★ जेएसडब्ल्यू उडाण शिष्यवृत्ती बी.ई आणि बी.टेक अभ्यासक्रमांकरिता (२०२०-२१) ★

JSW Udaan Scholarship marathi

◆ अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- १२/२/२०२१

◆ शिष्यवृत्तीची रक्कम :- ४०,००० रुपये (चाळीस हजार रुपये)

◆ पात्रता :-
१) बी.ई आणि बी.टेक अभ्यासक्रमाच्या कुठल्याही वर्षात शिक्षण घेत असलेले विद्यार्थी व दहावी, बारावी आणि डिप्लोमामध्ये किमान ५०% गुण प्राप्त केलेले विद्यार्थी या शिष्यवृत्तीस पात्र असतील.
२) या शिष्यवृत्तीस अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा (८०००००)
जास्त नसावे.
३) जे विद्यार्थी विजयनगर, डोलवी, शैलम, कालमेश्वर , वाशिंद, मुंबई, बारमर आणि जेएसडब्ल्यू प्लांट जवळ राहत असतील केवळ तेच विद्यार्थी या शिष्यवृत्तीस पात्र असतील.

◆ आवश्यक कागदपत्र
१) ओळखपत्र
२) पत्त्याचा पुरावा
३) दहावी, बारावी किंवा डिप्लोमा मार्कशीट
४) द्वितीय, तृतीय व चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थ्यांनी मागील वर्षाच्या मार्कशीट जोडणे आवश्यक आहे
५) उत्पन्नाचा दाखला
६) विद्यार्थ्यांचे बँक पासबुक
७) ॲडमिशन कन्फर्मेशन लेटर
८) चालू शैक्षणिक वर्षाची कॉलेजची फी रिसिप्ट
९) बोनफाईड सर्टिफिकेट
१०) अर्जदाराचा फोटो

◆ संपर्काचा तपशील :-
पत्ता :- टाइम्स टॉवर, पहिला मजला, कमला मिल्स कंपाउंड, लोअर परेल, मुंबई ( ४०००१३).

दूरध्वनी क्रमांक :- (०२२) ४०९०४४८४
फॅक्स :- (०२२) २४९१ ५२१७

इमेल :- vidyasaarathi@nsdl.co.in
संपर्क व्यक्ती :- राजदीप मुखर्जी

◆ वेबसाईट :- https://www.vidyasaarathi.co.in/Vidyasaarathi/index

Spread Scholarship Information

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!