जिल्हा परिषद नाशिक ‘सुपर ५०’ उपक्रम

अर्ज करण्याची अंतिम तारीख :- ३ जुलै २०२३

प्रवेश परीक्षेची तारीख :- ९ जुलै २०२३

‘सुपर ५०’ उपक्रमाबद्दल माहिती :-
जिल्हा परिषद नाशिक आयोजित ‘सुपर ५०’ उपक्रमांतर्गत इयत्ता ११ वी अनुसूचित जाती /अनुसूचित जमाती (SC/ST) प्रवर्गातील विज्ञान शाखेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी CET/JEE या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांकरीता निवासी स्वरुपात नियमित अभ्यासक्रमाबरोबर CET / JEE या व्यावसायिक पात्रता प्रवेश परीक्षेकरीता प्रशिक्षण/मार्गदर्शन ‘Super 50’ उपक्रमातंर्गत प्रस्तावित करण्यात आलेले आहे.

विद्यार्थ्यांना ‘सुपर ५०’ उपक्रमात सहभागी होण्यासाठी अटी :-
1) सदर योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक असणारा विद्यार्थी ग्रामीण भागातील अनुसूचित जाती व जमाती या प्रवर्गातील व सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात इ. ११ वी विज्ञान शाखेत अनुदानित, अंशतः अनुदानित कनिष्ठ महाविद्यालये, उच्च माध्यमिक विद्यालये,आश्रमशाळा, जि. नाशिक येथे प्रवेशीत असावा.

2) सदर योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यास इयत्ता १० वी मध्ये किमान ६५ % गुण प्राप्त झालेले असावेत.

3) सदर योजनेचा लाभ घेण्यास इच्छूक असणारा विद्यार्थ्यास दोन वर्षासाठी प्रशिक्षण व सर्व अध्यापन निवासी शाळेत निशुल्क असेल. त्याकरिता विद्यार्थ्याची व पालकांची तयारी/संमती आवश्यक राहील.

4) सदर योजनेचा लाभ देण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना निवड चाचणी परीक्षा अनिवार्य राहील तसेच सदर निवड चाचणी परीक्षेत उच्चतम् गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची निवड मर्यादित स्वरुपात करण्यात येईल.
५) विद्यार्थ्यांचे कौटुंबिक उत्पन्न्न १ लाख रुपयांपेक्षा कमी असणारे विद्यार्थीच या योजनेकरिता अर्ज करण्यास पात्र आहेत.

ऑनलाईन अर्ज करण्याकरिता लिंक :-
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdPEpiUjmtItHAWLqIpFJjlLAX2AKKiqdtD4FSv-W-6Cbqwrg/viewform?usp=sf_link