श्री. शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन एज्युकेशन

Shri. Sharad Pawar Inspire Fellowship in Education

फेलोशिपची रक्कम :- वार्षिक ६०,०००/- (रुपये साठ हजार फक्त)

शेवटची तारीख:- २० ऑक्टोबर २०२३

फेलोशिप बद्दल:-   

महाराष्ट्रातील शाळांत व ज्युनिअर कॉलेजात कार्यरत असलेले  शिक्षक, जे   नियमित अध्यापन करत विद्यार्थ्यांच्या सहभागाने चालणारे व वर्षभर विकसित होत जातील असे अभ्यासक्रमेतर व वेळापत्रकेतर शैक्षणिक उपक्रम करत असलेले/ करू इच्छिणारे शिक्षक या फेलोशिप करता अर्ज करण्यास पात्र आहेत. 

फेलोशिपमधील उपक्रमाचा कालावधी:  मे २०२४  ते  मे २०२५

पात्रता निकष:-

१) महाराष्ट्रातील शाळांत व ज्युनिअर कॉलेजात कार्यरत असलेले  शिक्षक, जे   नियमित अध्यापन करत विद्यार्थ्यांच्या सहभागाने चालणारे व वर्षभर विकसित होत जातील असे अभ्यासक्रमेतर व वेळापत्रकेतर शैक्षणिक उपक्रम करत असलेले/ करू इच्छिणारे शिक्षक या फेलोशिप करता अर्ज करण्यास पात्र आहेत.

2) वय वर्षे ४५ किंवा त्यापेक्षा कमी वय असणारे शिक्षक या फेलोशिप करता अर्ज करण्यास पात्र आहेत.

3) बी एड च्या द्वितीय वर्षात शिक्षण घेणारे विद्यार्थी सुद्धा या फेलोशिप करीता अर्ज करण्यास पात्र आहेत.  

◆ फेलोशिप थीम्स :-

  1. Teachers who involved in Scout Guide (स्कॉऊट गाइड)
  2. Climate Change (हवामान बदल)
  3. Special Education (विशेष शिक्षण)
  4. Children’s Health (Mental and Physical) (मुलांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य)
  5. Sports (खेळ)
  6. Nature’s friend (निसर्ग मित्र, पर्यावरण रक्षक)
  7. Performing Arts (कला)
  8. Crafts and Culture (संस्कृती आणि हस्तकला) 
  9. Gender Equity (लिंग समभाव)
  10. Promoting Scientific Temper (वैज्ञानिक दृष्टिकोण रुजवणे)
  11. Inculcating Values of Indian Constitution (संविधानिक मूल्ये रुजवणे)
  12. Reading Comprehensive (वाचन संस्कृति)

◆ फेलोशिप कालावधी: – मे  २०२४  ते  मे २०२५ 

Fellowship TimeLine :-

– ऑनलाइन फॉर्म सबमिशन – २५  ऑगस्ट २०२३ ते २० ऑक्टोबर २०२३

– फेलोशिप  निकालाची घोषणा – २६ नोव्हेंबर २०२३

– फेलोशिप प्रदान सोहळा कार्यक्रम  – १० डिसेंबर २०२३

– फेलोशिप  प्रथम कार्यशाळा – २७, २८, २९ मे २०२४

– प्रकल्पाना भेटी –   १५ ऑगस्ट ३० ऑगस्ट २०२४

– फेलोशिप  द्वितीय कार्यशाळा –  ८, ९, १० नोव्हेंबर २०२४

– तृतीय कार्यशाळा व प्रकल्प अहवालाचे सादरीकरण – २६, २७, २८ मे २०२५

फेलोशिपकरता अर्ज करण्याची पद्धत :-

१) शिक्षकांनी https://apply.sharadpawarfellowship.com या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावे.

२) ज्या शिक्षकांना  फेलोशिपकरता अर्ज करायचा आहे अशा शिक्षकांनी  फेलोशिपसाठी स्वतः हाती घेणार असलेल्या “शैक्षणिक परिवर्तन उपक्रमाण विषयी मराठी किंवा इंग्रजी भाषेत पुढे नमूद केलेल्या मुद्दयांच्या आधारे सुमारे १००० शब्दांत माहिती लिहून अर्जासोबत जोडणे अपेक्षित आहे.

२.१ उपक्रमाचे शीर्षक

२.२ उपक्रमाची गरज, उपक्रम आपण का निवडला?

२.३ उपक्रमाचे महत्व

२.४ उपक्रमाचे नाविन्य व वेगळेपण शासकीय योजनेपेक्षा वेगळे परंतु शासकीय योजनांना पूरक

२.५ शिक्षकाने यापूर्वी काही नवोपक्रम केले आहेत काय ?

२.६ यापूर्वी शासनास किवा इतर संस्थेस आपण काही नवोपक्रम सदर केले आहेत काय ?

२.७ आपल्या नवोपक्रमाची दाखल घेतली गेली आहे काय ? असल्यास कोणत्या स्तरापर्यंत

– जिल्हास्तर

– राज्यस्तर

– राष्ट्रीयस्तर

२.८ उपक्रमासाठी लागणारी साधने व सोयी

२.९ आपला उपक्रम साधारण किती दिवस चालेल ?

आपल्या उपक्रमाचे वेळापत्रक

३.१ उपक्रमाची फलनिष्पत्ती पाहण्यासाठीची व्यवस्था

३.४ उपक्रमासाठीचे अंदाजपत्रक

३.५ उपक्रमासाठीचे वेळापत्रक

४. आपण प्रस्तावित करत असलेला उपक्रम पूर्वीपासून राबवत असाल तर त्याचा तपशील (छायाचित्र, चित्रफित, परखड मूल्यमापन इ. अर्जासोबत जोडावे.

Note:- फक्त २०२४ – २५ या शैक्षणिक वर्षात बदली न होणाऱ्या  शिक्षकांनीच फेलोशीपकरिता अर्ज करावा.

Link to Download Information Brochure : –

https://www.sharadpawarfellowship.com/images/SPIF%20Education%20Fellowship.pdf

अधिक माहितीसाठी लिंक:-

https://www.sharadpawarfellowship.com/fellowships/education-fellowship

ऑनलाईन अर्जासाठी लिंक:-

https://apply.sharadpawarfellowship.com

फेलोशिप नियमावली  :-

१) शिक्षक ज्या संस्थेत काम करीत आहात त्या संस्थेचे ‘नवोपक्रम’ करण्यासाठी शिक्षकाला  परवानगी दिल्याचे पत्र सुरुवातीसच द्यावे लागेल.

२) शिक्षक जो नवोपक्रम हाती घेणार आहात तो यापूर्वी केलेला नसावा. मात्र पूर्वी केलेल्या प्रयोगाचे विस्तारीकरण (Extension ) करता येईल.

३) शिक्षक करीत असलेला नवोपक्रम इतर कोणत्याही संस्थेत सादर केलेला नसावा तसेच पुढेही तो सादर करता येणार नाही.

४ ) शिक्षकाने  घेतलेला उपक्रम कोणाचीही कॉपी असू नये. जर दुसऱ्याची एखादी कल्पना घेवून काम करणार असाल तर तशी त्या व्यक्तीची पूर्वपरवानगी घेतलेली असावी.

५ ) यशवंतराव चव्हाण सेंटर, ज्या ज्या वेळी यासंबंधीची प्रशिक्षणे किंवा बैठका घेईल त्यावेळी अशा बैठकास किंवा प्रशिक्षणास शिक्षक उपस्थित राहणे बंधनकारक राहील. अपरिहार्य अडचण असेल तर तशी कल्पना यशवंतराव चव्हाण सेंटरला देवून परवानगी शिक्षकाला घ्यावी लागेल.

६ ) शिक्षकांनी यशवंतराव चव्हाण सेंटरनी दिलेल्या वेळेतच आपला उपक्रम पूर्ण करणे अपेक्षित आहे. उपक्रमास उशीर झाला तर आपल्या फेलोशिपबाबतचा अंतिम निर्णय यशवंतराव चव्हाण सेंटरला असेल.

७ ) शिक्षकाचा  उपक्रम चालू असताना यशवंतराव चव्हाण सेंटरचे प्रतिनिधी कधीही तरीही पूर्व कल्पना देवून भेट देण्यास येतील. त्यावेळी त्यांना सहकार्य करणे अपेक्षित आहे. जर या प्रतिनिधिंना कामाबाबत चुकीच्या गोष्टी ध्यानात आल्या तर फेलोशिप संबंधी यशवंतराव चव्हाण सेंटर निर्णय घेईल.

८) नवोपक्रम अंतिम अहवाल सादर करताना शिक्षकाने  आपल्या संस्था प्रमुखाचे पत्र जोडणे आवश्यक आहे.

संपर्क तपशील:-

योगेश कुदळे                          

शिक्षण विभाग प्रमुख 
यशवंतराव चव्हाण सेंटर, जगन्नाथराव भोसले मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१     
ई-मेल आयडी : education@chavancentre.org
फोन नं : +91 93707 99791
संजना पवार
सहाय्यक, शिक्षण विभाग
संपर्क – 8291416216