◆ अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ३० डिसेंबर २०२२
◆ शिष्यवृत्तीची रक्कम :- रु. १५,०००/- (पंधरा हजार रुपये)
◆आवश्यक पात्रता:-
१) योजनेचा लाभ घेणारा विद्यार्थी/विद्यार्थीनी पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील रहिवासी असावा/असावी.
२) या योजनेचा लाभ घेणा-या विद्यार्थ्याला फेब्रुवारी-मार्च २०२१ या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावीमध्ये कमीत कमी ८० टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे.
३) पुणे महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थी असल्यास किंवा रात्रशाळेतील विद्यार्थी असल्यास किंवा मागासवर्गीय विद्यार्थी असल्यास अशा विद्यार्थ्याला दहावीमध्ये किमान ७० टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे.
४) विद्यार्थी/विद्यार्थीनी जर ४० टक्के अपंग असेल तर अशा विद्यार्थी/विद्यार्थीनीला दहावीमध्ये किमान ६५ टक्के गुण असणे आवश्यक आहे .
५) ज्या विद्यार्थी/विद्यार्थीनीने दहावीनंतर पुढील शिक्षणासाठी मान्यताप्राप्त संस्थत प्रवेश घेतलेला आहे असे विद्यार्थी/विद्यार्थीनी शिष्यवृत्तीकरिता अर्ज करू शकतात.
◆ आवश्यक कागदपत्रे:-
१) वयाच्या पुराव्यासाठी जन्मदाखला / शाळेचा दाखला किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र
२) मागासवर्गीय असल्यास जातीचा दाखला
३) अपंगांनी अपंगत्वाचा दाखला
४) बोर्ड मार्कशीट तसेच CBSE & ICSE शाळेतून उत्तीर्ण झाले असल्यास शाळेचे टक्केवारी प्रमाणपत्र
५) महाविद्यालाचे प्रवेश शुल्क पावती (Fee Receipt) आणि प्रवेश पत्र ( Admission Letter ).
६) रेशनिंग कार्ड
७) कुटुंबाचे पुणे महानगरपालिका हद्दीत किमान ३ वर्षे वास्तव्य असल्याचा पुरावा म्हणून मागील ३ वर्षाचा मनपा टॅक्स पावती किंवा लाईट बिल किंवा टेलिफोन बिल (लॅण्डलाईन) किंवा झोपडी फोटो पास / झोपडी सेवा शुल्क पावती/भाडे करारनामा यांपैकी एक
८) अर्जदाराचे आधार कार्ड व बँक पासबुक साक्षांकित प्रत
NOTE;-
दिनांक ०१/०५/२००१ नंतर जन्माला आलेल्या व हयात अपत्यांमुळे कुटुंबाच्या अपत्यांची संख्या दोनपेक्षा जास्त झाल्यास शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार नाही.
- झेस्कोलर्स शिष्यवृत्ती कार्यक्रम २०२३
- ZScholars Scholarship Program
- SECI Recruitment 2023
- Indian Statistical Institute Recruitment 2023
- रिलायन्स फाउंडेशन पदव्युत्तर शिष्यवृत्ती
◆ अधिक माहितीसाठी लिंक:- https://dbt.pmc.gov.in/app/index.html#!/social-development-department
◆ ऑनलाईन अर्जासाठी लिंक:-
https://dbt.pmc.gov.in/app/index.html#!/citizen_registration
◆संपर्क:-
१८०० १०३० २२२ (टोल फ्री)
पत्ता- पुणे महानगरपालिका मुख्य इमारत, मंगला थिएटरजवळ, शिवाजी नगर, पुणे- ४११ ००५
info@punecorporation.org pmcdbthelp@gmail.com
◆अधिकृत संकेतस्थळ: – https://www.pmc.gov.in/en/educational-schemes