माननीय श्री. शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन एज्युकेशन

फेलोशिपची रक्कम :- वार्षिक ६०,०००/- (रुपये साठ हजार फक्त)

शेवटची तारीख:- १२ ऑक्टोबर २०२२

फेलोशिप बद्दल:-

फेलोशिपमधील उपक्रमाचा कालावधी: एप्रिल २०२३ ते एप्रिल २०२४

पात्रता निकष:-

१) महाराष्ट्रातील शाळांत व ज्युनिअर कॉलेजात कार्यरत असलेले  शिक्षक, जे   नियमित अध्यापन करत विद्यार्थ्यांच्या सहभागाने चालणारे व वर्षभर विकसित होत जातील असे अभ्यासक्रमेतर व वेळापत्रकेतर शैक्षणिक उपक्रम करत असलेले/ करू इच्छिणारे शिक्षक या फेलोशिप करता अर्ज करण्यास पात्र आहेत.

2) वय वर्षे ४५ किंवा त्यापेक्षा कमी वय असणारे शिक्षक या फेलोशिप करता अर्ज करण्यास पात्र आहेत.

Fellowship TimeLine :-

– ऑनलाइन फॉर्म सबमिशन – १२ ऑगस्ट २०२२ ते १२ ऑक्टोबर २०२२

– फेलोशिप  निकालाची घोषणा – ११ नोव्हेंबर २०२२

– फेलोशिप प्रदान सोहळा कार्यक्रम  – ११ डिसेंबर २०२२

– फेलोशिप  प्रथम कार्यशाळा – २१, २२, २३ एप्रिल २०२३

– प्रकल्पाना भेटी – १५ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट २०२३

– फेलोशिप  द्वितीय कार्यशाळा – १८,१९,२० नोव्हेंबर २०२३

– तृतीय कार्यशाळा व प्रकल्प अहवालाचे सादरीकरण – २६, २७, २८ एप्रिल २०२४

फेलोशिपकरता अर्ज करण्याची पद्धत :-

१) शिक्षकांनी https://apply.sharadpawarfellowship.com या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावे.

२) ज्या शिक्षकांना  फेलोशिपकरता अर्ज करायचा आहे अशा शिक्षकांनी  फेलोशिपसाठी स्वतः हाती घेणार असलेल्या “शैक्षणिक परिवर्तन उपक्रमाण विषयी मराठी किंवा इंग्रजी भाषेत पुढे नमूद केलेल्या मुद्दयांच्या आधारे सुमारे १००० शब्दांत माहिती लिहून अर्जासोबत जोडणे अपेक्षित आहे.

२.१ उपक्रमाचे शीर्षक

२.२ उपक्रमाची गरज, उपक्रम आपण का निवडला?

२.३ उपक्रमाचे महत्व

२.४ उपक्रमाचे नाविन्य व वेगळेपण शासकीय योजनेपेक्षा वेगळे परंतु शासकीय योजनांना पूरक

२.५ शिक्षकाने यापूर्वी काही नवोपक्रम केले आहेत काय ?

२.६ यापूर्वी शासनास किवा इतर संस्थेस आपण काही नवोपक्रम सदर केले आहेत काय ?

२.७ आपल्या नवोपक्रमाची दाखल घेतली गेली आहे काय ? असल्यास कोणत्या स्तरापर्यंत

– जिल्हास्तर

– राज्यस्तर

– राष्ट्रीयस्तर

२.८ उपक्रमासाठी लागणारी साधने व सोयी

२.९ आपला उपक्रम साधारण किती दिवस चालेल ?

आपल्या उपक्रमाचे वेळापत्रक

३.१ उपक्रमाची फलनिष्पत्ती पाहण्यासाठीची व्यवस्था

३.४ उपक्रमासाठीचे अंदाजपत्रक

३.५ उपक्रमासाठीचे वेळापत्रक

४. आपण प्रस्तावित करत असलेला उपक्रम पूर्वीपासून राबवत असाल तर त्याचा तपशील (छायाचित्र, चित्रफित, परखड मूल्यमापन इ. अर्जासोबत जोडावे.

Note:- फक्त २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात बदली न होणाऱ्या  शिक्षकांनीच फेलोशीपकरिता अर्ज करावा.

Link to Download Information Brochure : –

https://drive.google.com/file/d/1IGP1MH_STDRcwMXrXS325CS_CT5utSJV/view?usp=sharing

अधिक माहितीसाठी लिंक:-

https://www.sharadpawarfellowship.com/fellowships/education-fellowship

ऑनलाईन अर्जासाठी लिंक:-

https://apply.sharadpawarfellowship.com

संपर्क तपशील:-

योगेश कुदळे

फील्ड  कोऑर्डिनेटर  , एज्युकेशनल  डेव्हलपमेंट फोरम  , यशवंतराव चव्हाण सेंटर, जन.जगन्नाथराव भोसले मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

ई-मेल आयडी : yashdeepkudale@gmail.com

फोन नं : 93707 99791