एलआयसी गोल्डन ज्युबिली शिष्यवृत्ती

◆ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :– १८ डिसेंबर २०२२

◆ शिष्यवृत्तीची रक्कम:

12 वी किंवा डिप्लोमा पूर्ण केलेल्या आणि पुढील सेक्शनमध्ये नमूद केलेल्या अभ्यासक्रमांकरिता प्रवेश घेतलेल्या किंवा दहावी उत्तीर्ण आणि आयटीआय, डिप्लोमा किंवा व्होकेशनल कोर्सेस करिता प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक वीस हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाईल.
दहावी उत्तीर्ण आणि अकरावी, आयटीआय, डिप्लोमा किंवा व्होकेशनल कोर्सेस करिता प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनींना वार्षिक दहा हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाईल

◆ एलआयसी गोल्डन ज्युबिली शिष्यवृत्तीसाठी पात्र अभ्यासक्रम : –

1) वैद्यकीय अभ्यासक्रम
२) इंजीनियरिंग
3) कोणताही पदवी अभ्यासक्रम
4) डिप्लोमा
5) ITI
6) व्होकेशनल कोर्सेस
7) इयत्ता अकरावी (फक्त 10वी उत्तीर्ण झालेल्या मुलींसाठी)
8) कला, विज्ञान, वाणिज्य या विषयातील पदवी अभ्यासक्रम
9) व्यावसायिक अभ्यासक्रम

◆ शिष्यवृत्ती बद्दल:-
एलआयसी गोल्डन ज्युबिली शिष्यवृत्तीचे उद्दिष्ट आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण आणि रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध करून देणे हा आहे. एलआयसी गोल्डन ज्युबिली शिष्यवृत्ती भारतातील सरकारी किंवा खाजगी महाविद्यालय/विद्यापीठातील अभ्यासासाठी दिली जाते. यामध्ये नॅशनल कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग (NCVT) शी संलग्न औद्योगिक प्रशिक्षण संस्था/औद्योगिक प्रशिक्षण केंद्रांमधील तांत्रिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रम आणि बारावी इयत्तेनंतरचे पदवी अभ्यासक्रम देखील समाविष्ट केले आहेत.

1) 2021-2022 या शैक्षणिक वर्षात किमान 60% गुण मिळवलेले विद्यार्थीच LIC गोल्डन ज्युबिली शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.
2) डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी थेट द्वितीय वर्ष, किंवा पहिल्या वर्षात अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमात प्रवेश घेतला आहे असे विद्यार्थी एलआयसी गोल्डन ज्युबिली शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.

● रेग्युलर स्कॉलर विद्यार्थ्यांसाठी पात्रता निकष :
1) जे विद्यार्थी 2021-22 या शैक्षणिक वर्षात बारावीची परीक्षा (किंवा समतुल्य परीक्षा) किमान 60% गुणांसह (किंवा समतुल्य श्रेणी) उत्तीर्ण झाले आहेत आणि ज्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न (सर्व स्त्रोतांकडून) वार्षिक ₹200,000 रुपयांपेक्षा जास्त नाही ते शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.
2) वैद्यकीय अभ्यासक्रम, अभियांत्रिकी अभ्यासक्रम, कोणत्याही शाखेतील पदवी, इंटिग्रेटेड कोर्सेस, कोणत्याही क्षेत्रातील डिप्लोमा अभ्यासक्रम, व्यावसायिक अभ्यासक्रम किंवा इतर समतुल्य अभ्यासक्रमांकरीता सरकारी मान्यताप्राप्त महाविद्यालये/संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते.
3) जे विद्यार्थी 2021-22 या शैक्षणिक वर्षात दहावीची परीक्षा (किंवा समतुल्य) किमान 60% गुणांसह (किंवा समतुल्य श्रेणी) उत्तीर्ण झाले आहेत आणि ज्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न (सर्व स्त्रोतांकडून) रुपये 2,50,000 पेक्षा जास्त नसणारे विद्यार्थी या शिष्यवृत्ती करिता अर्ज करण्यास पात्र आहेत. सरकारी मान्यताप्राप्त महाविद्यालये, संस्था किंवा औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) मध्ये आयटीआय किंवा व्होकेशनल कोर्सेस करिता प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते.
● स्पेशल गर्ल चाइल्ड स्कॉलरसाठी :
ज्या विद्यार्थिनींनी मागील शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावीची परीक्षा 60 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण केली आहे आणि ज्या विद्यार्थिनींचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा विद्यार्थिनींकरिता ही शिष्यवृत्ती दिली जाईल. ज्या विद्यार्थिनींनी अकरावी, डिप्लोमा, आयटीआय किंवा व्होकेशनल कोर्सेस करिता प्रवेश घेतला आहे.अशा विद्यार्थिनींकरिता स्पेशल गर्ल चाइल्ड शिष्यवृत्ती दिली जाईल.

◆ शिष्यवृत्तीचा कालावधी :-
१) अभ्यासक्रमाच्या संपूर्ण कालावधीसाठी शिष्यवृत्ती दिली जाईल.

◆ कौटुंबिक उत्पन्न मर्यादा:-
१) 12वी किंवा डिलोमा उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी- वार्षिक 2,00,000 रु
२) 10 वी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी – वार्षिक 2,50,000 रु
३) जर स्त्री (विधवा/एकटी आई/अविवाहित) कुटुंबाची एकमेव कमावती असेल – कौटुंबिक उत्पन्न मर्यादा रु.4 लाख प्रतिवर्ष

◆ शिष्यवृत्ती अर्जाची पद्धत :- ऑनलाइन

◆ आवश्यक कागदपत्रे: –
(वेबसाइटवर कागदपत्रे अपलोड करायची नसले तरीही फॉर्म भरताना तुमच्याकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे)
1 आधार कार्ड
2 इयत्ता दहावी, अकरावी, बारावी, डिप्लोमा मार्कशीट
3 बँक पासबुक
4 उत्पन्नाचा पुरावा

◆ टीप:-

१) एलआयसी शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची निवड गुणवत्ता आणि कौटुंबिक उत्पन्नाच्या पार्श्वभूमीच्या आधारावर केली जाईल जसे की इयत्ता 12 वी / 10 वी / डिप्लोमामधील गुणांची टक्केवारी आणि कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न.
२) उमेदवारांची अंतिम निवड गुणवत्तेवर निवडीसाठी पात्र उमेदवारांच्या यादीवर आधारित गुणांच्या उतरत्या क्रमाने केली जाईल. गुणांच्या टक्केवारीत बरोबरी झाल्यास, ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न सर्वात कमी आहे त्यांना शिष्यवृत्तीसाठी प्राधान्य दिले जाईल.
३) ज्या विद्यार्थ्यांनी करेस्पोंडन्स किंवा अर्धवेळ (संध्याकाळ किंवा रात्रीचे वर्ग) अभ्यासक्रमांत प्रवेश घेतला आहे असे विद्यार्थी शिष्यवृत्तीकरता पात्र नाहीत.
४) एका कुटुंबातील एकच विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतो.
५) उत्पन्नाचे प्रमाणपत्र- ज्या विद्यार्थ्यांचे पालक सेल्फ एम्प्लॉईड आहेत तर अशा विद्यार्थ्यांनी स्टॅम्प पेपर वरती डिक्लेरेशन करून ते इन्कम सर्टिफिकेट म्हणून देणे गरजेचे आहे.

◆ माहिती पुस्तिका DOWNLOAD LINK:-
https://drive.google.com/file/d/1Q1a0w1b8Eivd6xLAbxyVRpKkKqB5a1w0/view?usp=sharing

◆ शिष्यवृत्तीबद्दल अधिक माहितीसाठी:-
https://licindia.in/Bottom-Links/Golden-Jubilee-Foundation/Scholarship

◆ ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंक:
https://customer-idc.licindia.in/GJSS/?_ga=2.185838889.1625779815.1670166712-779682197.1667237879

वेबसाइट :- www.licindia.in