◆ शिष्यवृत्ती बद्दल:-
हा शिष्यवृत्ती कार्यक्रम अशा मुलींना मदत करण्यासाठी तयार करण्यात आला आहे जे उच्च फीच्या संरचनेमुळे दर्जेदार शिक्षण घेऊ शकत नाहीत. सँडविक कोरोमंट गर्ल्स शिष्यवृत्ती कार्यक्रम त्यांना त्यांच्या आर्थिक अडचणींचा सामना करण्यासाठी आणि शैक्षणिक उत्कृष्टता आणि करिअरच्या संधींचा पाठपुरावा करण्यासाठी प्रोत्साहित करेल. सँडविक एशिया प्रायव्हेट लिमिटेड कर्मचारी आणि त्यांच्या मुलांसाठी ही शिष्यवृत्ती लागू होणार नाही.
◆ शिष्यवृत्तीची रक्कम:- ₹ ३०,०००
◆ शेवटची तारीख:- ३० सप्टेंबर २०२१
◆ पात्रता निकष:-
1) एआयसीटीई/एनएएसी/यूजीसी/सरकारद्वारे मान्यताप्राप्त संस्थांमधून पूर्णवेळ डिप्लोमा कोर्सचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनी ज्यांनी 10 वीच्या परीक्षेत किमान 50% गुण मिळवले आहेत अशा विद्यार्थीनी या शिष्यवृत्ती करिता अर्ज करण्यास पात्र आहेत.
२) फक्त महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थीनी या शिष्यवृत्ती करिता अर्ज करण्यास पात्र आहेत.
3) शिष्यवृत्ती फक्त त्या विद्यार्थीनीसाठी उपलब्ध आहे ज्यांचे कौटुंबिक उत्पन्न ८०,००० पेक्षा कमी आहे.
◆ पात्र अभ्यासक्रम:-
कोर्स लेवल : डिप्लोमा
1) कोर्सचे नाव: कोणताही डिप्लोमा कोर्स
◆ आवश्यक कागदपत्र:-
1) अर्जदार फोटो
2) ओळखीचा पुरावा
3) पत्त्याचा पुरावा
4) उत्पन्नाचा पुरावा
5) विद्यार्थी बँक पासबुक/कियोस्क
6) 10 वी मार्कशीट
7) चालू वर्षाची फी पावती/फी रचना
8) संस्थेचे प्रवेश पत्र / बोनाफाईड प्रमाणपत्र
9) मागील शैक्षणिक वर्षाचे मार्कलिस्ट (प्रथम वर्षात प्रवेश घेतलेले विद्यार्थी वगळता)
10) अधिवास प्रमाणपत्र
◆ ऑनलाईन अर्जासाठी लिंक:-
https://www.vidyasaarathi.co.in/Vidyasaarathi/scholarship
◆ संपर्क तपशील:-
पत्ता- टाइम्स टॉवर, पहिला मजला, कमला मिल्स कंपाउंड, लोअर परेल, मुंबई – ४०००१३
दूरध्वनी – (022) 4090 4484 फॅक्स – (022) 2491 5217
संपर्क व्यक्ती- राजदीप मुखर्जी
ईमेल- vidyasaarathi@nsdl.co.in
◆ वेबसाइट: – https://www.vidyasaarathi.co.in/Vidyasaarathi/index