◆ शेवटची तारीख: – 31 जानेवारी 2021
◆ पात्रता निकष: –
१) ज्या विद्यार्थ्याला कर्ज शिष्यवृत्ती मिळाली आहे त्याला मंजूर कर्जाच्या रकमेइतकी जीवन विमा पॉलिसी(एलआयसी पॉलिसी) सादर करावी लागेल आणि कोर्सच्या कालावधीपर्यंत त्या शिष्यवृत्तीचा प्रीमियम भरावा लागेल. लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया किंवा टाटा एआयए लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडकडून २० ते ३० वर्षांच्या कालावधीसाठी विमा पॉलिसी “एंडॉवमेंट पॉलिसी” असणे आवश्यक आहे आणि ती पॉलिसी ट्रस्टच्या नावे असाइन करणे गरजेचे आहे.
२) संबंधित अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर कर्जाच्या रक्कमेची परतफेड तीन वर्षांच्या आत केली जावी.
3) कर्जाच्या रकमेवरील व्याज दर २% प्रतिवर्ष आहे.
◆ आवश्यक कागदपत्रे: –
प्रवेश पुरावा
१) युनिव्हर्सिटी कॉलेज किंवा इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतलेले ऍडमिशन लेटर त्याचबरोबर फी पवतीची प्रत सादर करणे आवश्यक आहे
●
जर एखाद्या विद्यार्थ्याने अमेरिलेतील विद्यापीठ किंवा संस्थेमध्ये प्रवेश मिळविला असेल तर आय-२० फॉर्मची प्रत जमा करणे आवश्यक.
● जर विद्यार्थ्याने इंग्लंड मधील विद्यापीठ किंवा संस्थेमध्ये प्रवेश मिळविला असेल तर अर्जदारांनी “सर्टिफिकेट ऑफ अॅक्सेप्टन्स फॉर स्टडीज”ची एक प्रत जोडणे आवश्यक.
● भारतात राहून शिक्षण घेण्यासाठी अर्जदाराने महाविद्यालय किंवा संस्थेत भरलेल्या प्रवेश शुल्काची पावती जमा करणे आवश्यक आहे.
२) विद्यार्थ्यांनी पालकांची त्याचबरोबर जमीनदारांची सॅलरी स्लीप किंवा आयकर मूल्यांकन आदेशाची( इन्कम टॅक्स रिटर्न फाईल) प्रत सादर करणे आवश्यक आहे.
३) अर्जदाराच्या कुटुंबातील सर्व सदस्यांच्या उत्पन्नाचा दाखला आणि मालमत्तेचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे . जर कुटुंबातील सदस्य व्यवसाय करीत असेल तर व्यवसायाच्या स्वरूपाचा उल्लेख गरजेचा आहे.
४)
लेटर ऑफ रेकमेंडेशनच्या प्रती सादर करणे आवश्यक आहे.
५) ज्या विद्यार्थ्यांना भारतात शिक्षण घ्यायचे आहे त्यांनी भारत सरकारकडून कॉलेज किंवा संस्थेला मान्यता मिळाल्याचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे.
◆ शिष्यवृत्ती तपशील: –
१) आर डी सेठाना कर्ज शिष्यवृत्ती भारतत किंवा परदेशात सायंटिफिक, टेक्निकल, मेडिकल आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांत शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता आहे.
२) या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांना दोन जामीनदारांची आवश्यकता आहे, जे मुंबईचे रहिवासी असावेत.
३) विद्यार्थ्यांना देश विदेशात वैज्ञानिक, तांत्रिक, औद्योगिक किंवा व्यावसायिक अभ्यास करण्यास सक्षम होण्यासाठी कर्ज शिष्यवृत्ती दिली जाते.
◆ अर्ज पद्धती-
● ऑनलाईन –
https://www.rdsethnascholarsship.org वेबसाइटला भेट द्या आणि ऑनलाईन अर्ज भरा.
● ऑफलाइन –
एस्प्लानेड हाऊस, २९ हजारीमल सोमानी मार्ग, फोर्ट, मुंबई-400०००११ येथील ट्रस्टच्या कार्यालयातून छापील अर्जाचे फॉर्मदेखील मिळू शकतात.
दूरध्वनी: २२०७७०४४ .
ऑफलाइन फॉर्मद्वारे विनंती करिता उमेदवारांनी स्वत:चा पत्ता लिहिलेले व त्यावर ₹10 चा पोस्ट स्टॅम्प लावलेला लिफाफा “एस्प्लानेड हाऊस, २९ हजारीमल सोमानी मार्ग, फोर्ट, मुंबई -४००००१” या पत्त्यावर पाठवावा.
लिफाफ्याचा आकार: २३ सेमी x १० सेमी.
◆ ऑनलाईन अर्ज शुल्क: – रुपये
५० (पन्नास रुपये फक्त) रोख किंवा पोस्टल ऑर्डरद्वारे.
◆ संपर्क माहिती: –
● पत्ता – एस्प्लानेड हाऊस, २९ हजारीमल सोमानी मार्ग, फोर्ट, मुंबई -४००००१
● ईमेल-rdsethnascholarship@gmail.com
● वेबसाइट- www.rdsethnascholarsship.org
● फोन- +91 22 2207 7044
◆ ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंक: – https://www.rdsethnascholarships.org