◆ अर्ज करण्याची अंतिम तारीख: – २८ मार्च २०२१
◆ शिष्यवृत्तीची रक्कम: – ४०,०००/- (चाळीस हजार रुपये)
◆ शिष्यवृत्तीबद्दलः
या योजनेचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गुणवंत विद्यार्थ्यांना बी.ई./बी.टेकचे शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन आणि आर्थिक साहाय्य करणे हे आहे. जेणेकरुन ते आपलं उच्च शिक्षण पूर्ण करू शकतील.
◆ पात्रता निकष: –
१) ज्या विद्यार्थ्यांनी दहावी आणि बारावी किंवा डिप्लोमामध्ये किमान ५०% गुण प्राप्त केले आहेत आणि BE किंवा BTech अभ्यासक्रमाच्या कोणत्याही वर्षात प्रवेश घेतला आहे असे विद्यार्थी या शिष्यवृत्तीस अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
२) ज्या विद्यार्थ्यांचे कौटुंबिक उत्पन्न ५,००,०००/- पेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यास ही शिष्यवृत्ती उपलब्ध आहे.
◆ आवश्यक कागदपत्रे : –
१) ओळखीचा पुरावा
२) पत्त्याचा पुरावा
३) 10 वी, 12 वी / ,डिप्लोमा मार्कशीट
४) द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी – मागील शैक्षणिक वर्षांची मार्कशीट
५) उत्पन्नाचा दाखला / आयटीआर /पालकांची सॅलरी स्लिप / फॉर्म नंबर १६.
६) विद्यार्थ्यांचे बँक पासबुक
७) ॲडमिशन कन्फर्मेशन लेटर
८) चालू वर्षाची महाविद्यालयीन फी पावती / फी स्ट्रक्चर.
९) बोनाफाईड प्रमाणपत्र
◆ संपर्क तपशील: –
१) पत्ता- टाईम्स टॉवर, पहिला मजला, कमला मिल्स कंपाऊंड, लोअर परळ, मुंबई – ४०००१३.
२) दूरध्वनी – (०२२) ४०९०४४८४
३) फॅक्स – (०२२) २४९१५२१७
ईमेल- vidyasaarathi@nsdl.co.in
◆ वेबसाइट: – https://www.vidyasaarathi.co.in/Vidyasaarathi/index
◆ टीप: – अहमदाबाद आणि ढोलका येथे राहणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल