संशोधनात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय अनुदान
◆ अंतिम तारीख: २५ ऑगस्ट २०२१
◆ अर्ज कोण करू शकतात:
१) स्ट्रीम एसए: शैक्षणिक वर्ष २०२१-२२ दरम्यान अकरावी (विज्ञान शाखा) मध्ये शिक्षण घेणाऱ्या/घेऊ इच्छिणाऱ्या आणि पुढे शैक्षणिक वर्ष २०२३-२४ दरम्यान मूलभूत विज्ञान (B.Sc/BS/B.Stat./B.Math./Int. M.Sc./Int. MS) शिक्षण घेण्याचे नियोजन असणारे विद्यार्थी.
२) स्ट्रीम एसएक्स: शैक्षणिक वर्ष २०२१-२२ दरम्यान बारावी (विज्ञान शाखा) मध्ये शिक्षण घेणाऱ्या/घेऊ इच्छिणाऱ्या आणि पुढे शैक्षणिक वर्ष २०२२/२३ दरम्यान मूलभूत विज्ञान (B.Sc/BS/B.Stat./B.Math./Int. M.Sc./Int. MS) शिक्षण घेण्याचे नियोजन असणारे विद्यार्थी.
३) स्ट्रीम एसबी: शैक्षणिक वर्ष २०२१-२२ दरम्यान प्रथम वर्ष विज्ञान शाखेत शिक्षण घेणाऱ्या/घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी.
◆ महत्वाच्या तारखा:-
१) अर्ज ऑनलाईन सादर करण्याची सुरुवात: १२ जुलै २०२१ संध्याकाळी ५ वाजता.
२) ऑनलाइन अर्ज बंद करण्याची शेवटची तारीख: २५ ऑगस्ट २०२१
३) केव्हीपीवाय अॅप्टिट्यूड टेस्ट: ७ नोव्हेंबर २०२१
◆ अधिक माहितीसाठी:- http://www.kvpy.iisc.ac.in
◆ संपर्क:-
संयोजक, केव्हीपीवाय, आयआयएससी, बेंगळुरू -५६०-०१२