ओएनजीसी क्रीडा शिष्यवृत्ती

◆ शिष्यवृत्तीचे फायदे :-
१) शिष्यवृत्तीची रक्कम-
सब ज्युनियर खेळाडूंसाठी-
रु. 15,000 प्रति महिना (जे खेळाडू राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेत सहभाग घेतात त्यांच्याकरिता )
रु. 20,000 प्रति महिना (जे खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेत सहभाग घेतात त्यांच्याकरिता )
ज्युनियर खेळाडूंसाठी-
रु. 20,000 प्रति महिना (जे खेळाडू राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेत सहभाग घेतात त्यांच्याकरिता )
रु. 25,000 प्रति महिना (जे खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेत सहभाग घेतात त्यांच्याकरिता )
सिनियर खेळाडूंसाठी-
रु. 25,000 प्रति महिना (जे खेळाडू राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेत सहभाग घेतात त्यांच्याकरिता )
रु. 30,000 प्रति महिना (जे खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेत सहभाग घेतात त्यांच्याकरिता )
२) आरोग्य विमा संरक्षण रु. 5,00,000/- (फक्त पाच लाख)

◆ शेवटची तारीख:– 21 सप्टेंबर 2022

◆ शिष्यवृत्ती बद्दल:-
ओएनजीसी कंपनीकडून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेत २५० खेळाडूंना दर महिन्याला स्पोर्ट शिष्यवृत्ती दिली जाते. दरमहिन्याला १५ हजार ते तीस हजार रुपयांपर्यंत खेळाडूंना शिष्यवृत्ती दिली जाते.

◆ ओएनजीसी क्रीडा शिष्यवृत्तीसाठी पात्र खेळ :-
कुस्ती, नेमबाजी, पॅरा स्पोर्ट्स, जिम्नॅस्टिक, बॉक्सिंग, तिरंदाजी,नेमबाजी , व्हॉलीबॉल, टेनिस, टेबल टेनिस, स्क्वॉश, कबड्डी, हॉकी, गोल्फ, फुटबॉल, क्रिकेट, बुद्धिबळ, कॅरम, बिलियर्ड्स आणि स्नूकर, बास्केटबॉल, बॅडमिंटन, अथलेटिक्स

◆ शिष्यवृत्तीसाठी निकष:-
ओएनजीसी स्पोर्ट स्कॉलरशिपसाठी खेळाडूंची निवड खेळाडूंच्या खेळातील प्रोफिशिअन्सीच्या आधारे केली जाते . राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय क्रीडा महासंघ/संघटनांद्वारे मान्यताप्राप्त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा/इव्हेंट्समधील सहभाग / कार्यक्षमतेच्या आधारावर खेळाडूचे खेळांमधील प्रोफिशिअन्सीचे मूल्यमापन केले जाईल.

◆ ओएनजीसी स्पोर्ट्स स्कॉलरशिपबद्दल अधिक माहितीसाठी लिंक:-
https://sportsscholarship.ongc.co.in/

◆ ऑनलाईन अर्जासाठी लिंक:-
https://sportsscholarship.ongc.co.in/register

◆ टीप:-
इतर कोणत्याही संस्थेकडून कोणतीही शिष्यवृत्ती / स्टायपेंड न घेणारे भारतीय नागरिकत्व असणारे खेळाडू ओएनजीसी स्पोर्ट स्कॉलरशिपसाठी अर्ज करू शकतात.
14 ते 25 वर्षे वयोगटातील खेळाडूंना ONGC स्पोर्ट शिष्यवृत्ती दिली जाईल. 1 एप्रिल 2022 रोजी किमान वय 14 वर्षे मानले जाईल. तथापि, बुद्धिबळ, जिम्नॅस्टिक्स आणि जलतरण यातील शिष्यवृत्तीसाठी किमान वयाचा निकष 10 वर्षे असेल.
जास्तीत जास्त वय ज्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाऊ शकते ते 25 वर्षे आहे. म्हणून, 1 एप्रिल 2022 रोजी 24 वर्षांपर्यंतचे अर्जदार क्रीडा शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात.
ज्या खेळाडूंना ONGC स्पोर्ट शिष्यवृत्ती मिळेल त्यांना PSPB/AIPSSPB आणि देशातील इतर स्पर्धांमध्ये ONGC संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली जाऊ शकते.
ज्या खेळाडूंना ONGC स्पोर्ट शिष्यवृत्ती मिळेल त्यांना ट्रॅव्हलिंग अलाउन्स / महागाई भत्ता आणि स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी आवश्यक खर्च दिला जाईल.
ओएनजीसी स्पोर्ट स्कॉलरशिप प्राप्त करणार्‍या खेळाडूंना ओएनजीसी लोगोसह खेळण्याचे किट देखील प्रदान केले जातील जे त्यांनी स्पर्धांमध्ये सहभागी होताना परिधान करावे.

◆ संपर्क तपशील:-
पत्ता- प्लॉट नंबर 5 नेल्सन मंडेला मार्ग, वसंत कुंज, नवी दिल्ली, 110070
कॉर्पोरेट क्रीडा विभाग
ईमेल- sports_scholarshio@ongc.co.in
संपर्क क्रमांक – 011-26751413 / 011-26751421