शिष्यवृत्तीविषयी :
सीमेन्स इंडियाद्वारे आयोजित, Siemens Scholarship Program अंतर्गत सरकारी कॉलेजांमधील इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. जर्मन ड्युअल एज्युकेशन सिस्टमवर आधारित सर्वांगीण विकास अभ्यासक्रम आणि आर्थिक मदतीद्वारे या विद्यार्थ्यांना उद्योगासाठी सक्षम बनवणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. तांत्रिक प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि आर्थिक मदत देऊन, विविध क्षेत्रांसाठी पात्र कुशल उमेदवार तयार करण्यासाठी हा उपक्रम काम करतो.
शिष्यवृत्ती लाभ :
ट्यूशन फीची प्रतिपूर्ती
पुस्तके, हॉस्टेल आणि अतिरिक्त क्लासेससाठी शैक्षणिक भत्ता
होलिस्टिक डेव्हलपमेंट प्रोग्रॅम – टेक्निकल आणि फंक्शनल ट्रेनिंग, सॉफ्ट स्किल्स ट्रेनिंग, इंटर्नशिपची संधी
सीमेन्स मेकॅट्रॉनिक्स सिस्टम सर्टिफिकेशन प्रोग्राम (SMSCP)
पात्र अभ्यासक्रम – First-year Undergraduate Engineering
मेकॅनिकल इंजिनिअरिंग
प्रोडक्शन इंजिनिअरिंग
इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग
इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग
इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग
कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग
इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग
इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग
शिष्यवृत्ती पात्रता निकष –
सरकारी इंजिनिअरिंग कॉलेजचे पहिल्या वर्षाचे विद्यार्थी (IIT वगळून)
पात्र इंजिनिअरिंग शाखांमध्ये प्रवेश घेतलेला असावा
वय 20 वर्षांपर्यंत
दहावी (SSC): किमान एकूण 60% गुण
बारावी (HSC) किंवा समकक्ष परीक्षा: एकूण किमान 50% गुण आणि PCM मध्ये किमान एकूण 60% गुण
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न Rs. 2 लाखांपेक्षा जास्त नसावे
प्रत्येक कुटुंबातील केवळ एका विद्यार्थ्यासाठी शिष्यवृत्ती मर्यादित
संपर्क तपशील :
वेबसाइट: https://www.siemens.com/
Official Information – Siemens Scholarship Program Official Page: https://www.siemens.com/en-us/company/sustainability/corporate-citizenship-india/scholarship-program/
Link for Online Application – https://www.ssp-india.co.in/scholarship/apply

