◆ अर्ज करण्याची अंतिम तारीख:-
३१ मार्च २०२२
◆ शिष्यवृत्ती बद्दल:-
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत निवड होणाऱ्या अखिल भारतीय प्रशासकीय सेवांमध्ये महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांचे प्रमाण वाढावे यासाठी ही गुणवत्ताधारीत विशेष शिष्यवृत्ती योजना आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊन मुलाखत फेरीपर्यंत पोहोचणाऱ्या तथापि, अंतिमत: भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये निवड न होणाऱ्या राज्यातील होतकरु व गुणवान उमेदवारांना दिल्ली येथील केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची पूर्व तयारी करुन खाजगी प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी सदर योजनेअंतर्गत शिष्यवृत्तीच्या माध्यमातून वर्ष २०१६ पासून विद्यार्थ्याना अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्यात येते.
◆ पात्रता निकष
१. सदर उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा,
२. अर्जकर्त्या उमेदवाराचे व त्याच्या कुटूंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न रु.१०.०० लाखाच्या मर्यादेत असावे,
३. मागील तीन वर्षामध्ये म्हणजे सन २०१८, २०१९ व २०२० या वर्षांमध्ये किमान एक वेळा केंद्रीय लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊन मुलाखत फेरीपर्यंत पोहोचणाऱ्या तथापि अंतिमतः भारतीय प्रशासकीय निवड न झालेला उमेदवार सदर शिष्यवृत्तीसाठी अर्ज करु शकेल.
४. उमेदवाराने अर्जासह परीक्षा प्रमाणपत्र, रहिवासी दाखला (Domicile of Maharashtra Certificate) त्या वर्षाच्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षचे प्रवेशपत्र (Hall Ticket) व गुणपत्रिका कागदपत्रे सादर करावीत,
५. उमेदवारास भाग-१ भाग-२ भाग-३ या भागनिहाय लाभ एकदाच अनुज्ञेय राहिल.
६. शिष्यवृत्तीसाठी पात्र उमेदवारास प्रशिक्षण घेतल्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा देणे बंधनकारक आहे. अन्यथा शिष्यवृत्तीची रक्कम एक रकमी शासनास परत करण्यात येईल अशा आशयाचे बंधपत्र रु. १०० च्या स्टॅम्प पेपर घर देणे बंधनकारक असेल,
७. सदर शिष्यवृत्तीचा लाभ घेणाऱ्या प्रत्येक उमेदवारास दिल्ली येथील त्याच्या प्रशिक्षणाच्या वास्तवाच्या कालावधीसाठी रु. १०,०००/- प्रति माहे प्रमाणे निर्वाह भत्ता उपस्थितीनुसार देण्यात येईल.
८. उमेदवाराने प्रशिक्षण संस्थेमार्फत मासिक उपस्थिती अहवाल राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था, मुंबई संस्थेस सादर करणे बंधनकारक राहील.
९. सदर शिष्यवृत्तीचा लाभ घेणारा उमेदवार पूर्व परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यास त्याची शिष्यवृत्ती समाप्त करण्यात येईल.
◆ प्रशिक्षणासाठी निवड केलेल्या दिल्ली स्थित संस्था:-
१) vajiram & Ravi, New Delhi
२) Vision IAS, New Delhi
३) Ramaswamy IAS Academy
◆ ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक:-
http://eforms.co.in/shishyavrutti_part1/?r
◆ संपर्क तपशील:-
राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था, मुंबई.
हजारीमल सोमाणी मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस समोर, फोर्ट, मुंबई-४००००१ दुरध्वनी क्र. ०२२२२०७०९४२, संकेतस्थळ:www.siac.org.in
ई-मेल: siac1995@gmail.com