सीमेन्स शिष्यवृत्ती

Siemens Scholarship

◆ शिष्यवृत्ती बद्दल:-
शासकीय महाविद्यालयात इंजिनीअरिंगच्या पहिल्या वर्षात शिकणारे विद्यार्थी सीमेन्स शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात. शिष्यवृत्तीसोबतच विद्यार्थ्यांना इंटर्नशिप, मेकॅट्रॉनिक्स ट्रेनिंग, सॉफ्ट स्किल्स ट्रेनिंग, प्रोजेक्ट्स आणि मेंटॉरशिपच्या संधी मिळतील.

◆ शिष्यवृत्तीचे फायदे:
1) ट्यूशन फी आणि पुस्तके, स्टेशनरी, वसतिगृह, अतिरिक्त वर्ग इत्यादींसाठी आर्थिक मदत
2) सीमेन्स आणि इतर बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये इंटर्नशिपसह सर्वांगीण विकास कार्यक्रम
३) ही शिष्यवृत्ती चार वर्षांची शिष्यवृत्ती, इंटर्नशिप, मेकॅट्रॉनिक्स प्रशिक्षण, सॉफ्ट स्किल्स ट्रेनिंग, प्रोजेक्ट्स आणि मेंटॉरशिप देते.

◆ पात्र अभ्यासक्रम:- इंजिनीअरिंग
मेकॅनिकल / प्रोडक्शन इंजिनीअरिंग
इलेकट्रीकल इंजिनीअरिंग
इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग
इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंग
कॉम्प्युटर सायंस / इन्फॉर्मशन टेक्नोलॉजी इंजिनीअरिंग
इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनीअरिंग

◆ पात्रता निकष:
१) इंजिनीअरिंगच्या प्रथम वर्षात मेकॅनिकल / प्रॉडक्शन, इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार इंजिनीअरिंग, संगणक विज्ञान/माहिती तंत्रज्ञान इंजिनीअरिंग, इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनीअरिंग या अभ्यासक्रमांमध्ये शासकीय इंजिनीअरिंग महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी सिमेन्स शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात.
2) सीमेन्स शिष्यवृत्तीसाठी फक्त 20 वर्षांपर्यंत वय असणारे विद्यार्थी अर्ज करू शकतात
3) केवळ एसएससी परीक्षेत किमान 60% मिळवलेले विद्यार्थी आणि HSC परीक्षेत किमान 50% आणि PCM ग्रुपमध्ये किमान 60% गुण मिळवलेले विद्यार्थी सिमेन्स शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत.
4) ज्या विद्यार्थ्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2 लाख रुपयांपेक्षा कमी आहे असेच विद्यार्थी सीमेन्स शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात.

◆ टीप:- सीमेन्स शिष्यवृत्तीसाठी ५०% शिष्यवृत्ती विद्यार्थिनींसाठी राखीव आहे.

◆ ऑनलाईन अर्जासाठी लिंक:-
https://www.ssp-india.co.in/scholarship/apply

◆ सीमेन्स शिष्यवृत्तीबद्दल अधिक माहितीसाठी पुढील लिंकवर क्लिक करा. :-
https://www.siemens.com/in/en/company/sustainability/corporate-citizenship/siemens-scholarship-program.html

◆ संपर्क:
ई-मेल आयडी- corporate.citizenship.in@siemens.com