टी एस एस समीर आत्मनिर्भर डिप्लोमा अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थिनींसाठी शिष्यवृत्ती

◆ शिष्यवृत्तीची रक्कम:- ₹ ३०,०००

◆ शेवटची तारीख:- ०३/०१/२०२२
टी एस एस आत्मनिर्भर या शिष्यवृत्तीचा हा उद्देश आहे की आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील गुणवंत अशा विद्यार्थिनींना शिक्षणाकरिता आर्थिक मदत करणे,ज्या विद्यार्थिनींमध्ये उच्च शिक्षण घेण्याची क्षमता आहे हेच उच्च शिक्षण जे स्वतःला सक्षम करेल आणि त्यांच्या कुटुंबासाठी शाश्वत भविष्य घडवेल.

◆ पात्रता निकष:-
१) पूर्णवेळ डिप्लोमा कोर्स करत असलेले आणि इयत्ता १०वी किंवा १२ वी आणि मागील वर्षाच्या परीक्षेत किमान ७०% गुण मिळवणारे विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत
२) शिष्यवृत्ती फक्त मुलींनाच उपलब्ध आहे ज्यांचे कौटुंबिक उत्पन्न सहा लाख रुपयांपेक्षा कमी आहे.
३) ही शिष्यवृत्ती फक्त मुलींसाठी आहे, मुले शिष्यवृत्तीसाठी पात्र नाहीत.
४) शिष्यवृत्तीसाठी फक्त महाराष्ट्रातील मुली पात्र आहेत.

◆ पात्र अभ्यासक्रम :-
अभ्यासक्रम स्तर: डिप्लोमा कोर्स
डिप्लोमा इन आयुर्वेदिक नर्सिंग
-डिप्लोमा इन रुरल हेल्थ केअर
-डिप्लोमा इन एएनम (Auxiliary Nursing Midwifery)
-डिप्लोमा इन जीएनम (General Nursing and Midwifery)

◆ आवश्यक कागदपत्रे:-

  1. ओळखीचा पुरावा
  2. पत्त्याचा पुरावा
  3. ईयत्ता १०वी मार्कशीट
  4. कॉलेज फीच्या पावत्या
  5. लेटेस्ट शैक्षणिक मार्कशीट (प्रथम वर्षाचे विद्यार्थी वगळता)
  6. विद्यार्थी बँक पासबुक/किओस्क
  7. बोनाफाईड प्रमाणपत्र
  8. उत्पन्न प्रमाणपत्र
  9. पॅन कार्ड नंबर /डोमासाईल सर्टिफिकेट

◆ अधिक माहितीसाठी:-
https://www.vidyasaarathi.co.in/Vidyasaarathi/resources/242/469_5.html

◆ ऑनलाईन अर्जासाठी लिंक:-
https://www.vidyasaarathi.co.in/Vidyasaarathi/scholarship

◆ संपर्क तपशील:-
पत्ता- टाईम्स टॉवर, पहिला मजला, कमला मिल्स कंपाउंड, लोअर परेल, मुंबई – ४०० ०१३.
दूरध्वनी – (०२२) ४०९० ४४८४ फॅक्स – (०२२) २४९१ ५२१७
संपर्क व्यक्ती- राजदीप मुखर्जी
ईमेल- vidyasaarathi@nsdl.co.in

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *