अमेझॉन फ्युचर इंजिनिअर शिष्यवृत्ती

शिष्यवृत्तीबद्दल

अमेझॉन आणि फाउंडेशन फॉर एक्सलन्स (एफएफई) यांच्या संयुक्त विद्यमाने ही शिष्यवृत्ती दिली जाते.

आर्थिक परिस्थिती अडचणीची असलेल्या आणि अभ्यासात चांगली कामगिरी करणाऱ्या भारतातील विद्यार्थिनींना उच्च शिक्षण घेण्यासाठी या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून मदत केली जाते.

इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स आणि टेक्नॉलॉजी संबंधित शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना आर्थिक मदतीसोबत लॅपटॉप, मार्गदर्शन, स्किल डेव्हलपमेंट आणि इंटर्नशिपच्या संधी दिल्या जातात.

निवड झालेल्या विद्यार्थिनींना अमेझॉनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी देखील मिळू शकते.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 नोव्हेंबर 2026
शिष्यवृत्तीचे फायदे
  • ग्रॅज्युएशन पूर्ण होईपर्यंत दरवर्षी ₹५०,००० ची आर्थिक मदत
  • लॅपटॉप
  • वैयक्तिक मार्गदर्शन
  • नवीन स्किल्स शिकण्यासाठी आणि विकसित करण्यासाठी संधी
  • इतर विद्यार्थी आणि तज्ज्ञांशी नेटवर्किंग करण्याची संधी
  • अमेझॉन इंटर्नशिपसाठी सहभागी होण्याची संधी
  • अमेझॉनमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी फायरसाइड चॅट्स करण्याची संधी
  • अमेझॉनच्या टेक्नॉलॉजी टीमसोबत संवाद साधण्याची संधी
  • हॅकाथॉनमध्ये सहभागी होण्याची संधी
  • अमेझॉनच्या व्यवसायाची आणि कामकाजाची माहिती मिळण्याची संधी
पात्र कोर्स

खालील कोर्समध्ये ॲडमिशन  घेतलेल्या विद्यार्थिनी या शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत:

  • बी.ई. / बी.टेक.
  • बी.ई. / बी.टेक. इंटिग्रेटेड एम.टेक.

पात्रता निकष

  • अर्जदार भारतीय नागरिक असावा
  • केवळ BE/BTech/Integrated MTech अभ्यासक्रमांचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीच (विशेषतः CS/IT शाखा) पात्र आहेत
  • पदवी शिक्षणाच्या पहिल्या वर्षात प्रवेश घेतलेली विद्यार्थिनी असावी
  • अर्जदारांनी त्यांची उच्च माध्यमिक / प्री-युनिव्हर्सिटी / इंटरमीडिएट / CBSE/ISC किंवा समकक्ष बोर्डाची पात्रता परीक्षा 2024 नंतर उत्तीर्ण केलेली असावी
  • प्रवेश हा राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवरील प्रवेश परीक्षांमधील गुणवत्तेच्या (merit rank) आधारे किंवा राज्य-स्तरीय समुपदेशन (counseling) प्रक्रियेद्वारे झालेला असावा
  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न Rs 4.00 लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे
  • डिप्लोमा करून थेट द्वितीय वर्ष BE/BTech अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेले (lateral entry) विद्यार्थी पात्र नाहीतत.
आवश्यक डॉक्युमेंट्स

अर्ज करताना खालील डॉक्युमेंट्स आवश्यक आहेत:

  • बारावीची मार्कशीट
  • एंट्रन्स रँक सर्टिफिकेट
  • सीट अलॉटमेंटसाठी काउन्सेलिंग लेटर
  • फॅमिली इन्कम सर्टिफिकेट किंवा मागील ३ महिन्यांची सॅलरी स्लिप किंवा आयटी रिटर्न फॉर्म
  • ई-आधार किंवा ओरिजिनल आधारची स्कॅन केलेली कॉपी
  • ट्युशन / हॉस्टेल / मेसची फी भरल्याच्या रिसीट्स
  • बँक अकाउंटची माहिती निश्चित करण्यासाठी बँक पासबुकची कॉपी
  • कॉलेजने दिलेले बोनाफाईड सर्टिफिकेट
  • कॉलेजने दिलेले कोर्सचे फी स्ट्रक्चर
  • पालक किंवा गार्डियनचे डिक्लेरेशन
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

संपर्क तपशील :

पत्ता: No. 840, 5th Main, Indiranagar 1st Stage, Bengaluru 560 038, Karnataka, India

दूरध्वनी: +91 (080) 2520 1925

ईमेल: scholarships@ffe.org

वेबसाइट: https://ffe.org/

महत्त्वाच्या लिंक्स

अमेझॉन फ्युचर इंजिनिअर शिष्यवृत्तीची अधिकृत माहिती: https://ffe.org/amazon-future-engineer/