सिमेन्स शिष्यवृत्ती

◆ शिष्यवृत्ती बद्दल:-
सिमेन्स कंपनीने “सिमेन्स शिष्यवृत्ती” कार्यक्रमाची ९ वी आवृत्ती सुरू केली आहे. दुहेरी शिक्षणाच्या जर्मन मॉडेलवर आधारित, हा शिष्यवृत्ती कार्यक्रम विद्यार्थ्यांना उद्योग-सज्ज अभियंता बनण्यास आणि अभियांत्रिकी, R&D किंवा उत्पादन क्षेत्रात शाश्वत करिअर सुरू करण्यास सक्षम करतो. या शिष्यवृत्ती कार्यक्रमांतर्गत, सिमेन्स पात्र गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करते. याशिवाय, इंटर्नशिप, मेकॅट्रॉनिक्स, सॉफ्ट स्किल्स ट्रेनिंग, प्रोजेक्ट्स आणि सीमेन्स द्वारे प्रदान करण्यात येणारे मार्गदर्शन देखील या उज्ज्वल मनांना उद्योगाच्या गतिशीलतेशी परिचित करतील, ज्यामुळे त्यांचा सर्वांगीण विकास होईल. शिष्यवृत्ती कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी पदवीच्या चार वर्षांमध्ये उपलब्ध आहे आणि ५०% शिष्यवृत्ती मुलींसाठी राखीव आहे. २०२१ पर्यंत, भारतातील २६ राज्यांमधील ९३ सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालयातील ९३५ विद्यार्थी सीमेन्स शिष्यवृत्ती कार्यक्रमाचा भाग बनले आहेत.

◆ शिष्यवृत्तीचे फायदे:
1) ट्युशन (शिकवणी) फी आणि पुस्तके, स्टेशनरी, वसतिगृह, अतिरिक्त वर्ग इत्यादीसाठी काही रक्कम दिली जाईल.
2) सीमेन्स आणि इतर बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये इंटर्नशिपसह सर्वांगीण विकास कार्यक्रम.

◆ ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ३० नोव्हेंबर २०२२

पात्र अभ्यासक्रम:- इंजिनिअरिंग
मेकॅनिकल / प्रोडक्शन इंजिनिअरिंग
इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग
इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग
इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग
कॉम्पुटर सायन्स / इन्फॉर्मेशन टेकनॉलॉजी इंजिनिअरिंग
इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग

◆ पात्रता :-
१) सरकारी इंजिनिअरिंग महाविद्यालयांमध्ये मेकॅनिकल/प्रॉडक्शन इंजिनिअरिंग,इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंग, इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स/माहिती तंत्रज्ञान इंजिनीअरिंगच्या प्रथम वर्षात शिकणारे विद्यार्थी सिमेन्स शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात.
2) सीमेन्स शिष्यवृत्तीसाठी फक्त 20 वर्षापर्यंत वय असणारे विद्यार्थी अर्ज करू शकतात
3) केवळ एसएससी परीक्षेत किमान 60% मिळवलेले विद्यार्थी आणि HSC परीक्षेत किमान 50% आणि किमान PCM ग्रुपला 60% गुण मिळवणारे विद्यार्थी सिमेन्स शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.
4) ज्या विद्यार्थ्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2 लाख रुपयांपेक्षा कमी आहे. असे विद्यार्थी सीमेन्स शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात

◆ संपर्क
ईमेल आयडी –
corporate.citizenship.in@siemens.com

◆ ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंक :
https://www.ssp-india.co.in/scholarship/apply

◆ शिष्यवृत्ती विषयक अधिक माहितीकरिता :-
https://new.siemens.com/in/en/company/sustainability/corporate-citizenship/siemens-scholarship-program.html