एआयसीटीई – स्वनाथ स्कॉलरशिप

◆ शिष्यवृत्तीची रक्कम:- ₹ 50,000

◆ अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 30 नोव्हेंबर 2021

◆ शिष्यवृत्ती बद्दल :- अनाथ, कोविड -१९ मुळे मृत्युमुखी पडलेल्या पालकांचे पाल्य, सशस्त्र सेना आणि केंद्रीय निमलष्करी दलांचे विभाग (शहीद) यांच्या मुलांना शिक्षण घेऊन पुढे जाण्यासाठी एआयसीटीईद्वारे शिष्यवृत्ती लागू केली जात आहे. वर नमूद केलेल्या विभागातील प्रत्येक मुलाला, एआयसीटीई मान्यताप्राप्त संस्था आणि अभ्यासक्रमांमध्ये शिक्षणाद्वारे पुढील अभ्यासासाठी आणि यशस्वी भविष्याची तयारी करण्यासाठी संधी देण्याचा हा प्रयत्न आहे.

◆ पात्रता निकष:-
१) उमेदवार खालीलपैकी कोणत्याही एका श्रेणीतील असावा.
• अनाथ किंवा कोविड 19 किंवा दोन्हीमुळे एक किंवा दोन्ही पालकांच निधन झालं असल्यास.
• सशस्त्र दल आणि केंद्रीय निमलष्करी दलांमधील सैनिक कारवाईमध्ये शहीद झाले असल्यास त्यांचे पाल्य.
2) सर्व स्त्रोतांमधून कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रु. ८ लाखांपेक्षा जास्त नसावे. चालू आर्थिक वर्षातील राज्य/केंद्रशासित प्रदेश शासनाने जारी केलेले वैध उत्पन्नाचे प्रमाणपत्र सोबत जोडावे.
3) उमेदवार सध्या एआयसीटीई मान्यताप्राप्त संस्थांमध्ये आणि डिप्लोमा स्तरावर अभ्यासक्रम १ /२ /३ वर्षात नियमित मोडमध्ये शिकत असावा. किंवा उमेदवार सध्या एआयसीटीई मान्यताप्राप्त संस्था आणि अभ्यासक्रमांमध्ये पदवी स्तरावर १ /२ /३/४ थ्या वर्षात नियमित मोडमध्ये अभ्यास करत असावा.

◆ आवश्यक कागदपत्रे:-
अ) अनाथ उमेदवारांसाठी:
(i) वडील आणि आई दोघांचे मृत्यू प्रमाणपत्र (उपलब्ध असल्यास) किंवा तहसीलदार / एस डी एम द्वारे संलग्न स्वरूपानुसार जारी केलेले प्रमाणपत्र (परिशिष्ट – I).
(ii) संस्थेने जारी केलेले बोनाफाईड प्रमाणपत्र.
(iii) 10 वी /समकक्ष (equivalent) मार्कशीट (डिप्लोमासाठी) ,10+2/समकक्ष (equivalent) आणि 10 वी मार्क शीट (पदवीसाठी)
(iv) श्रेणी प्रमाणपत्र (SC/ST/OBC-NCL).

ब) ज्या उमेदवारांचे एक किंवा दोन्ही पालकांच कोविड 19 मुळे निधन झालं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी:
(i) वडील/आईचे मृत्यू प्रमाणपत्र किंवा दोघांचा मृत्यू करोनामुळे झाला आहे अस स्पष्टपणे नमूद करणारा मृत्यूदाखला.
(ii) एक पालक (वडील किंवा आई) जिवंत असल्यास, चालू वर्षाच्या उत्पन्नाचे प्रमाणपत्र, सक्षम प्राधिकरणाने जारी केलेले कुटुंबाचे उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी आहे स्पष्टपणे नमूद केलेले प्रमाणपत्र
(iii) संस्थेने जारी केलेले बोनाफाईड प्रमाणपत्र.
(iv) 10 वी /समकक्ष (equivalent)मार्कशीट (डिप्लोमासाठी), 10+2/समकक्ष (equivalent)
आणि 10 वी मार्कशीट (पदवीसाठी)
(v) श्रेणी प्रमाणपत्र (SC/ST/OBC-NCL).

क) ज्यांचे पालक सशस्त्र दल आणि केंद्रीय निमलष्करी दलांच्या(शहीद झाले) त्या विद्यार्थ्यांसाठी
(i) मृत्यू प्रमाणपत्र.
(ii) सशस्त्र दल/ केंद्रीय निमलष्करी दलाने जारी केलेले शहीद प्रमाणपत्र.
(iii) संस्थेने जारी केलेले बोनाफाईड प्रमाणपत्र.
(iv) 10 वी /समकक्ष (equivalent)मार्कशीट (डिप्लोमासाठी), 10+2/समकक्ष (equivalent)
आणि 10 वी मार्क शीट (पदवीसाठी)
(v) चालू वर्षाच्या उत्पन्नाचे प्रमाणपत्र, सक्षम प्राधिकरणाने जारी केलेले कुटुंबाचे उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी आहे स्पष्टपणे नमूद केलेले प्रमाणपत्र
(vi) श्रेणी प्रमाणपत्र (SC/ST/OBC-NCL).

◆ ऑनलाइन अर्जाची लिंक : https://scholarships.gov.in

◆ संपर्काचा तपशील :
फोन – 01206619540
इमेल – helpdesk@nsp.gov.in

◆ माहिती पुस्तिका डाउनलोड करा डिप्लोमा- ( Click Here )
https://drive.google.com/file/d/1-M9YVJqvX2yiKORwxl4CGiJOx0z_awh3/view?usp=drivesdk

◆ माहिती पुस्तिका डाउनलोड करा डिग्री- ( Click Here )
https://drive.google.com/file/d/1-s291CRuHLM8TkQ9_fvsb08JxuoDbv4H/view?usp=drivesdk