वहानी शिष्यवृत्ती

शिष्यवृत्तीबद्दल :

वहानी स्कॉलरशिप ट्रस्टतर्फे आर्थिकदृष्ट्या कमकुवत परिस्थितीतील भारतीय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत आणि त्यांच्या विकासासाठी विविध कार्यक्रम दिले जातात.

ही मेरिट-कम-मीन्स शिष्यवृत्ती विशेषतः बारावीमध्ये शिकणाऱ्या आणि चांगली शैक्षणिक कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मदत करते. बारावी पूर्ण केल्यानंतर मान्यताप्राप्त कॉलेज किंवा युनिव्हर्सिटीमध्ये फुल-टाईम अंडरग्रॅज्युएट डिग्री करण्यासाठी विद्यार्थ्यांना या स्कॉलरशिपचा लाभ मिळू शकतो.

आर्थिक मदतीसोबतच विद्यार्थ्यांना प्रोफेशनल मेंटॉरशिप आणि करिअर ट्रेनिंगही दिले जाते. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण विकसित करणे आणि त्यांना पुढे जाण्यासाठी चांगल्या संधी उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १ नोव्हेंबर २०२६

(सध्या बारावीमध्ये शिकणारे विद्यार्थी या स्कॉलरशिपसाठी अर्ज करू शकतात. त्यांना अंडरग्रॅज्युएट शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळेल.)

शिष्यवृत्तीचे फायदे :
  • संपूर्ण कोर्सच्या कालावधीसाठी पूर्ण ट्युशन फी दिली जाईल.
  • लॅपटॉपसाठी स्टायपेंड दिला जाईल.
  • पुस्तकांसाठी स्टायपेंड दिला जाईल.
  • प्रवासासाठी स्टायपेंड दिला जाईल. यामध्ये वर्षातून एकदा घरी येण्यासाठी आणि परत जाण्यासाठीचा प्रवास पूर्णपणे कव्हर केला जाईल.
  • स्कॉलर हाऊसिंग दिले जाईल. यामध्ये हॉस्टेल/पीजीचे भाडे आणि जेवणाचा खर्च समाविष्ट असेल.
  • अनुभवी प्रोफेशनल्सकडून वन-ऑन-वन मेंटॉरशिप मिळेल.
  • विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल विकासासाठी विविध कार्यक्रम घेतले जातील. यामध्ये इंग्लिश, कॉम्प्युटर आणि प्रोफेशनल लिटरेसी यांचा समावेश आहे.
  • समर इंटर्नशिप करण्याची संधी मिळेल.
पात्रता :
  • विद्यार्थी सध्या बारावीमध्ये शिकत असावा आणि पुढील वर्षी होणाऱ्या बोर्ड परीक्षेला बसणार असावा.
  • दहावीच्या बोर्ड परीक्षेत किमान ८५% गुण मिळालेले असणे आवश्यक आहे.
  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. ३ लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
  • बारावी पूर्ण केल्यानंतर भारतातील मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटी किंवा कॉलेजमध्ये फुल-टाईम अंडरग्रॅज्युएट डिग्री करण्यासाठी अर्ज करणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे :
  • मूळ दहावीची मार्कशीट
  • मूळ अकरावीची मार्कशीट
  • इन्कम सर्टिफिकेट
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
संपर्कासाठी :

पत्ता:
थिंक व्हॅली, दुसरा मजला, प्लॉट नं. ८, कम्युनिटी सेंटर, मालवीय नगर एक्स्टेंशन, साकेत, नवी दिल्ली, दिल्ली – ११००१७

फोन: (+९१) ९३१९४ ५२७७७

ईमेल: info@vahanischolarship.com

वेबसाईट: https://www.vahanischolarship.com/

महत्त्वाच्या लिंक्स :

ऑनलाईन अर्ज: https://admin.vahanischolarship.in/register

शिष्यवृत्ती अधिकृत माहिती : https://www.vahanischolarship.com/admission

गाईडलाईन्स – वाहानी प्रोग्राम्स: https://www.vahanischolarship.com/programmes

एफएक्यू – वारंवार विचारले जाणारे प्रश्न: https://www.vahanischolarship.com/faqs