फेडेरल बँक होर्मिस मेमोरियल फाउंडेशन शिष्यवृत्ती

◆ शिष्यवृत्तीचा तपशील :
प्रति वर्ष ₹ १ लाख रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती
वैयक्तिक संगणक (पीसी) / लॅपटॉपसाठी ४०,००० रुपये
निवड झालेल्या विद्यार्थ्यांना कॉलेजची १००% शिकवणी फी आणि फी स्ट्रक्चरनुसार देय इतर शुल्काची रक्कम अदा केली जाईल.कॉलेजचे फी स्ट्रक्चर १ लाखापेक्षा जास्त असेल तर फक्त १ लाख रुपयांपर्यंतच शिष्यवृत्ती मिळेल. या शिष्यवृत्ती अंतर्गत विद्यार्थ्यांना एक कम्प्युटर किंवा लॅपटॉप घेण्याकरिता जास्तीत जास्त ४०,००० रुपये दिले जातील परंतु एकूण शिष्यवृत्ती रक्कम प्रती वर्षी १ लाख रुपयांच्या पेक्षा जास्त मिळणार नाही

◆ अर्ज करण्याची अंतिम दिनांक : ३१ डिसेंबर २०२२

◆ शिष्यवृत्तीची रक्कम :
१ लाख रुपयांपर्यंत प्रतिवर्ष शिष्यवृत्ती
वैयक्तिक संगणक (पीसी) / लॅपटॉपसाठी ४०,००० रुपये

◆ पात्रता :
१) फक्त गुजरात, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, पंजाब, तामिळनाडू राज्यातील विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.
२) शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ३ लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
३)शहीद सशस्त्र सैन्य दलाच्या कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी वार्षिक उत्पन्नाची अट (निकष) लागू होणार नाही.
४) सन २०२२-२०२३ या शैक्षणिक वर्षात पुढील कोर्सेसच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेतलेले विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत:- एमबीबीएस, बीएससी नर्सिंग, इंजिनिअरिंग, एमबीए, बीएससी ऍग्रीकल्चर सायन्स, बीएससी कोऑपरेशन आणि बॅंकिंग

◆ आवश्यक कागदपत्र :
१) प्रवेशपत्राची प्रत (ऍडमिशन लेटर)
२) कॉलेजच्या बोनफाईड प्रमाणपत्राची प्रत
३) कॉलेजच्या फी स्ट्रक्चरची / फी रिसिप्टची प्रत
४) अंडर-ग्रॅज्युएशन कोर्सेसच्या पहिल्या वर्गात शिकणारे विद्यार्थी – 12वीची मार्कशीट
एमबीए अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्गात शिकणारे विद्यार्थी – ग्रॅज्युएशन मार्कशीट
५) सीजीपीए आणि ग्रेडचे टक्केवारीत रूपांतर करण्यासाठी संबंधित विद्यापीठाच्या निर्णयाची प्रत
(एमबीए अर्जदारांसाठी अनिवार्य)
६) कौटुंबिक उत्पन्नाच्या दाखल्याची प्रत
७) जन्म प्रमाणपत्राची प्रत.
८) ओळखीचा पुरावा आणि पत्त्याच्या पुराव्याची प्रत
९) वैद्यकीय प्रमाणपत्रांची प्रत (शारीरिकदृष्ट्या अपंग विद्यार्थ्यांसाठी )
१०) सशस्त्र सैन्य दलाचे कर्मचारी देशाची सेवा करताना शहीद झाले असल्यास त्यांच्या मुलांना या शिष्यवृत्तीचा लाभ घेता यावा यासाठी त्यासंबंधित पुरावा.
११) डोमासाईल सर्टिफिकेट

◆संपर्क तपशील:-
पत्ता- फेडरल बँक सीएसआर विभाग, 4था मजला फेडरल टॉवर्स, मरीन ड्राइव्ह एर्नाकुलम – 682031
फोन : ०४८४२२०१४०२
ईमेल: csr@federalbank.co.in
वेबसाइट:- www.federalbank.co.in

◆ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक :-
https://forms.office.com/r/PZmvsWEuJc

◆ शिष्यवृत्ती नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी लिंक :-
https://drive.google.com/file/d/1ghlke3jN10IM1CKGLhvBrk1-zWqrPw33/view?usp=sharing

◆ अर्ज करण्याची प्रक्रिया:-

  1. खालील लिंकद्वारे शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज करा
    https://forms.office.com/r/PZmvsWEuJc
  2. ऑनलाइन सबमिट केलेल्या अर्जाची प्रिंटआउट घ्या.
  3. आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन भरलेल्या अर्जाची हार्डकॉपी पोस्ट/कुरियरद्वारे पुढील पत्त्यावर पाठवा- फेडरल बँक CSR विभाग, 4था मजला फेडरल टॉवर्स, मरीन ड्राइव्ह एर्नाकुलम – 682031.