◆ शिष्यवृत्ती रक्कम:-
₹ २५०० प्रती महिना मुलांकरिता
₹ ३००० प्रती महिना मुलींकरीता
शिष्यवृत्तीची रक्कम निवडलेल्या विद्यार्थ्यांना वर्षाकाठी दिली जाते.
◆ पंतप्रधान शिष्यवृत्ती योजनेबद्दल-
सशस्त्र सेना, पॅरा मिलिटरी फोर्सेस आणि रेल्वे प्रोटेक्शन फोर्सच्या शहीद / माजी कर्मचाऱ्यांच्या विधवा पत्नी आणि मुलांना तांत्रिक आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी ‘पंतप्रधान शिष्यवृत्ती योजना’ राबविली जात आहे. पंतप्रधान कार्यालयाद्वारे प्रशासित राष्ट्रीय संरक्षण निधीतून या योजनेला अर्थसहाय्य दिले जाते. ही शिष्यवृत्ती विविध तांत्रिक संस्था (वैद्यकीय, दंत, पशुवैद्यकीय, अभियांत्रिकी, एमबीए, एमसीए आणि एआयसीटीई / यूजीसीची मान्यता असणाऱ्या इतर समकक्ष तांत्रिक संस्था) संस्थांमध्ये शिक्षणासाठी उपलब्ध आहेत.
◆ पात्र अभ्यासक्रम: –
१) बीई, बी टेक, बीडीएस, एमबीबीएस, बी एड, बीबीए, बीसीए, बी फार्मा इत्यादी कोर्सच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतलेले सैन्य दलातील निवृत्त जवानांची त्याच बरोबर तटरक्षक दलाच्या निवृत्त जवानांची मुले शिष्यवृत्ती करिता अर्ज करू शकतात. व्यावसायिक पदवी अभ्यासक्रम, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, भारतीय वैद्यकीय परिषद, यूजीसी यासारख्या संबंधित सरकारी नियामक संस्थांनी योग्यरित्या मान्य केले. इ.
२) एमबीए / एमसीए अभ्यासक्रम वगळता कोणतेही पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम पात्र नाहीत.
३) परदेशात शिक्षण घेणारे विद्यार्थी या योजनेस पात्र नाहीत. पीएमएसएस अंतर्गत कोणतेही दूरस्थ शिक्षण अभ्यासक्रमास परवानगी नाही. पीएमएसएसचा लाभ फक्त एका कोर्ससाठी घेता येतो.
◆ पात्रता :-
१) ज्या विद्यार्थ्यांनी वरती नमूद केलेल्या संस्थांत पदवी अथवा पदव्युत्तर पदवीच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतला आहे असे विद्यार्थी फक्त या शिष्यवृत्ती करिता करण्यास पात्र आहेत. डिप्लोमा कोर्स पूर्ण केलेले विद्यार्थी थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेतली ते सुद्धा या शिष्यवृत्ती करिता अर्ज करण्यास पात्र आहेत.
२) विद्यार्थ्यांनी किमान शैक्षणिक पात्रता म्हणजेच बारावी / डिप्लोमा / ग्रॅज्युएशनमध्ये ६०% आणि त्यापेक्षा जास्त गुण मिळवले पाहिजेत.
३) द्वितीय किंवा त्यानंतरच्या वर्षांत शिकणारे विद्यार्थी पात्र नाहीत
४) पॅरा मिलिटरी कर्मचाऱ्यांची मुले या शिष्यवृत्ती करिता अर्ज करण्यास पात्र नाहीत.
५) सैन्य दलातील निवृत्त जवान त्याचबरोबर तटरक्षक दलातील जवान यांची मुले या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.
◆ आवश्यक कागदपत्र: –
१) बोनाफाईड प्रमाणपत्र कुलगुरू / मुख्याध्यापक / कुलगुरू / डीन / सहयोगी डीन / कुलसचिव / उपनिबंधक / संचालक / उपसंचालक यांनी सही केले.
२) विद्यार्थी आणि पालक माजी सैन्य दलातील निवृत्त जवानांचे स्वयं घोषणा पत्र ( वेबसाईट वर घोषणापत्र नमुना दिला आहे)
३) आधार नंबर बँक खात्याशी संलग्न असले बाबत बँक मॅनेजर चे पत्र.
४) मूळ मार्कशीट (दोन्ही सेमिस्टर / शैक्षणिक वर्ष) विद्यापीठाने जारी केल्या. संगणकाने व्युत्पन्न केलेल्या मार्कशीट अपलोड केल्या जाणार नाहीत.
५) (सर्व विद्यार्थ्यांना लागू नाही). ज्या विद्यार्थ्यांची गुणपत्रिका संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर विद्यापीठ जारी करणार असेल तर अशा त्यासंबंधीचे विद्यापीठ परीक्षा विभागाने स्वाक्षरी केलेले प्रमाणपत्र.
६) बँक पास बुकचे प्रथम पान किंवा विद्यार्थ्यांचे रद्द केलेले धनादेश (नाव व खाते क्रमांक छापल्यास)
७) विद्यार्थ्यांचे आधार कार्ड
◆ अर्ज करण्याची पद्धत:–
ऑनलाइन, www.ksb.gov.in या संकेतस्थळावर ती जाऊन विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करावेत.
◆ अर्ज करण्याकरिता लिंक:-
http://164.100.158.73/registration.htm
◆ संपर्क:-
संकेतस्थळ:- https://ksb.gov.in/introduction-pmss.htm
ईमेल – ksbwebsitehelpline@gmail.com, Jdautomationksb-mod@gov.in, Jdpmssksb-mod@gov.in
दूरध्वनी- ०११-२६७१५२५०