गो-स्पोर्ट फाऊंडेशन स्पोर्ट शिष्यवृत्ती

◆ गो-स्पोर्ट फाऊंडेशन स्पोर्ट शिष्यवृत्ती ◆

◆ शिष्यवृत्तीची रक्कम / फायदे:-

शिष्यवृत्ती कार्यक्रमांतर्गत निवडल्या गेलेल्या खेळाडूंना गो-स्पोर्ट फाउंडेशनद्वारे त्यांचे क्रीडा उद्दिष्टे साध्य करण्यासाठी महत्त्वपूर्ण सहाय्य दिले जाईल – जी क्रीडा उद्दिष्टे भारतीय खेळातील महिला चळवळीला पुढे जाण्यास मदत करतील असा आम्हाला विश्वास आहे.

    –  प्रशिक्षण आणि विकास

    – स्पर्धेकरिता मदत

    –  तज्ञाचे  मार्गदर्शन

    – व्यावसायिक कामांसाठी कायदेशीर मदत

    – मीडिया व्यवस्थापन आणि जनसंपर्क सल्ला

    – करिअर मार्गदर्शन

    – ज्ञान वाढविण्यासाठी कार्यशाळा आणि चर्चासत्र

◆ शेवटची तारीख:- २४ जून २०२२

◆ शिष्यवृत्ती बद्दल:-

ऑलिम्पिक/पॅरालिम्पिक, हिवाळी-ऑलिम्पिक आणि मोटर स्पोर्ट्स क्षेत्रात सर्वोच्च स्तरावर आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या देशभरातील तरुण मुली आणि महिलांना हि शिष्यवृत्ती दिली जाते.

◆ पात्रता निकष:-

1) विशिष्ट ऑलिम्पिक/पॅरालिम्पिक/हिवाळी ऑलिम्पिक/साहसी/मोटर स्पोर्ट इव्हेंटमध्ये सहभाग घेणाऱ्या  आणि खालील निकष पूर्ण करणाऱ्या  भारतीय महिला खेळाडू शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत:

– वयोमर्यादा  – कमीतकमी  १३  वर्षे

– राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये  खेळाडूने  राज्याचे प्रतिनिधित्व करणे किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व  केले असावे.

◆ आवश्यक कागदपत्रे:-

1) पासपोर्ट आकाराचा फोटो

२) आयडेंटिटी कार्ड  (पासपोर्ट, आधार कार्ड)

3) बँक पासबुक

4) कोणत्याही पाच प्रमुख राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय  कामगिरींचे   प्रमाणपत्र

5) प्रशिक्षण किंवा खेळ खेळताना अर्जदाराचा  पूर्ण आकाराचा फोटो. 

◆ ऑनलाईन अर्जासाठी लिंक:-

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdKnvnLXJUOEnIgwPtsT_Vz32red17OJz5WaWOg_LTgc5D6EA/viewform

◆ संपर्क तपशील:-

ईमेल- unstoppable@gosports.in, scholarships@gosports.in

मोबाईल- 9629873273