कमिन्स शिष्यवृत्ती

◆ शिष्यवृत्तीचे फायदे:-
कॉलेज फी, कमिन्स कर्मचाऱ्यांकडून मेंटरशिप, सॉफ्ट स्किल्स ई-लर्निंग रिसोर्सेस

◆ शिष्यवृत्ती बद्दल
कमिन्स स्कॉलरशिप प्रोग्रामची स्थापना कमिन्स इंडिया फाउंडेशन (CIF) द्वारे 2006 मध्ये आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या वंचित पार्श्वभूमीतील गुणवंत विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी केली गेली होती. ज्यांना अभियांत्रिकीमध्ये व्यावसायिक पदवी आणि पदविका अभ्यासक्रमात शिक्षण घ्यायचे आहे अशांना या शिष्यवृत्ती अंतर्गत आर्थिक मदत केली जाते. या उपक्रमाने आजपर्यंत १९३९ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली आहे.

◆ पात्र अभ्यासक्रम:-
अभियांत्रिकीची पदवी
अभियांत्रिकी डिप्लोमा

◆ पात्रता निकष :-
1) ज्यांचे कौटुंबिक उत्पन्न प्रतिवर्ष ₹ 6 लाख (सहा लाख)पेक्षा कमी आहे असे विद्यार्थी शिष्यवृत्ती अर्जासाठी पात्र आहेत.
2) अभियांत्रिकी पदवीच्या पहिल्या, दुसऱ्या, आणि तिसऱ्या वर्षात किंवा डिप्लोमाच्या पहिल्या, दुसऱ्या वर्षात शिकणारे विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत.
३) सध्या अभियांत्रिकीमधील व्यावसायिक पदवी/डिप्लोमाच्या कोणत्याही वर्षात शिक्षण घेत असलेले आणि ज्यांनी 10वी किंवा 12वीच्या परीक्षेत किमान 60% गुण मिळवलेत असे विद्यार्थी कमिन्स शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.
4) शिष्यवृत्ती अर्जासाठी विद्यार्थ्यांचे वय 25 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
5) शिष्यवृत्तीसाठी प्रथम / द्वितीय वर्ष पदवी आणि डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल.
6) अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमाच्या शेवटच्या वर्षाला बसलेले विद्यार्थी आणि पदव्युत्तर विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र नाहीत.

◆ ऑनलाइन अर्जासाठी लिंक:-
https://nurturingbrilliance.org/#

◆ शिष्यवृत्तीबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी लिंक:-
https://www.cummins.com/en/in/company/corporate-responsibility/global-impact/projects/higher-education/india-scholarship-program.

◆ शिष्यवृत्तीचा कालावधी:-
विद्यार्थ्यांना प्रवेशित अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत शिष्यवृत्तीचा लाभ मिळेेल.

◆ टीप :-
१) खाजगी शिकवणी फी, वसतिगृह, मेस, वाहतूक, बस खर्च इत्यादी. तसेच निवासासी खर्च, कॅन्टीन किंवा कॅफेटेरियाचे शुल्क आणि/किंवा, शैक्षणिक संस्थेने आकारलेले परत करण्यायोग्य पैसे/न परत करण्यायोग्य किंवा सेक्युरीटी अमाउंट शिष्यवृत्ती अंतर्गत समाविष्ट नाहीत.
२) एका कुटुंबातील एकच उमेदवार या शिष्यवृत्तीसाठी पात्र आहे.
३) केवळ अहमदनगर, इंदूर, जमशेदपूर, फलटण, पुणे, नागपूर, या जिल्ह्यांमध्ये आणि आसपास शिकणारे विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत.

◆ आवश्यक कागदपत्रे:-
1) आजपर्यंतच्या सर्व मार्कशीट- 10वी, 12वीसह
2) फी पावती
3) उत्पन्नाचे प्रमाणपत्र

◆ संपर्क तपशील:-
ईमेल – indiacr@cummins.com
फोन – 8956553173