एस. के. पाटील कर्ज शिष्यवृत्ती

अर्ज मिळवण्याची अंतिम तारीख:- ६ मे २०२२

अर्ज सबमिट करण्याची अंतिम तारीख:– २० मे २०२२

शिष्यवृत्तीबद्दल:-
जे भारतीय विद्यार्थी परदेशातील विद्यापीठात किंवा कॉलेजमध्ये अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, वैद्यकीय व अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या क्षेत्रातील उच्च शिक्षणाकरिता प्रवेश घेणार आहेत अशा विद्यार्थ्यांना श्री बृहद् भारतीय समाज यांच्याकडून ही कर्ज शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. ही कर्ज शिष्यवृत्ती अर्जदारांची जात, जमात, धर्म व लिंग लक्षात न घेता दिली जाणार आहे.

पात्र अभ्यासक्रम:-
पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्सेस

  • इंजिनिअरिंग
  • मेडिकल
  • टेक्नॉलॉजी
  • प्रोफेशन कोर्सेस

शिष्यवृत्तीकरिता पात्रता:-
अर्जदारांनी पुढील शर्तीची पूर्तता करावी :
१) अर्जदाराने पदवी परीक्षा प्रथम श्रेणीमध्ये पास केलेली असावी, त्याचबरोबर इयत्ता दहावी पासून पदवीच्या शेवटच्या वर्षापर्यंत प्रत्येक परीक्षेमध्ये प्रथम श्रेणी मिळवलेली असावी.
२) सप्टेंबर २०२२ ते फेब्रुवारी २०२३ दरम्यान सुरू होणाऱ्या अभ्यासक्रमांसाठी नामांकित परदेशी विद्यापीठात अर्जदाराला प्रवेश मिळाला असला पाहिजे किंवा प्रवेशासाठी किमान अर्ज केला असला पाहिजे.
३) अर्जाच्या वेळी अर्जदाराचे वय २७ वर्षांपेक्षा जास्त नसावे.

सूचना:-
पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात शिकत असलेले उमेदवारसुद्धा अर्ज करण्यास पात्र आहेत. तथापि त्यांनी २०२२ जून समाप्तीपूर्वी अगोदरच्या परीक्षांची गुणपत्रिका / प्रमाणपत्र सादर करावे.

अर्ज करण्याची पद्धत:-
१) ज्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती साठी अर्ज करायचा आहे अशा विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती अर्ज मिळण्याकरिता १०/- रुपयांची टपाल तिकिटे चिकटवून स्वतःचा पत्ता लिहिलेल्या २५ सेंमी x १८ सेंमी लिफाफ्यासमवेत दहावीपासून ते पदवीपर्यंतच्या सर्व परीक्षांमध्ये मिळविलेल्या गुणांची टक्केवारी आणि श्रेणी यांसह सर्व तपशील एका कोऱ्या कागदावर लिहलेला अर्ज पुढे दिलेल्या बृहद भारतीय समजाच्या पत्त्यावर पोस्टाने किंवा कुरियरने पाठवावे.
पत्ता:-
मानद सचिव श्री बृहद् भारतीय समाज, एन. के. मेहता इंटरनॅशनल हाऊस (एलआयसी योगक्षेमच्या मागे), १७८ बॅकबे रिक्लेमेशन, बाबुभाई एम. चिनॉय मार्ग, चर्चगेट, मुंबई ४०००२०.
दूरध्वनी क्र. २२०२०११३
२) श्री बृहद् भारतीय समाज यांच्या कार्यालयात हे अर्ज उशिरात उशिरा म्हणजे ६ मे २०२२ पर्यंत पोहोचावे.
३) जे विद्यार्थी शिष्यवृत्तीकरिता पात्र असतील त्या विद्यार्थ्यांना श्री बृहद् भारतीय समाजाकडून शिष्यवृत्ती फॉर्म पाठवला जाईल.
४) ज्या पात्र विद्यार्थ्यांना श्री बृहद् भारतीय समाजाकडून पाठवलेला शिष्यवृत्ती फॉर्म व्यवस्थित माहिती भरून नमूद करण्यात आलेल्या डॉक्युमेंट्स सोबत २० मे २०२२ पूर्वी समाज कार्यालयाकडे परत पाठवावे.

संपर्क तपशील:-
मानद सचिव श्री बृहद् भारतीय समाज,
एन. के. मेहता इंटरनॅशनल हाऊस (एलआयसी योगक्षेमच्या मागे), १७८ बॅकबे रिक्लेमेशन,
बाबुभाई एम. चिनॉय मार्ग, चर्चगेट, मुंबई ४०००२०.
फोन – ०२२२२०२०११३

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *