● शेवटची तारीख:- १५ नोव्हेंबर २०२१
● शिष्यवृत्तीची रक्कम:- ५०,००० (फक्त पन्नास हजार)
● शिष्यवृत्ती बद्दल:-
कॉरपोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) उपक्रमाअंतर्गत PURE India Trust (NGO) च्या भागीदारीत COLT Technology द्वारे अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता ही शिष्यवृत्ती सुरू केली गेली आहे. भारतातील कोणत्याही शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील वंचित गुणवंत अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची संधी COLT Technology द्वारे दिली गेली आहे.
● पात्रता निकष:-
१) आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील विद्यार्थी (जास्तीत जास्त कुटुंब एकूण उत्पन्न रु. २,५०,०००/-), शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.
३) जे विद्यार्थी जेईई मेन / जेईई ॲडव्हान्स प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत आणि अभियांत्रिकीच्या पहिल्या ते तिसऱ्या वर्षापर्यंत शिक्षण घेत आहेत ते विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठीअर्ज करण्यास पात्र आहेत.
३) चौथे वर्ष किंवा ७ व्या आणि ८ व्या सेमेस्टरचे विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत.
४) सर्व अभियांत्रिकी ब्रांचचे विद्यार्थी शिष्यवृत्तीकरिता अर्ज करण्यास पात्र आहेत.
● टीप:-
१) अविवाहित आई / विधवा / संरक्षण सैनिक / शहीद / अपंग पालक इत्यादींच्या मुलांना शिष्यवृत्ती निवडीमध्ये प्राधान्य मिळेल.
२) अंतिम निवड दस्तऐवज पडताळणी, कौटुंबिक पार्श्वभूमी पडताळणी आणि एनजीओ आणि कोल्ट टीमद्वारे वैयक्तिक मुलाखत यावर आधारित केली जाईल.
● आवश्यक कागदपत्रे:-
१) १० वी आणि १२ वी मार्कशीट
२) जेईई स्कोअर आणि एअर रँकिंग कार्ड
३) अभियांत्रिकी सेमिस्टर मार्कशीट.
४) प्रमाणपत्रे (क्रीडा, कला, सांस्कृतिक किंवा इतर कोणतेही)
५) आधार (स्वतः आणि पालक)
६) उत्पन्नाचा पुरावा (कुटुंब)
७) कॉलेज फी भरण्याल्याच्या पावत्या.
८) महाविद्यालय / शाळा ओळखपत्र / प्रवेश पत्र
९) बँक पासबुक
१९) पूर्ण भरलेला अर्ज
● संपर्काची माहिती:-
प्युअर इंडिया ट्रस्ट
मुख्य कार्यालय: 82, काटेवा नगर, न्यू सांगानेर रोड, जयपूर -19
9511551767-आलोक, 9971241454-पुष्पेंद्र, 9649765676-संजय, 9016639345-निशांत
● अर्ज करण्याची पद्धत:- फक्त ईमेल द्वारे.
१) खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज डाउनलोड करा
https://drive.google.com/file/d/10To9kALbJqior4vF7oNJQd7qk0YNic2W/view?usp=drivesdk
२) डाउनलोड केलेला अर्ज भरा आणि ई-मेल pure@pureindia.org वर कागदपत्रांसह अर्जाची स्कॅन प्रत पाठवा.