आजवर टीम मॅक्झिमाने शिक्षण आणि परीक्षा का महत्वाच्या यावर आपलं मत नोंदवले आहेच. आजही आपलं मत अयोग्य आहे असं मॅक्झिमा वाटत नाही. पण परीक्षा म्हणजे सर्वकाही नाही असंही आम्ही नेहमीच म्हणत आलोय.
आज थोडंस वेगळं आणि क्वचित काहींना न पटणाऱ्या फेलोशिप बद्दल आपण बोलणार आहोत. आज ऑनलाईनच्या माध्यमातून व्यवहार करणाऱ्या मंडळींना पे-पल (PayPal) बद्दल वेगळं सांगायला नको. तरी वाचकांच्या माहितीसाठी, पे-पल हे ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी उपलब्ध विविध माध्यमांपैकी एक माध्यम आहे. ज्याच्या साहाय्याने आपण आपले ऑनलाईन व्यवहार सुरक्षितपणे करू शकतो. तर या पे-पलचे सहसंथापक पीटर थिल यांनी २०११मध्ये थिल फाऊंडेशन अंतर्गत या ‘थिल फेलोशिप‘ची (The Thiel Fellowship) सुरवात करण्यात आली.
◆ थिल – अनुत्तीर्णनांसाठी संधी
शाळा कॉलेगजांत अयशस्वी, अनुत्तीर्ण झालेल्या तरीही यशस्वी होण्यासाठी मोठी ध्येय, नवनवीन कल्पना उराशी बाळगणाऱ्या मंडळींना ही फेलोशिप मदत करते. मदत करते म्हणजे नक्की किती रक्कम या फेलोशिपच्या माध्यमातून तिच्या फेलोना दिली जाते? तर ही रक्कम १ लाख अमेरिकी डॉलर (७३लाख २२हजार) एवढी आहे. या फेलोशिप बद्दल, तिच्या पात्रता निकषांबद्दल अनेक मतभेद आहे. आता थेट शिक्षण व्यवस्थेला आव्हान द्यायचं म्हणजे मतभेद आणि टीका ही होणारच. काही प्रसंगी ती योग्यही आहे. यांच्या संकेतस्थळावर एकेठिकाणी त्यांनी मार्गरेट मीड यांचं एक वाक्य ठळक शब्दात लिहिलं आहे. “माझ्या आजीला मला शिक्षण द्यायचं होतं, त्यामुळे तिने मला शाळेपासून लांब ठेवलं”. याच्या खाली ‘अनिवार्य परीक्षांना सामोरे जाण्याऐवजी कल्पनांचा पाठपुरावा महत्वाचं, मोठी कर्ज घेण्याऐवजी मोठी जोखीम स्वीकारा…’ अशा अशायचं वाक्य लिहिलं आहे. आता या वाक्यावर काही वाद नक्कीच होतील पण यातील सर्वच मुद्दे काही चुकीचे आहेत असं म्हणता येणार नाही. आणि जर असं असेल तर या फेलोशिपसाठी अमेरिकेच्या एमआयटी (MIT) तुन बाहेर पडणाऱ्या दोघांचं अभिनंदन त्याचं शैक्षणिक संस्थेने केलं नसतं. पुढे याच दोघांनी थिल फेलोशिपचा दोन वर्षांचा कालावधी पूर्ण केल्यानंतर पून्हा एमआयटीमध्ये येऊन आपले शिक्षण सुरू केले हेही इथे अधोरेखित करण्यासारखं.
◆ अनुत्तीर्ण विद्यार्थी ते तरुण अब्जाधीश
रितेश अगरवाल हे नाव काहींनी ऐकलं असेल नसेल पण ओयो (OYO) या भारतीय आंतराष्ट्रीय हॉटेलच्या साखळीचं नाव ऐकलं नाही असं क्वचितच कोणी असेल. या ओयोची सुरुवात करणारा हा तरुण भारतीय. ओडिशा राज्यात वाढलेला पुढे शिक्षणासाठी दिल्ली गाठणारा विद्यार्थी. पण शैक्षणिक विश्वात रमणे त्याला जमले नाही आणि अखेर महाविद्यालयातुन बाहेर पाडण्याची वेळ त्यावर आली. पण नाविन्याचा ध्यास मात्र त्याच्या ठायी होताच. त्याच्या या काहीशा वेगळ्या आणि भविष्यात मोठी संधी निर्माण करणाऱ्या स्वप्नांना बळ दिले ते २०१३मध्ये थिल फेलोशिपने. मग पून्हा मागे वळून पाहण्याची वेळ त्याच्यावर आली नाही.
रितेश अगरवाल हे जगातील अब्जाधीशांच्या यादीतील दुसरे सर्वात तरुण नाव ठरले त्यामागे थिल नक्कीच आहे. असे अनेक अब्जाधीश या थिलने घडवले. यात प्रकर्षाने जाणवणारा मुद्दा म्हणजे ते सर्व आपल्या शैक्षणिक जीवनात उत्तीर्ण होऊ शकले. मात्र हीच त्यांच्यासाठी संधी ठरली कारण त्यांच्यामागे ‘थिल फेलोशिप’ उभी होती.
◆ सूचना:-
सुरुवातीला म्हंटल्याप्रमाणे शिक्षण अथवा परीक्षा यांना दुय्यम ठरवण्याचा आमचा प्रयत्न अजिबात नाही. पण शैक्षणिक यशस्वीता म्हणजे सर्वकाही नाही हेही तितकंच खरं. हेच पटवून देण्यासाठी आम्ही संबंधित फेलोशिप माहिती आपल्यासोबत मांडली केली आहे.
फेलोशिपसाठी अर्ज असा करा
https://maximaofficial.in/the-thiel-fellowship_marathi/(opens in a new tab)