◆ ॲडोब इंडिया वुमन इन टेक्नॉलॉजी स्कॉलरशिप/ अॅडोब इंडिया महिला-तंत्रज्ञान शिष्यवृत्ती
● ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम दिनांक :-
रविवार २२ ऑगस्ट २०२१ संध्याकाळी ५ वाजेपर्यंत
● शिष्यवृत्तीचे फायदे :-
• ज्या विद्यार्थिनींचे शैक्षणिक वर्ष २०२३ मध्ये शिक्षण (विद्यापीठातील शिक्षण) संपणार आहे त्यांना शिक्षण शुल्क (ट्युशन फीसाठी) निधी दिला जाईल.
• २०२२ मध्ये Adobe India मध्ये उन्हाळी इंटर्नशिपची संधी*.
• Adobe च्या एका वरिष्ठ तंत्रज्ञान तज्ज्ञाकडून मार्गदर्शन.
• सहभागाच्या शुल्कासह ग्रेस हॉपर कॉन्फरन्स इंडियाचा प्रवास करण्याची संधी
• 2022 अॅडोब इंडिया महिला-तंत्रज्ञान शिष्यवृत्तीसाठी पात्र होण्यासाठी, अर्जदारांनी खालील निकष पूर्ण करणे आवश्यक आहे
● पात्रतेचे निकष :-
1) या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणारी विद्यार्थिनी/महिला ही भारताची नागरिक असावी.
2) या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थिनी/महिला या ४ वर्षीय बीई/बीटेक शिक्षण कार्यक्रम किंवा इंटिग्रेटेड एमई/एमएस/एमटेक प्रोग्राममध्ये भारतीय विद्यापीठांत किंवा संस्थेत पूर्णवेळ विद्यार्थी असली पाहिजे.
३) ज्या विद्यार्थिनींचे शिक्षण शैक्षणिक वर्ष २०२३ मध्ये संपेल केवळ त्याच विद्यार्थिनी या शिष्यवृत्तीस अर्ज करू शकतील.
४) खालील शाखेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनी अर्ज करू शकतील
कंप्युटर सायन्स/इंजिनिअरिंग, इम्फॉर्मेशन सायन्स, डेटा सायन्स, इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, गणित(math) आणि संगणकीयय (computing)
५) अॅडोबच्या अॅडोब इंडिया महिला-तंत्रज्ञान शिष्यवृत्ती किंवा अॅडोब ग्लोबल वुमन इन टेक्नॉलॉजी शिष्यवृत्ती. या दोनपैकी एकाच शिष्यवृत्तीसाठी अर्ज करता येईल.
६) जो कोणी Adobe कर्मचाऱ्याचा “संबंधित नातेवाईक” असेल तो अर्ज करण्यास पात्र नाही. ‘संबंधित नातेवाईक’ व्याख्या- Adobe कर्मचाऱ्याशी पुढील संबंध असणारी कोणतीही व्यक्ती: जोडीदार, घरगुती भागीदार, मूल, पालक, भावंड, सासू, सासरे, किंवा भावंडे-सासरे; इतर कोणताही नातेवाईक किंवा व्यक्ती जो Adobe कर्मचाऱ्याच्या घरात राहतो.
● महत्वाची सूचना :
1) या शिष्यवृत्तीसाठी भारतीय विद्यापीठांमध्ये शिकणाऱ्या फक्त भारतीय महिला नागरिकच अर्ज करण्यास पात्र आहेत.
2) इंटर्नशिपसाठी निवड झाल्यास अॅडोब इंडिया कार्यालयात इंटर्नशिप करायची संधी दिली जाईल. भारतातील इंटर्नसाठी इंटर्नशिपचे नियम आणि अटी लागू होतील.
3) या शिष्यवृत्तीसाठी निवड झाल्यास, लाभार्थी त्याच वर्षासाठी Adobe कडून इतर कोणत्याही शिष्यवृत्तीसाठी पात्र होणार नाही.
● ऑनलाइन अर्जाची लिंक :-
https://research.adobe.com/forms/adobe-india-women-in-technology-scholarship/
● संपर्काचा तपशील :-
इमेल : witindia@adobe.com
वेबसाईट : https://research.adobe.com/adobe-india-women-in-technology-scholarship/