◆ शिष्यवृत्तीची रक्कम :- रु. २५,०००/- (पंचवीस हजार रुपये)
◆ अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ३० डिसेंबर २०२२
◆आवश्यक पात्रता:-
१) योजनेचा लाभ घेणारा विद्यार्थी/विद्यार्थीनी पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील रहिवासी असावा/असावी.
२) या योजनेचा लाभ घेणा-या विद्यार्थ्याला फेब्रुवारी-मार्च २०२२ या शैक्षणिक वर्षात इयत्ता बारावीमध्ये कमीत कमी ८०% पेक्षा जास्त गुण आवश्यक.
३) पुणे महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थी असल्यास किंवा रात्रशाळेतील विद्यार्थी असल्यास किंवा मागासवर्गीय विद्यार्थी असल्यास अशा विद्यार्थ्याला इयत्ता बारावीमध्ये किमान ७०% पेक्षा जास्त गुण आवश्यक.
४) योजनेचा लाभ घेणारा विद्यार्थी/विद्यार्थीनी जर ४० टक्के अपंग असेल तर अशा विद्यार्थी/विद्यार्थीनीला इयत्ता बारावीमध्ये किमान ६५% पेक्षा जास्त गुण असणे आवश्यक .
५) योजनेचा लाभ घेणारा विद्यार्थी/विद्यार्थीनीने बारावीनंतर पुढील शिक्षणासाठी मान्यताप्राप्त संस्थत प्रवेश घेतलेला असावा.
◆ आवश्यक कागदपत्रे:-
१) कुटुंबाचे पुणे महानगरपालिका हद्दीत किमान ३ वर्षे वास्तव्य असल्याचा पुरावा म्हणून मागील ३ वर्षाचा मनपा टॅक्स पावती किंवा लाईट बिल किंवा टेलिफोन बिल (लॅण्डलाईन) किंवा झोपडी फोटो पास / झोपडी सेवा शुल्क पावती / भाडे करारनामा यांपैकी एक जोडणे आवश्यक
२) अर्जदाराचे आधार कार्ड व बँक पासबुक साक्षांकित प्रत जोडणे आवश्यक
३) वयाच्या पुराव्यासाठी जन्मदाखला / शाळेचा दाखला किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र आवश्यकगांनी अपंगत्वाचा दाखला जोडणे आवश्यक
४) मागासवर्गीय असल्यास जातीचा दाखला जोडणे आवश्यक
५) अपंगांनी अपंगत्वाचा दाखला जोडणे आवश्यक
६) महाविद्यालाचे प्रवेश शुल्क पावती आणि प्रवेश पत्र आवश्यक
7) रेशनिंग कार्डची साक्षांकित प्रत
- Raman Kant Munjal Scholarship
- रमण कांत मुंजाल शिष्यवृत्ती
- AGA KHAN FOUNDATION SCHOLARSHIP
- आगा खान फाउंडेशन शिष्यवृत्ती
- K. C. Mahindra Scholarships
for Post-Graduate Studies Abroad
NOTE;-
दिनांक ०१/०५/२००१ नंतर जन्माला आलेल्या व हयात अपत्यांमुळे कुटुंबाच्या अपत्यांची संख्या दोनपेक्षा जास्त झाल्यास योजनेचा लाभ मिळणार नाही
इयत्ता १२ वी नंतर शासनमान्य वा विद्यापीठ मान्य संस्थेत कोणत्याही एका शाखेत प्रवेश घेतला असल्यास शैक्षणिक अर्थसहाय्य देण्यात येईल.
◆ अधिक माहितीसाठी लिंक:-
https://dbt.pmc.gov.in/app/index.html#!/social-development-department
◆ ऑनलाईन अर्जासाठी लिंक:-
https://dbt.pmc.gov.in/app/index.html#!/citizen_registration
◆संपर्क:-
१८०० १०३० २२२ (टोल फ्री)
पत्ता- पुणे महानगरपालिका मुख्य इमारत, मंगला थिएटरजवळ, शिवाजी नगर, पुणे- ४११ ००५
info@punecorporation.org pmcdbthelp@gmail.com
◆अधिकृत संकेतस्थळ: – https://www.pmc.gov.in/en/educational-schemes