इन्स्पायर शिष्यवृत्ती (उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती)

इन्स्पायर शिष्यवृत्ती बद्दल:-

इन्स्पायर शिष्यवृत्ती भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाद्वारे दिली  जाते. भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाकडून गुणवंत विद्यार्थ्यांना महाविद्यालय आणि विद्यापीठ स्तरावर बेसिक सायन्स आणि Natural सायन्स  या अभ्यासक्रमांचा  अभ्यास  करण्यासाठी आणि अभियांत्रिकी, औषध, कृषी आणि पशुवैद्यकीय विज्ञान या दोन्ही मूलभूत आणि उपयोजित विज्ञान क्षेत्रांमध्ये संशोधन करिअर करण्यासाठी आकर्षित करण्यासाठी INSPIRE शिष्यवृत्ती दिली जाते. इन्स्पायर शिष्यवृत्ती पदवी  (यूजी)  आणि पदव्युत्तर पदवी (पीजी)  अभ्यासक्रमांचे शिक्षण घेण्याकरिता दिली  जाते.

शिष्यवृत्तीची रक्कम:– प्रति वर्ष 80,000 रुपये

शेवटची तारीख:- ३१ ऑक्टोबर २०२२

पात्र अभ्यासक्रम:-

खाली नमूद केलेल्या विषयांत B.Sc./ B.S. / Int. M.Sc./ Int. M.S.यापैकी कोणत्याही अभ्यासक्रमात शिक्षण घेणारे विद्यार्थी INSPIRE शिष्यवृत्तीकरीता अर्ज करू शकतात.

(१) भौतिकशास्त्र, (२) रसायनशास्त्र, (३) गणित, (४) जीवशास्त्र, (५) सांख्यिकी, (६) भूविज्ञान, (७) खगोल भौतिकशास्त्र, (८) खगोलशास्त्र, (९) इलेक्ट्रॉनिक्स, (१०) अभ्यासक्रम वनस्पतिशास्त्र, (11) प्राणीशास्त्र, (12) जैव-रसायनशास्त्र, (13) मानवशास्त्र, (14) सूक्ष्मजीवशास्त्र, (15) भूभौतिकशास्त्र, (16) भू-रसायनशास्त्र, (17) वायुमंडलीय विज्ञान आणि (18) सागरी विज्ञान.

पात्रता निकष:-

1) कोणत्याही राज्य/केंद्रीय बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेत एकूण टॉप 1% गुणांसह उत्तीर्ण झालेले गुणवंत विद्यार्थी आणि सध्या भारतात B.Sc./ B.S. / Int. M.Sc./ Int. M.S ( बेसिक सायन्स आणि Natural सायन्स ) अशा अभ्यासक्रमांत शिक्षण घेणारे विद्यार्थी या शिष्यवृत्तीकरिता अर्ज करण्यास पात्र आहेत.

किंवा

2) ज्या विद्यार्थ्यांनी  IIT-JEE , AIPMT , NEET  अशा परीक्षांत  दहा हजार पर्यंत रँक मिळवलेले आणि या शैक्षणिक वर्षात  B.Sc./ B.S. / Int. M.Sc./ Int. M.S ( बेसिक सायन्स आणि Natural सायन्स ) अशा अभ्यासक्रमांत शिक्षण घेणारे विद्यार्थी या शिष्यवृत्तीकरिता अर्ज करण्यास पात्र आहेत.

3) नॅशनल टॅलेंट सर्च एक्झामिनेशन (NTSE) स्कॉलर्स, जगदीश बोस नॅशनल सायन्स टॅलेंट सर्च (JBNSTS) स्कॉलर्स आणि नैसर्गिक आणि बेसिक सायन्स कोर्समधील बॅचलर / मास्टर लेव्हल कोर्स करत असलेले इंटरनॅशनल ऑलिम्पियाड मेडलिस्ट विद्यार्थी देखील इन्स्पायर स्कॉलरशिपसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.

टीप:-

2020-2021 या शैक्षणिक वर्षात 12वी इयत्ता परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी शिष्यवृत्ती अर्जासाठी पात्र नाहीत.

शिष्यवृत्तीकरिता वयोमर्यादा :- १५ ते १७ वर्षे

आवश्यक कागदपत्रे:-

1) पासपोर्ट आकाराचा फोटो

२) दहावीची गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्र

3) बारावीची गुणपत्रिका

4) कॉलेजचे प्राचार्य/संस्थेचे संचालक/विद्यापीठाचे रजिस्ट्रार यांनी स्वाक्षरी केलेला Endorsement Form

5) Eligibility Note/Advisory Note संबंधित राज्य /केंद्रीय परीक्षा मंडळाने उपलब्ध केली असल्यास  (अनिवार्य नाही)

6) आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाड पदक विजेते / IIT-JEE/AIPMT/NEET/JBNSTS/NTSE  अशा परीक्षांमध्ये टॉप रँक मिळवल्याबाबतचे प्रमाणपत्र. (उपलब्ध असल्यास )

7) जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)

अधिक माहितीसाठी लिंक:-

https://online-inspire.gov.in/

अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाइन

ऑनलाईन अर्जासाठी लिंक:-

https://www.online-inspire.gov.in

संपर्क तपशील:-

INSPIRE Programme Division
Department of Science and Technology,
Technology Bhavan, New Mehrauli Road,
New Delhi – 110 016

ईमेल- inspire.prog-dst@nic.in

फोन – 0124 6690020, 0124 6690021