● शिष्यवृत्तीची माहिती :-
सरोजिनी दामोदरन फाउंडेशनतर्फे विद्याधन हि शिष्यवृत्ती आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या ईयत्ता अकरावी आणि बारावीच्या महाविद्यालयीन शिक्षणासाठी दिली जाते. चाचणी आणि मुलाखतीसह कठोर निवड प्रक्रियेद्वारे ईयत्ता 10 वीची परीक्षा उत्तीर्ण केलेल्या विद्यार्थ्यांची निवड या शिष्यवृत्तीकरीता केली जाते. निवडलेले विद्यार्थी फाऊंडेशनच्या दोन वर्षांच्या शिष्यवृत्तीसाठी पात्र असतील. जर या विदयार्थ्यांची अकरावी आणि बारावी मध्ये शैक्षणिक कामगिरी उत्तम असेल , तर त्यांना त्यांच्या आवडीचा कोणताही पदवी अभ्यासक्रम करण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाईल. पदवी अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्तीची रक्कम राज्य, अभ्यासक्रम, कालावधी इत्यादीनुसार प्रति वर्ष रु. १०,००० ते रु. ६०,००० पर्यंत असू शकते.
● अर्ज करण्याची अंतिम तारीख:- १० ऑगस्ट २०२२
● शिष्यवृत्तीची रक्कम :-
अकरावी आणि बारावीसाठी शिष्यवृत्तीची रक्कम जास्तीत जास्त रु. १०,००० प्रति वर्ष.
● शिष्यवृत्तीचे फायदे:-
१) ज्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे ते विद्यार्थी फाउंडेशनकडून दोन वर्षांच्या शिष्यवृत्तीसाठी पात्र असतील.
२) जर ते विद्यार्थी त्यांच्या अभ्यासात चांगली प्रगती करत असतील तर त्यांना त्यांच्या आवडीच्या कोणत्याही पदवी अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती दिली जाईल
३) राज्य, अभ्यासक्रम, कालावधी इत्यादीनुसार पदवी अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्तीची रक्कम १०,००० ते ६०,००० रुपये प्रति वर्ष असते.
● कोण अर्ज करू शकतो? :-
१) ज्या विद्यार्थ्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रु. २ लाखपेक्षा कमी आहे. आणि ज्यांनी २०२२ मध्ये महाराष्ट्रातून 10 वीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. &
२) १०वी च्या परीक्षेत ८५% किंवा ९ सीजीपीए मिळवले आहे. ते विद्यार्थी या शिष्यवृत्तीस पात्र असतील.
Note- दिव्यांग (अपंग) विद्यार्थ्यांसाठी कट ऑफ मार्क ७५% मिळावणे गुण आवश्यक आहे.
● निवड प्रक्रिया:-
– ऑनलाइन अर्ज
– ऑनलाइन चाचणी किंवा मुलाखत
● महत्वाच्या तारखा:-
– ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 ऑगस्ट 2022
– स्क्रीनिंग टेस्ट – 25 सप्टेंबर 2022
– मुलाखत/चाचण्या – 1 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर 2022
● आवश्यक कागदपत्रे:-
खालील कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती आवश्यक आहेत
1) छायाचित्र
2) १० वी मार्कशीट (जर मूळ मार्कशीट उपलब्ध नसेल, तर तुम्ही SSC/CBSE/ICSC वेबसाइटवरून प्रोव्हिजनल/ऑनलाइन मार्कशीट अपलोड करू शकता.)
3) उत्पन्नाचे प्रमाणपत्र (सक्षम प्राधिकरणाकडून तयार केलेल; रेशन कार्ड स्वीकारले जाणार नाही.
● ऑनलाइन अर्जासाठी लिंक :-
https://www.vidyadhan.org/register/student
● शिष्यवृत्तीबद्दल अधिक माहितीसाठी लिंक :-
https://www.vidyadhan.org/apply
● शिष्यवृत्ती आणि अर्ज प्रक्रियेबद्दल तपशील ( VIDEO ) :-
● संपर्काचा तपशील :-
इमेल आयडी :- maharashtra.vidyadhan@sdfoundationindia.com
संपर्क व्यक्ती – कुलदीप मेश्राम
फोन: 8390421550 / 9611805868
वेबसाइट:- https://www.vidyadhan.org/