवा कोणत्याही प्रकारचे अर्थसहाय्य / मानधन /शिष्यवृत्ती घेत असल्यास असे उमेदवार या योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहणार नाही.
८. उमेदवाराने विद्यापीठ / संस्था / महाविद्यालयात पीएचडी करीता एप्रिल २०१७ नंतर नोंदणी केलेली आहे, असे उमेदवार या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत.
९. अर्ज करतांना मार्गदर्शक व संशोधन केन्द्र प्रमुखाचे संयुक्त प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करणे बंधनकारक आहे.

◆ आवश्यक विवरणपत्रे / कागदपत्रे:
१. रुजू प्रमाणपत्र – लाभार्थ्याने विद्यापीठ / संस्था/ महाविद्यालयाचे रुजू प्रमाणपत्र (मार्गदर्शक व संशोधन केंद्र प्रमुख यांच्या संयुक्त स्वाक्षरीचे) इतर सर्व आवश्यक कागदपत्रांसोबत महाज्योतीस सादर करावे, जे उमेदवार अंतिम निवड होण्याआधी रोजगार करीत असतील त्यांनी रोजगार करीत असलेल्या आस्थापनेने कार्यमुक्त केल्याचा अहवाल रुजू प्रमाणपत्र सोबत सादर करावा.
२. अर्धवार्षिक प्रगती अहवाल – लाभार्थ्याने संशोधनाचा प्रगती अहवाल नोंदणीच्या दिनांकापासून दर ६ महिन्यांनी सादर करणे आवश्यक आहे.
३. मुदतवाढ प्रमाणपत्र – विद्यापीठ / महाविद्यालय / संस्था यांनी पीएचडी करिता मुदतवाढ दिली असल्यास मुदतवाढ प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
४. हजेरी प्रमाणपत्र – मार्गदर्शकांकडून हजेरी प्रमाणपत्र प्रमाणित करून देणे बंधनकारक आहे.
५. संशोधन पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र / सुरु असल्याचे प्रमाणपत्र
६. पीएचडी घोषित झाल्याचे सूचनापत्र / पीएचडी नोंदणी प्रमाणपत्र
७. फोटो आणि स्वाक्षरी स्कॅन कॉपी.
८. जात प्रमाणपत्र
९. नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र
१०.ओळखपत्र – आधार/पॅन/ वाहन परवाना/पासपोर्ट.
११ संशोधन अहवाल

◆ ऑनलाईन अर्ज करण्याकरिता लिंक:-
https://mahajyoti.org.in/registration/fellowship_updated2021/step1.php?msg=0

◆ संपर्क तपशील :-
ईमेल: fellowship2021@mahajyoti.org.in
मोबाईल: 7066888845
वेबसाईट – https://mahajyoti.org.in

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *