◆ शिष्यवृत्तीची रक्कम:- ६०,००० रुपये ( साठ हजार रुपये )
◆ शेवटची तारीख:- १०-सप्टेंबर -२०२१
◆ शिष्यवृत्ती बद्दल:-
लाखो भारतीय घरे उजळवून, लेग्रँडने गेल्या वर्षी शिक्षणाच्या क्षेत्रात प्रवेश केला. मुलींना त्यांचे उच्च शिक्षण घेण्यास मदत करण्याच्या हेतूने, लेग्रँड द्वारा समर्थित लेग्रँड शिष्यवृत्ती कार्यक्रम, गुणवंत मुलींना अभियांत्रिकी आणि आर्किटेक्चरमध्ये करिअर करण्यासाठी प्रोत्साहित करत आहे.
◆ पात्रता निकष:-
1) ही शिष्यवृत्ती फक्त मुलींसाठी आहे.
2) विद्यार्थीनीने २०२१ मध्ये १२ वी उत्तीर्ण केलेली असावी आणि १० वी आणि १२ वी बोर्डाच्या परीक्षेत किमान ७५% गुण मिळवले असावेत.
3) विद्यार्थीनींनी भारतातील मान्यताप्राप्त महाविद्यालय/विद्यापीठात शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ मध्ये B.Tech/B.E./B.Arch अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतला असावा किंवा प्रवेश घेण्याचे प्रयोजन असावे.
4) शिष्यवृत्ती फक्त अशा विद्यार्थ्यांनींसाठी उपलब्ध आहे ज्यांचे कौटुंबिक उत्पन्न सर्व स्त्रोतांकडून ५०००० (पाच लाख) रुपयांपेक्षा कमी आहे
5) ज्या विद्यार्थ्यांनी कोविड -१९ मुळे त्यांचे पालक गमावले त्यांना शिष्यवृत्ती मध्ये प्राधान्य दिले जाईल.
◆ आवश्यक कागदपत्र:-
1) वयाचा पुरावा (जन्म प्रमाणपत्र, आधार कार्ड, पासपोर्ट, इयत्ता 10 शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र)
2) आधार कार्ड (जर आधार कार्ड उपलब्ध नसेल तर पत्त्याच्या पुराव्यासाठी समतुल्य दस्तऐवज)
3) दहावीची गुणपत्रिका
4) १२ वीची गुणपत्रिका
5) कौटुंबिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र किंवा पालकांचे फॉर्म १६ / गेल्या ६ महिन्यांचे बँक स्टेटमेंट
6) पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
7) प्रवेशाचा पुरावा किंवा कॉलेज/विद्यापीठ फी पावती
◆ ऑनलाईन अर्जासाठी लिंक:-
http://www.legrandscholarship.co.in/#about
◆ संपर्क:-
1) पत्ता- ६१/६२, सहावा मजला कल्पतरू स्क्वेअर, कोंडिविटा रोड, ऑफ अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०० ०५९
2) फोन- +91-11-43092248
3) ईमेल- legrand@buddy4study.com