व्ही एबल विद्याधन शिष्यवृत्ती
अंडर-ग्रॅज्युएशन पदवी अभ्यासक्रमांसाठी

● शेवटची तारीख:- १५ ऑक्टोबर २०२२

शिष्यवृत्तीबद्दल :-
व्ही एबल विद्याधन शिष्यवृत्ती हि विद्याधन फाउंडेशन द्वारे LTI (Larsen & Tubro Infotech) कंपनीच्या सहकार्याने सीएसआर उपक्रम १ स्टेप अंतर्गत सुरू केली आहे. या शिष्यवृत्ती अंतर्गत 40% पेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या विद्यार्थ्यांना 15,000 ते 60,000 रुपये प्रति वर्ष शिष्यवृत्ती दिली जाईल. तेलंगणा, गोवा, महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाईल.

● शिष्यवृत्तीची रक्कम:– रुपये १५,००० ते ६०,००० रुपये प्रति वर्ष

● पात्र अभ्यासक्रम :– कोणताही अंडर-ग्रॅज्युएशन पदवी अभ्यासक्रम

● कोण अर्ज करू शकते ? :-
1) अपंगत्व असलेले आणि चालू शैक्षणिक वर्षात कोणत्याही अंडर-ग्रॅज्युएशन पदवी अभ्यासक्रमात प्रवेश मिळवलेले विद्यार्थी व्ही एबल विद्याधन शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात.
2) केवळ किमान ४०% अपंगत्व असलेले विद्यार्थी व्ही एबल विद्याधन शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात.
3) ज्या विद्यार्थ्यांनी 12वी / एचएससी परीक्षेत किमान ६०% गुण मिळवलेले आहेत किंवा 6 CGPA मिळवले आहेत तेच विद्यार्थी व्ही एबल विद्याधन शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.

●टीप:-
तेलंगणा, गोवा, महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यातील विद्यार्थी व्ही एबल विद्याधन शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात.

● निवड प्रक्रिया:-

  • ऑनलाइन अर्ज
  • स्क्रीनिंग चाचणी
  • ऑनलाइन चाचणी / मुलाखत
  • प्रवेश परीक्षेचे निकाल- (जसे JEE, NEET, CET)

● महत्वाच्या तारखा:-

  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ ऑक्टोबर २०२२
  • स्क्रीनिंग टेस्ट – 1 नोव्हेंबर 2022
  • मुलाखत/चाचण्या – १ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२२

● आवश्यक कागदपत्रे:-
१) फोटो
२) 10वी मार्कशीट (मूळ मार्कशीट उपलब्ध नसल्यास, तुम्ही SSC/CBSE/ICSC वेबसाइटवरून प्रोव्हिजनल/ऑनलाइन मार्कशीट अपलोड करू शकता.)
३) उत्पन्नाचा दाखला (सक्षम अधिकाऱ्याकडून; रेशन कार्ड स्वीकारले जात नाही.)
४) अपंगत्व प्रमाणपत्र
५) इयत्ता १२वी मार्कशीट

● ऑनलाइन अर्जासाठी लिंक :-
https://www.vidyadhan.org/register/student

● शिष्यवृत्तीबद्दल अधिक माहितीसाठी लिंक :-
https://www.vidyadhan.org/apply

● संपर्क तपशील:-
vable@sdfoundationindia.com
संपर्क व्यक्ती –
महाराष्ट्र आणि गोव्यासाठी – ऐश्वर्या – ८२८१५२६१३२,
तेलंगणासाठी – श्री. मनोज कुमार – 6300391827
केरळसाठी – जनिथा – 8138045318
तामिळनाडूसाठी – ७३३९६५९९२९
कर्नाटकसाठी- 7349354415 / 8296010803
आंध्र प्रदेशसाठी- श्री. सुरेश.के – ८३६७७५१३०९
वेबसाइट:- https://www.vidyadhan.org/

● शिष्यवृत्ती आणि अर्ज प्रक्रियेबद्दल तपशील पाहण्याकरिता व्हीडिओ :-
https://www.youtube.com/watch?v=_UzQe7IdhYY