नवी मुंबई महानगरपालिका क्रीडा शिष्यवृत्ती

◆ अर्ज करण्याची अंतिम तारीख:– ३१ डिसेंबर २०२२

◆ शिष्यवृत्ती बद्दल:-
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील रहिवासी असलेल्या खेळाडूंना शालेय तसेच शासन मान्यता प्राप्त खेळांचे संघटनेद्वारे आयोजित राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धा व राष्ट्रीय क्रिडा स्पर्धांमध्ये प्राविण्य प्राप्त खेळाडूंना अधिकाधिक प्रोत्साहन देण्याकरिता नवी मुंबई महानगर पालिकेकडून ‘क्रिडा शिष्यवृत्ती’ दिली जाणार आहे.

◆ पात्रता निकष:-
जे विद्यार्थी नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात राहत आहेत आणि त्यांनी शालेय क्रीडा स्पर्धा तसेच शासन मान्यता प्राप्त संघटनाद्वारे आयोजित केलेल्या स्पर्धा किंवा निवडचाचण्या, किंवा राज्य अजिंक्यपद निवड चाचणी, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा अशा स्पर्धामध्ये प्राविण्य मिळवले आहे अशा विद्यार्थ्यांना महानगर नवी मुंबई महानगरपालिकडून क्रीडा शिष्यवृत्ती दिली जाईल.

◆ आवश्यक कागदपत्रे :-
1) आधारकार्डची सत्यप्रत
2) खेळाचे प्राविण्य मिळवल्याबद्दल प्रमाणपत्र ( सत्यप्रत )
3) बँक पासबुक झेरॉक्स किंवा कॅन्सल चेकची कॉपी

◆ अधिक माहितीसाठी लिंक:-
https://www.nmmc.gov.in
https://drive.google.com/file/d/1h1X5who2EfDaoLkuCo5JIGG7YoXtHP7U/view?usp=sharing

◆ अर्ज डाउनलोड करण्याकरिता लिंक:-
https://drive.google.com/file/d/1h1X5who2EfDaoLkuCo5JIGG7YoXtHP7U/view?usp=sharing

◆ शिष्यवृत्ती करता अर्ज करण्याची पद्धती :-

  • पुढे दिलेल्या लिंक वरील अर्ज डाऊनलोड करा
    https://drive.google.com/file/d/1h1X5who2EfDaoLkuCo5JIGG7YoXtHP7U/view?usp=sharing
  • अर्जासोबत नमूद केलेली डॉक्युमेंट्स जोडा.
  • संपूर्ण भरलेला अर्ज आणि डॉक्युमेंट्स ची कॉपी नवी मुंबई महानगरपालिका क्रिडा विभाग, स्व राजीव गांधी क्रिडा संकुल, से-३, सीबीडी बेलापूर या पत्त्यावरती पोहोचवा

◆ संपर्क तपशील:-
पत्ता- नवी मुंबई महानगरपालिका क्रिडा विभाग, स्व राजीव गांधी क्रिडा संकुल, से-३, सीबीडी बेलापूर
दूरध्वनी – २७५७३२९४

If You Have any Query About Scholaships ask on our Social Media Channels.

To Stay Updated About Scholarship info Visit our Social Media Channels.